जरा आगळे आज वाटते.

Submitted by deepak_pawar on 13 February, 2026 - 08:42

जरा आगळे आज वाटते
मनी काहीसे आज दाटते
करमत नाही
हुरहुर काही
कुणी सारखे स्वप्नात येते.

आज झऱ्याचा नाद वेगळा
आज नभाला साज वेगळा
वेगळ वाटतं नभातल चांदणं
काळजा छेडती कुणाची पैंजण
मना कुणीसे आज वेढते.

आज उदासी मना भारुनी
उरी कुणीसे येई फिरुनी
कळेना असे का भिरभिरते मन
मनी प्रीत कुणाची फुले क्षणक्षण
प्रीत कुणाची मनी उमलते.

https://youtu.be/8g_lRY-rduk

Group content visibility: 
Public - accessible to all site users