
काल केस नं 73 हा चित्रपट कोथरुड सिटी प्राईडला पाहिला. पहिलाच शो. Dr मिलिंद आपटे , psychologist and counselor, यांनी या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे
मध्यंतरी मी विवाहासाठी मानसशास्त्रीय चाचणी बाबत सामाजिक जाणीवा असलेल्या सायकॉलॊजिस्ट व कौन्सिलर यांनाआवाहन केले होते. त्यानिमित्ताने माझी डॉ मिलिंद आपटे यांच्याशी परिचय झाला होता. जेव्हा त्यांनी या चित्रपटाची निर्मीती केली तेव्हा मला आश्चर्य वाटले.कारण चित्रपट निर्मिती हा त्यांचा प्रांत नव्हे. पण एकदा का सामाजिक जाणिवेचा किडा चावला की माणूस अस्वस्थ होतो. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.
चित्रपटाचे शीर्षकच सांगते की चित्रपट हा गुन्हेगारीवर आहे. गुन्हा ही मानसिक विकृती आहे. गुन्हेगार त्या विकृतीचा बळी असतो असे मानसशास्त्रात मानले जाते. हीच थीम घेउन या चित्रपटाची निर्मीती झाली आहे. मानसिक आरोग्यावर आतापर्यंत अनेक चित्रपट झाले आहेत. काही प्रबोधनपट आहेत तर काही थरार आहेत. एखाद्याच्या आयुष्यात बालपणी जर काही मानासिक आघात झाले असतील व ते ही लैंगिकता या विषयाच्या परिघातील असतील तर त्याला किती तरी आयाम आहेत.
सध्या एपिस्टिम फाईल्स चा विषय जोरदार चर्चेत आहे. लैंगिकता व गुन्हेगारी, (PTSD) तथा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर,पोक्सो या विषयाच्या चर्चा आता माध्यमातून होतात. त्याचे बळीही आपल्याला वाचायला मिळतात. पण यावर केवळ सामाजिक जाणीवा या हेतुने स्वखर्चाने एखादा मानसतज्ञ चित्रपट काढतो त्यावेळी चित्रपटाचे अर्थकारणातून त्याला जावेच लागते.
चित्रपट उत्कंठावर्धक आहे. गुन्हेगार कोण याचे अंदाज प्रेक्षक बांधत असताना चित्रपट त्याला अचानक वेगळेच वळण देतो.
चित्रपट बघितल्यावर निर्माता व दिग्दर्शक मिलिंद आपटे यांना प्रत्यक्ष भेटलो आतापर्यंत व्हर्च्युअल परिचय होता. थोड्या गप्पा व पुन्हा निवांत भेटण्याचे ठरवून आम्ही निरोप घेतला.
सामाजिक जाणिव, मानसशास्त्र
सामाजिक जाणिव, मानसशास्त्र आणि गुन्हेगारी हा विषय याचा संबंध लक्षात आला नाही. म्हणजे चित्रपट नेमका कसा आहे याबद्दल काहीच समजले नाही.
उत्तम ओळख प्रघा. पाहीला
उत्तम ओळख प्रघा. पाहीला पाहीजे हा सिनेमा. चटका ही मी लिहीलेली कथा, लैंगिकता आणि मनावरील आघात या विषयावरती आहे.
----------
पेडोफाइल लोकांत २ प्रकार आहेत असे वाचलेले आहे - एक कंपल्सिव्ह पेडोफाइल तर दुसरे असेच गुन्हेगारी वृत्तीचे. पैकी पहील्या कॅटेगरीतील लोकांना माहीत असते की काहीतरी करायला हवे, परंतु डॉक्टरकडे जायचेही भय वाटते की पोलिसांत दिले तर काय घ्या. आणि ही विकृती चिघळत रहाते. भयंकर अहे हे सर्व.
-------------
पिंकी विराणी यांचे बिटर चॉकलेट - हे पुस्तक फार फार फार पूर्वी वाचलेले. अस्वस्थ करते.
इथे त्याचा ट्रेलर आहे https:
इथे त्याचा ट्रेलर आहे https://youtu.be/zPlWWXTeuPQ?si=J4rvajeM7nTeVQBN