Submitted by हर्षल वैद्य on 11 January, 2026 - 23:33
शंभरेक वर्षांपूर्वी
आस लागली एका झाडाला पुन्हा बी होण्याची
मातीत मिसळून शतरूपांनी पुन्हा उगवून येण्याची
आणि केलं त्यानं तसं खरंच
भोगले पुन्हा रुजून येण्यातले कष्ट
एकेका नवीन बीजाला जोपासलं पूर्ण रोप होताना
आणि पाहिलं रानभर पसरलेलं, रुजून आलेलं जोमदार पीक
वर्धिष्णु
आज कळतं
शंभर वर्षांनीही तितकेच आहेत कष्ट, मानसिक ताण, आशा निराशेचे हिंदोळे
पुन्हा बीज होण्यात
आणि आनंदही आहे
रुजवलेलं एखादं जरी बीज पुन्हा उगवून आलं
तर त्याला मोठं होताना बघण्यात
मला बीज व्हायचंय
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान ..!
छान ..!
ही कविता डॉक्टर
ही कविता डॉक्टर आंबेडकरांबद्दल आहे का?
छान ..!
छान ..!