ही कथा मुक्त सोर्स आहे. कुणीही यावर मराठी पिक्चर बनवू शकतो. अट एकच, यातून जी कमाई होईल ती मराठी कलकारांच्या वेल्फेअर फंडात जमा करावी. यातून त्यांचा आरोग्य विमा, बेकार भत्ता असे खर्च भागवावेत ही अपेक्षा.
बजेट ; १५०० कोटी
धंदा : किमान ३५०० कोटी
अपेक्षित कलाकार - स्वप्नील जोशी, सुबोध भावे, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी आणि दिव्य बालकाच्या भूमिकेत नाना पाटेकर
स्थळ - वडनगर रेल्वे स्टेशन
एक देखणा युवक वडनगर रेल्वे स्टेशन वर चहाचा आस्वाद घेत होता पण त्याचं ल़क्ष चहा आणून देणार्या मुलावर होतं. हा चुणचुणीत मुलगा आपल्या कामाला येईल ही त्याची अटकळ होती. त्याने त्या मुलाला दहा रूपयांची बक्षीसी दिली. मुलगा हसला. त्याने नोट परत केली. तो युवक हसला. त्याने मग त्याला बिडी दिली. मुलाने एका थांबलेल्या रेल्वेगाडीत जाऊन बिडी ओढली.
युवकाने मुलाची माहिती विचारली. त्याच्या माहितीत ते नाव आल्यावर तो समाधानाने हसला.
तो ही त्या रेल्वेगाडीच्या दुसर्या डब्यात गेला. सिगरेटच्या पाकीटातून त्याने एक चपटी मशीन काढली. त्याच्यातून एक पातळ अॅटेना काढला. मग गुंडाळी केलेली एरीयल त्याने रेल्वे डब्याच्या धातूच्या भागांना स्पर्श करत लांबच्या लांब बांधली. आता अँटेना त्याने एरीयेलच्या दोन पातळ तारांना बांधला. मशीन मधून टुक टू डु टुक टू डू बीप बीप असा आवाज येऊ लागला.
" अल्फा टू रॉजर हिदायत खान हिअर "
"रॉजर टू अल्फा, हुजूर बंदा मिल गया है "
" क्या उसी देशद्रोही संघटनको मानता है "
" जी जनाब "
" काम क्या करता है ?"
" चाय बेचता है ?"
"कहां पर ?"
" जी वडनगर रेल्वे स्टेशन पर "
" क्या ? लेकीन ये कहा है ?"
" जी वडनगर मे "
" हां लेकीन वहां पे रेल्वे लाईनही नही है "
" जी जनाब. वो फ्युचर मे है जनाब "
" तो अभी चाय कैसे बेच रहा है ?"
" यही तो. इसीलिये इस लडके को हमने चुना है "
" माशा अल्लाह, खुदा खैर करे, उल्फत, रुखसत, बिलामत शुरू करे "
" क्या जनाब ?"
"ऑपरेशन बिलंदर "
सन २०१९
" जी जनाब मै बिलंदर"
" रॉजर "
" वही वही. वो दिन है और आज का दिन है "
" जी जी तुम्हारे लडके ने कमाल कर दिया "
" जी जी, हमारे लोगों को आरडीएक्स के साथ अंदर घुसाया "
" ते बहुते तेज है, हमारे मुल्क मे होता तो सारे अपोझिशन को ऐसे जुल्म के लिए अंदर कर देता जो जुल्म इसने खुद किये हो "
" जी जनाब "
" लेकीन हमारा भी तो फायदा है "
" जी जी. दोनो मुल्क की हुकूमत को अवाम को गुमराह करने के लिए हम इनके उपर ही निर्भर है "
" निर्भर ?"
" जी जनाब, इतके सालों मे हिंदुस्तानी मुल्क मे, इस शुद्ध हिंदी वाले संघटने के साथ काम करके जुबां थोडी फिसलू हो गयी है "
" तू मत फिसल "
" १४ फेब्रुवारी पक्का ना ?"
"जी जी "
" तो वजीर ए आझम को बयां करे की काम हो जायेगा "
स्क्रीनवर टायटल झळकू लागतात
बिलंदर
मग दोन माणसं येतात. ते एकमेकांना मारहाण करू लागतात. इतक्यात अजून चार माणसं येतात. ती या दोघांना मारू लागतात. पण दोघे जण एक होऊन त्यांना मारू लागतात. मग सहाच्या सहा जण एकमेकांना मारू लागतात. हे पाहून रस्त्यावरचे पब्लीक त्यात सामील होते. आता आख्खे शहर एकमेकांना मारू लागते.
इतक्यात एक देखणा युवक काळे कपडे घालून गरब्यात डान्स करू लागतो.
हे नाम रे , सबसे बडा तेरा नाम
ओ जनाबे अली
ओ खयाले अली
बिगडे बना दे मेरे काम काम रे
लोक वाहवां म्हणतात.
कलंदर भईजान आपका जवाब नही.
मग कलंदर आपली स्टेनगन काढतो आणि जमलेल्या सर्वांना मारून टाकतो.
बहोत दिन हो गये किसीको माराही नही था.
बिलंदर कलंदरला स्माईल देतो.
पण त्याचं मन आतून आक्रंदत असतं. कारण मेलेले सर्व पाकिस्तानी असतात. त्याच्या देशाचे लोक !
पण हे दु:ख न दाखवता तो डी डे साठी ते सहन करतो.
पुढची स्टोरी आत्ता उघड करता येणार नाही. ज्यांना हा ट्रेलर आवडला असेल त्यांनी संपर्क साधावा.
देण्याघेण्याचं बोलण्यासाठी शिवशंकर हिंदू हॉटेलच्या बाहेरच्या बाकड्यावर भेटावे.
आपलाच
एक लेखक