संध्येच्या व्याकूळ छाया.

Submitted by deepak_pawar on 22 February, 2026 - 09:11

संध्येच्या व्याकूळ छाया
अंधार माखुनी येती
हा डोह अंतरीचा
दुःखाने ढवळून जाती.

मी व्याकूळ होतो जेव्हा
दुःखाने मेघही झरती
अश्रूंनी विझुनी गेल्या
नभीच्या चांदणज्योती.

सावली उन्हाची व्हावी
तशीच शीतल माया
गेले प्रहर निघुनी
छळती स्मृतींच्या छाया.

अंधार भारल्या राती
नभी चांदणे झरते
अंधाऱ्या डोही दुःखाच्या
सुख तसे पाझरते.

https://youtu.be/dIeVgVYuzAI?si=SXcompql_binlOVa

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
जस्ट अ सजेशन "चांदणज्योती" जास्त बरोबर आहे अस वाटतं.

बाकी कविता आवडली.

Meghvalli जी, Sparkle जी मन:पूर्वक धन्यवाद.
Meghvalli जी बदल केला आहे.

"अंधार भारल्या राती
नभी चांदणे झरते
अंधाऱ्या डोही दुःखाच्या
सुख तसे पाझरते."

या ओळींमधला आशावाद मनाला भावला. मस्त....

खूप छान कविता. आवडली.

हा डोह अंतरीचा >> ओळीत एक अक्षर कमी आहे. हा डोह अंतरंगाचा कसं वाटेल?

खूप छान कविता. मनापासून आवडली.

इतर काही जणांनी म्हटले आहे तसे मात्रांचे हिशोब जरा सांभाळले तर अजून छान वाटेल, पण आग्रह नाही. आशयाला धक्का लागायला नको.