७० च्या दशकातल्या पिढीकडे एक तर कुत्सित नजरेने पाहिले जाते किंवा मग खूप नॉस्टॅल्जिया असतो.
या पिढीने फिक्स्ड फोन्स चा जमाना पाहिला आहे आणि आता मोबाईल क्रांतीही पाहिली आहे. गेल्या दोन दशकातला तंत्रज्ञानाचा झपाटा पाहिला आहे. २००० नंतर जन्मलेली पिढी या तंत्रज्ञानाने वेढलेली आहे. त्यांना ७० ची पिढी मागास वाटते. त्यांचे विचार हास्यास्पद वाटतात. सोशल मीडीयावरच्या चर्चेत ही पिढी तंत्रज्ञानाचा वापर कसा अपरिहार्य आहे हे सांगते. हळूहळू बदल अनुभवलेल्या पिढीचे शहाणपणाचे बोल त्यांन इरीटेटिंग वाटतात. तर रेट्रि पिढीला जेन झीचं वागणं बुचकळ्यात टाकतं. जगासोबत चला हा मंत्र धुडकावताही येत नाही आणि स्विकारताही येत नाही. तर दुसरीकडे सतत स्पर्धा असल्याप्रमाणे विनाकारण स्ट्रेस घेतलेल्या या पिढीला पुढचे धोके जाणवत नाहीत.
२००० च्या नंतरच्या पिढीत आणि ७० च्या दशकातल्या पिढीमधे खूप अंतर पडलेय का ? कदाचित त्यांचं बालपण -कुमारवय ते जबाबदार व्यक्ती होणं हा प्रवास आजच्या पिढीला अध्भुतरम्य वाटत असेल. जास्त काही लिहीत नाही.
हा व्हिडीओ पहा. आणि काय वाटतं ते सांगा.
https://www.youtube.com/watch?v=Sbi0UNdCxB4