भारतात अनागोंदी माजू शकते का?

Submitted by शाम भागवत on 14 January, 2026 - 07:29

https://youtu.be/iMSlfNNhYcc?si=FxwPDV18AKiKCfX4&t=1
काल वरचा व्हिडीओ पाहिला. विचार करण्यासारखा वाटला. मग मी सारांश लिहून काढून मग तो मिसळपाववर टाकावा असे ठरवले. अर्घ्यातासाचा व्हिडीओ पहायला फारसा लोकांना वेळ नसतो. पण थोडक्यात कोणी सांगत असेल तर मात्र लोकं ऐकायला/ वाचायला तयार असतात. हाच विचार करून हा प्रयोग करून पाहातो आहे. Happy

०:०० ते १२:५१
१.पूर्वी आपण नोटा छापायचं काम करण्यासाठी प्रिंटिंग प्लेट्स वापरायचो. विशीष्ट प्रकारचा कागद बाहेरून मागवून तो वापरायचो. या प्रकाराला प्लैट बेड पध्दत म्हटले जायचे. पाकिस्तानला हा कागद मिळवता आला आणि त्या प्रिंटिंग प्लेटस् बनवता आल्या की पाकिस्तानला खोट्या नोटा बनवणं अगदी सहज शक्य होते असे. नोटबंदीनंतर पाकिस्तानने उभारलेला हा उद्योग बंद पडला. पण हा तात्पुरता फायदा होता.

नविन डिझाईन नवीन प्रकारचा कागद इपोर्ट करून नवीन नोटा छापून हा प्रश्न आपण काही काळासाठी सोडवला तरी पाकिस्तान यावर तोडगा काढणार हे आपल्याला माहीत होतं. कारण कागद बाहेरून मागवला होता व त्याची माहिती पाकिस्तानला मिळवणं अशक्य नव्हतं पण अवघड होतं. त्यामुळे काही काळ उसंत मिळणार होती.
मात्र आता आपण नवीन तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे. त्याला सिलींडरिक मोल्ड पध्दत म्हणतात. या सिलिंडरमधे नोटांचे सर्व सुरक्षीततेचे तपशील भरलेले/खोदलेले असतात. कागद बनवायचा लगद्यामधे हा सिलिंडर टाकला जातो व त्यांत फिरवला जातो. म्हणजे लगदा त्या सिलिंडरवर जमा होऊन कागद तयार होतो. त्यामुळे कागद तयार होणे व त्यावर नोटेचे सगळे तपशील उमटणे एकदमच होते.

हे आधुनिक तंत्रज्ञान फक्त चार ठिकाणीच वापरलं जातंय. इतकं ते नवीन आहे. त्यामुळे पाकिस्तानला खोट्या नोटा बनवणं सहज सोपं राहिलेलं नाही. शिवाय नोट छापायचा खर्च आता खूपच कमी झालाय. वेग प्रचंड वाढलाय. तसेच खोट्या नोटा शोधणं फारच सोपं झालंय. एकवेळ पाकिस्तानला भरपूर प्रयत्नाअंती कागद तयार करणं जमू शकेल पण सिलिंडर बनवायला अतिशयच अवघडं आहे. कारण तो सिलिंडर आपण बनवला आहे व त्याचे डिझाईन आपल्याकडेच आहे.

१६:०५ ते १७:५८
२. देशांत अतिरेकी तयार होणे, आंदोलने, त्यात जाळपोळ, हिंसाचरा होऊन देशांत अंधाधुंदी माजणं ह्या गोष्टी अर्थव्यवस्था ठीक नसल्यामुळे होतं असतं. नजीकच्या इतिहासात बघता हेच दिसतंय. प्रथम श्रीलंका, मग बांगला त्यानंतर नेपाळ मधे असंच घडलंय. इराणमधे तर आपण सध्या अनुभवतच आहोत. भारताताही विरोधी पक्ष असं काही व्हावं म्हणून प्रयत्न करत असूनही, काहीही होत नाहीये, कारण भारतातली अर्थव्यवस्था एकदम ठीक आहे. सतत वाढतीय. रोजगार वाढतोय. परदेशी गुंतवणूक येत राहतीय. तंत्रज्ञान येत राहीलंय. महागाई आटोक्यांत आहे.

जेन जी ला मुद्रा लोन मिळतंय. मुख्य म्हणजे मुद्रा लोनमधे बुडीत खात्याचं प्रमाण कमी कमी होत चाललंय. मुद्रा लोनमधील सरकारी बॅंकांचे पैसै बुडण्याचं प्रमाण ३-४ टक्के इतकच आहे. तर खाजगी बॅंकांत ०.९५ टक्के इतकंच आहे. आणि २०१५ ते २०२५ या कालावधीत एकूण ३३ लाख कोटी एवढं कर्ज दिलं गेलंय. निरनिराळ्या छोट्या उद्योगांसाठी हे दिलंय व ह्या एकूण उद्योगांची संख्या आता ५२ कोटी झालीय. गंमत म्हणजे राहूल गांधींना वाटतंय की हे जेनजी उठाव करतील. मोदींना पळवून लावतील. पण तसं काहीच होत नाहीये. आंदोलने होताहेत. पदयात्रा निघताहेत. आरोप होताहेत. पण वावटळ जाओ साधा वाराही वाहात नाहीये.

