AI , विजेची गरज , वीज कंपनी , गुगल आणि अडाणी

Submitted by ताजे प्रेत on 14 January, 2026 - 11:36

आज गुगल ने त्यांच्या डेटा सेंटर ची विजेची प्रचंड मागणी लक्षात घेऊन एक वीजनिर्मिती कंपनी विकत घेतली

एक भीषण गोष्ट लक्षात आली का ?
कोणी AI बद्दल काहीही ऐकले नसेल तेंव्हा २००४/५ मध्ये अडानी ने प्लान केला
आणि २००६ मध्ये पहिला पॉवर प्लांट उभारला

आणि अडानी पॉवर ने बराच विस्तार केला
अगदी विदेशातून कोळसा आणण्याचा पर्यंत केला

अगदी AI कोणी ऐकले नव्हते तेंव्हा २०१९ मध्ये अडानी ने डेटा सेंटर बिझनेस मध्ये प्रवेश केला .

कोणी त्यांना माहिती दिली असेल ? कशी त्यांना माहिती मिळत असेल ???
माझा थरकाप होत आहे

इकडे मात्र लोक टाटांबद्दल काहीही बोलत नाहीत
टाटा सगळ्यात खतरनाक छुपा रुस्तम आहेत

त्याची १९१९ मध्ये टाटा पॉवर ची स्थापना केली - १९१९ मध्ये!!!
आणि १९६८ मध्ये टीसीएस कि स्थापना केली
आजही टाटा AI किंवा डेटा सेंटर मध्ये नाहीत असे लोक समजतात
पण खरे तर तेच गेम मध्ये आधीपासून आहेत

Group content visibility: 
Use group defaults

मस्क सोलर पावर्ड (कॉस्ट इफेक्टिव) डेटा सेंटर्स अवकाशात उभारंत आहे. ते कमिशन्ड झाले कि पृथ्वीवरचे डेटा सेंटर्स (पांढरे हत्ती) मोडिस निघतील...

देशातील उद्योगपतींवर /मोठ्या उद्योजकांवर आगपाखड करणे ही गोष्ट काही नेते करत आहेत. याउलट काम युरोप अमेरिकेत आहे. चीननेही आपला साम्यवाद सोडला आहे. रशियानेही सोडला.

देशातील उद्योगपतींवर /मोठ्या उद्योजकांवर आगपाखड करणे ही गोष्ट काही नेते करत आहेत. याउलट काम युरोप अमेरिकेत आहे. चीननेही आपला साम्यवाद सोडला आहे. रशियानेही सोडला. >>> मला वाटते राजकारण बाजूला ठेवले तर हे उद्योगपती किती नोकऱ्या निर्माण करत आहेत हे पण पहिले जात आहे. कमी नोकऱ्या याचा अर्थ की खूपशी कामे कंत्राटी पद्धतीने होत आहेत आणि त्यामुळे लोकांना त्याच्या उपजीविकेच्या स्रोताची खात्री नाही. उद्या त्या उद्योगपतीने दुसरीकडे कंत्राट दिले की पहिली कंपनी यांना घरी बसवणार, ते थोडी IT कंपनीसारखे वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत असतात.