१९:०९ ते २१:३८
३. चीन बॉर्डरकडे आपण दुर्लक्ष केलं. का? तर चीन नाराज होईल. भारताचे माजी संरक्षण मंत्रीॲटंनी म्हणतात की, आमच्या काळात चीनने सिमेवर कुरबुरी केल्या नाहीत. आता मात्र चीन कुरबुरी करतोय. कारण एकच. मोदींचं धोरण चुकतंय.

पण चीनने बॉर्डरपर्यंत सहा लेनचे रस्ते बनवले. रेल्वे आणली तरी आपण काहीच करायचं नाही? ते एका दिवसांत बॉर्डरवर येणार. आपल्याला पोहोचायला ३ आठवडे लागणार. कुमक पोहोचेपर्यंत सिमेवरील सगळे सैनिक गारद झालेले असणार.

गलवान झालं. डोकलाम झालं. पण का झालं? आपण सिमेवर रस्ते व पूल उभारायला लागलो म्हणूनच झालं ना? जर शत्रूला आपलं वागणं योग्य वाटत नसेल तर आपण योग्य तेच करतोय असंच समजायला पाहिजे.

आता आपणही एक दिवसात मोठी कुमक सिमेवर पाठवू शकतो. काही ठिकाणी तर सहा तासात पोहोचू शकतो. रणगाडे नेणारी विमाने उतरवू शकतो. तशा सोयी झाल्या आहेत. सिमेवरच्या सैनिकांचे मनोधैर्य आता किती उंचावले असेल याची कल्पना करून पहा. ही सैन्यशक्ती भारतात अराजक माजले तर मोदींना सोडून राहूल गांधीच्या बाजूला वळेल?

२२:०८ ते २४:१७
४. २०१४ च्या अगोदर गरीब लोकांकडे बॅंकखाती नव्हती. असा समज होता की खात्यात पैसे ठेवायला त्यांच्याकडे पैसे कसे असतील? २०२५ पर्यंत ५६ कोटी गरीबांची झीरो बॅलन्स खाती उघडली गेली आहेत. २०२५ च्या शेवटी त्यांत २.६७ लाख कोटी रूपये शिल्लक होती. ह्या खातेदारातील ६७ टक्के ग्रामीण/ निमशहरी भागातील आहेत.
पूर्वी एखाद्या गावातील कोणाला एखाद्या स्कीममधून पैसे मिळायचे असतील तर प्रधानमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्री कार्यालयाकडे, मग चीफ सेक्रेटरीकडून अर्थखात्याच्या सेक्रेटरीकडे, मग डिव्हीजिनल कमीशनर, मग डिस्ट्रिक्ट मॅजिस्टेट म्हणजे कलेक्टर, मग तिथून सीडीओ, जिल्हा परिषद मग गावप्रमुख व ग्रामसेवक अशी उतरंड असे. प्रचंड वेळ खाऊ पध्दत होती ती. शिवाय प्रत्येक टप्यावर भ्रष्टाचार होत असे. राजीव गांधींनी तर सांगितले होते की, केंद्रातून एक रूपया ग्रामिण लाभार्थीसाठी दिला गेला तर त्यातले १४ पैसे लाभार्थ्याला मिळतात. उरलेले ८६ पैसे मधल्यामधे गडप होतात. आता पूर्ण रुपया लाभार्थीला मिळतो व तो ही तात्काळ. पूर्वीची पध्दत व आत्ताच्या पध्दतीमधील फरक कळणारा आंदोलने करून मोदींना सत्तेवरून खाली खेचायला मदत करेल ?
‌
२४:२५ ते शेवट
५. असं म्हटलं जातं की, मोदी सरकार इडीचा खूप वापर करते. पण लक्षात घ्या युपीएने जरी इडीचा कायदा केला असला तरी ते त्याची अंमलबजावणी करण्यात कमी पडले. युपीआय पेमेंट सिस्टिम आल्यावर कॅशमधे मोठे व्यवहारच होत नाही.

जर झाले तर तात्काळ ते नजरेस येतात. डिजीटायझेशनमुळे आर्थिक व्यवहारांचे ट्रेस शोधणे खूप सोपे झाले आहे. घोटाळे झटकन उघडकीस येतात. बेनामी कंपन्यांचे जाळे उभे करून भुलभुलैय्या निर्माण करणे आता इतके सोपे राहिलेले नाही. याचा फायदा मोदींना होतो हे कोणी लक्षातच घेत नाहीये. तेलगी घोटाळे आता होऊच शकत नाहीत. लपवाछपवी आता करताच येत नाही.

आता अर्थव्यवस्थेचे जाळे तुकड्या तुकड्यात विणले जात नाही. ते आता एकसंध झालंय. कागदी नोटा, डिजिटल करन्सा,स्टँप पेपर, सेंट्रल बँक, इतर सरकारी व खाजगी बँका, सरकारी मुद्रणालय, सरकारी प्रेस सगळे एकत्र काम करतात. पण हे सगळं मोदींनीच केलंय ना मग त्यांना घोटाळे अगोदरच्या सरकारपेक्षा भरभर सापडतात हा दोष त्यांचा कसा काय ?

https://youtu.be/iMSlfNNhYcc?si=FxwPDV18AKiKCfX4&t=1

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

१.या विडिओत एक मुख्य असा मुद्दाच नाही. त्यामुळे फारसे बोलता येणार नाही.

२.चीनबद्दल बोलायचे तर...>>चीन बॉर्डरकडे आपण दुर्लक्ष केलं. का? तर चीन नाराज होईल>>
आता या महासत्ता लश्करी महासत्ता होण्यापेक्षा आर्थिक महासत्ता होऊ पाहात आहेत हे माझे मत. यूएस दूर असला तरीही तो तेच करत आहे. तुम्हाला जिवंत ठेवण्यात आणि स्वतंत्र ठेवण्यात त्यांचा अधिक फायदा आहे.
एवढंच.

Only eight or 0.1 per cent of 5,892 cases filed by the Enforcement Directorate (ED) under the anti-money laundering law between January 1, 2015, and June 30, 2025, have led to convictions, the government told the parliament.
Happy Happy Happy

The Enforcement Directorate (ED) has withdrawn its petition in the Bombay High Court against NCP (Ajit Pawar faction) leader Chhagan Bhujbal and his nephew Sameer Bhujbal, seeking the quashing of a 2018 order in their favor.
Although the petitions were filed in 2018, they recently came up for hearing. During September and October this year, the ED informed the court that it couldn't locate its own petition against the Bhujbals.
Happy Happy Happy Happy Happy

चीनमध्ये अराजक माजले आहे का? नाही ना ? मग आता त्यांना सरकारी कंत्राटे आपले सरकार देणार आहे , काही दिवसांनी देशही चालवायला देण्यात येईल. ते अराजक माजू न देण्याची काळजी घेतील. काळजी करु नये. Happy Happy Happy

NkKnk

लेखावर प्रतिक्रिया म्हणून गालिबचा शेर आठवला - विशेषत: नोटाबंथदी, मुद्रा लोन, जेन झी वरून
हम को मालूम है जन्नत कि हकीकत लेकिन
दिल के बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है

मुद्रा लोनच्या डिफॉल्ट्सबद्दल लिहीन. तूर्तास जेन झी. देशभरात तरुण स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरतीतील अनागोंदीमुळे त्रस्त आहेत.
मागे मोदींनी पकोडे तळणे हा मोठा रोजगार असल्याचं म्हटलं होतं. आता रील बनवणे म्हणजे नवनिर्माण असाही संदेश दिला.

स्मायली का थांबल्या?
मला हा शेर लिहायचा होता.

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या गम है जिसको छुपा रहे हो

मुद्रा लोन डिफॉल्टबद्दल तुम्ही लिहाल तोपर्यंत स्मायली Happy
सविस्तर लिहा. एक उदाहरण देऊन त्याचं जनरालायझेन करण्यामधे मजा नाही.
Happy

स्पर्धा परिक्षांबद्दल लिहिताना त्यांचं एकूण जेनजीशी प्रमाणही सांगा.
Happy

The Non-performing Asset (NPA) rate against outstanding amount under Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) for Scheduled Commercial Banks has risen from 5.47 per cent at the end of March 2018 to 9.81 per cent as on March 2025, Parliament was informed on Tuesday.

ईडीचा कन्हिक्शन रेट दिलाय. आणि जे भुजबळांच्या केसमध्ये झालं तशा शेकडो केसेस आहेत. भुजबळांच्या केसवरून तुमच्या डिजिटल इंडियाचं पितळ उघड पडलं की ईडीचं की दोघांचं ते तुम्ही सांगा

एकूण किती जेन झी मुद्रा लोन घेते ते सांगा. Happy मुद्रा लोन कोण घेतं, ती योजना कोणासाठी आहे तेही लिहा. Happy
स्पर्धा परीक्षांत सरकारी नोकरभरतीपासून नीट पर्यंत सगळ्या आल्या. हे लोक आंदोलन करतात त्यामागे राहुल गांधी आहे, असं लिहून टाका.;)

वरच्या मुद्दा ४ बद्दल.
DBT युपीएच्या काळातच सुरू झाली.
नेहरू, इंदिरा, राजीव यांच्या काळात dbt करायचं तर तर त्यांना करोडो चेकवर सह्या करत बसावं लागलं असतं. आता मोदी स्वत: लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा करतात, तसंच.‌
या योजनांमध्ये घोटाळे नाहीत , असं म्हणायचंय का? किसान सम्मान, शिष्यवृत्ती, आरोग्य विमा अशा अनेक योजनांत घोटाळे उघडकीस आले आहेत. मायबोलीवरही त्याबद्दल वेळोवेळी लिहिलं गेलंय.
हौशी शेतकऱ्यांना पण किसान सम्मानचे पैसे व इतर सबसिड्या मिळतात.
लाडकी बहीण आणि आता बिहारची अशीच १०००० देणारी योजना यात चक्क पुरुष लाभार्थी आहेत.
तुम्ही राजीव गांधींनी काय सांगितलं ते जपत रहा. ते व कॉंग््रेस आपल्या शासनातल्या चुका कबूल करतात. भाजपवाले चुका दाखवणाऱ्यांना देशद्रोही, सोरोस, पडीप स्टेट, पाकिस्तान असलं काय काय म्हणतात.

बरं पण तुम्ही हिंदू हित, नियती हे सोडून ये कौनसी लाइन में चले आए?

तुम्हांला फक्त त्याचीच काळजी आहे .
भाजपने निवडणुका जिंकाव्यात आणि सत्तेत राहावं एवढीच तुमची concern हे पुन्हा अधोरेखित झालं.
चुकून भाजपच्या. कारभाराबद्दल बोलायला गेलात आणि काय झालं बघा.
बरं तुमच्या हिंदुत्ववाद्यांनी निर्माण केलेल्या अनागोंदीबद्दल काय म्हणताय? रामनवमी, हनुमानजयंती, महाशिवरात्रीच्या मिरवणुकींत मशिदी दर्ग्यांसमोर नाच, गाणी , ख्रीसमसला चर्चसमोर हनुमान चालीसा वाचणं , तोडफोड करणं याला अनागोंदी म्हणायचं की रामराज्य?

एनपीए बाबत
पार्लमेंटमधे विचारलेल्या प्रश्नानुसार उत्तरे दिली जातात. जर मूळ प्रश्न विचारात घेतला नाही तर गोंधळ उडतो.

मी आरबीआयची आकडेवारी देतोय.
स्त्रोत: आर्थिक वर्ष २०२४-२५
वर्षसमाप्ती एनपीए एकूण एनपीए प्रमाण (%)
३१.०३.२०२१ ६,१६,६१६ ९.११
३१.०३.२०२२. ५,४०,९५८. ७.२८
३१.०३.२०२३. ४,२८,१९७. ४.९७
३१.०३.२०२४. ३,३९,५४१. ३.४७
३१.०३.२०२५. २,८३,६५०. २.५८
प्रथमच मुद्देसुद चर्चेबद्दल धन्यवाद.

अहो, तुम्हीच प्रथम मुद्दे लिहिलेत. मी वर लिहिलंय ना, हिंदूहित, नियती यापेक्षा वेगळे लिहिलेत.

रिझर्व बॅंक npa साठी प्रोव्हिजन करताना per centage of outstanding amount सांगते. म्हणून तोच आकडा महत्त्वाचा, असे काही तज्ज्ञ म्हणतात.

नियती?
हिंदूत्व?
हे मी लेखात कुठेच लिहिलेलं नाही.
Happy

लेख आणि युट्यूबवरच्या प्रवचनात मजा नाही. नोटाबंदीवर धुरंधर सिनेमा आला तसे इतर मुद्द्यांवर रापचिक पिच्चर यायला हवेत.

{२०१४ च्या अगोदर गरीब लोकांकडे बॅंकखाती नव्हती. असा समज होता की खात्यात पैसे ठेवायला त्यांच्याकडे पैसे कसे असतील
२००५ मध्ये zero balance account scheme सुरू झाली. २०१२ मध्ये तिचं नामकरण Basic Savings Bank Deposit Account असं झालं.
मोदींना बारशाच्या घुगऱ्या खूप आवडतात. त्यांनी इतर अनेक जुन्या योजनांप्रमाणे याचं नाव बदलून जनधन केलं.
2011, the UPA government launched the ‘Swabhimaan’ campaign to
bring millions of unbanked people within the fold of formal banking. Th e entire fi nancial institutional architecture
was leveraged, banks were asked to open new ultra small branches in every village with more than 2,000 population,
appoint banking correspondents, and open no-frills savings bank accounts.
आबार्डचा फायनान्शल इन्क्लूजन रिपोर्ट

Pages