रॅशनॅलिस्टस आणि आस्तिकांतल्या चर्चा या तत्वज्ञानातल्या समजायच्या कि विज्ञानातल्या ?
समजा एक जण सायन्स स्कॉलर आहे आणि एक जण फिलॉसॉफी मधला डॉक्टरेट आहे, तर त्यांच्या मधे तत्वज्ञानविषयक चर्चा कशी झाली पाहीजे ?
सायन्स स्कॉलर म्हणेल कि सायन्स अंतिम आहे, पण त्याला आस्तिकांचे धार्मिक तत्वज्ञान माहितीच नाही आणि धार्मिक तत्वज्ञानाचा स्कॉलर म्हणेल कि सायन्सला मर्यादा आहेत तर निष्कर्षाला कसे पोहोचता येईल ?
पूर्वीच्या काळी विद्वतसभा होत, त्यात त्या काळच्या ज्ञानशाखांमधले पारंगत दोन पक्ष असत. वादविवादात हरलेल्यांना सांगेल ती शिक्षा मान्य करावी लागे. पण त्यासाठी हार जीत निश्चित करणारा तटस्थ पक्ष असे ज्याची नेमणूक दोन्हीही बाजूंना मान्य असे.
हे सांगण्याचे कारण म्हणजे लल्लनटॉप वर सौरभ त्रिवेदी यांनी नुकतीच एक चर्चा घडवून आणली. यात त्यांनी रॅशनॅलिस्ट पक्षातर्फे जावेद अख्तर यांना पाचारण केले. जावेद अखतर हे त्यांच्या चुरचुरीत बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विरोधात त्यांनी आस्तिक पक्षाची बाजू मांडण्यासाठी मुफ्ती शमैल नक्वी यांना पाचारण केले होते. मुफ्ती म्हणजे मौलवी असेल कदाचित. तर हे मौलवी तरूण असल्याने जावेद साहेब त्यांचा क्षणात चट्टामट्टा करतील अशी अपेक्षा होती. ही चर्चा व्हायरल झाली आहे. लाखो करोडो लोकांनी पाहिली आहे. हजारो व्हिडीओज मधे या चर्चेचा कंटेट आहे.
मुफ्ती साहेबांनी सुरूवातीला जावेद साहेबांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जावेद यांनी त्यांची तीक्ष्ण व्यंगबुद्धी वापरत धारदार प्रहार केले. पण या युक्तीवादांच्या खेळात चर्चेचं मातेरं झालं.
मौलवी साहेबांनी बर्याच इंग्रजी टर्म्स वापरल्या. कदाचित मौलवी तत्वज्ञानाचे स्कॉलर असावेत. नसतील तर त्यांनी रँडम गुगल सर्च किंवा कोरा डॉट कॉम सारख्या वेबसाईट्सचा रट्टा मारलेला असावा. अशा शॉर्टकटने दिपवून टाकल्याने चर्चेचं मातेरं झालं.
Probability Argument यावर एक धागा तीन दिवसांपुर्वी काढला होता. जर कुणाला चर्चेत इंटरेस्ट असेल तर मौलवींच्या इंग्रजी टर्म्सचे पोस्टमार्टेम कसे होईल हे पाहूयात. नाही तर इथेच अपडेट देईन.
ही चर्चा पाहून ती कशा पद्धतीने व्हायला हवी होती हे सांगा.
माझ्या अज्ञानी बुद्धीला जे वाटलं त्याचा सारांश खालील प्रमाणे :
Does God Exist? या मूलभूत तात्त्विक प्रश्नापेक्षा ही चर्चा वक्तृत्व, प्रतिमा-निर्मिती आणि इर्रिलेव्हंट युक्त्यांकडे जास्त झुकलेली दिसते. दोन्ही बाजूंनी झालेल्या प्रमुख चुका आणि इर्रिलेव्हन्स कसा वापरला गेला आपण इथे पाहूयात.
१. मूळ प्रश्नच बदलणे (Shifting the Question )
मूळ प्रश्न: ईश्वर अस्तित्वात आहे का? (metaphysical / epistemological प्रश्न) हा होता.
चर्चेत काय झाले:
मूळ प्रश्न ईश्वर नैतिकदृष्ट्या उपयुक्त आहे का? किंवा धर्म समाजाला शिस्त देतो का?,
किंवा सायन्स अजूनही सर्व काही सांगू शकत नाही अशा दिशेने घसरला.
- यातला एकही मुद्दा ईश्वर अस्तित्वात आहे का या प्रश्नाशी संबंधित नाही. हे मुद्दे इश्वराची उपयुक्तता काय याच्याशी संबंधित आहेत.
(Fallacy: Red Herring / Irrelevant Conclusion ).
२) मौलवींच्या बाजूच्या प्रमुख चुका
सायन्सचा गैरवापर (Misuse of Science)
मौलवी आस्तिक असून Big Bang / Fine Tuning / Entropy / Quantum uncertainty / Science can’t explain X
हे मुद्दे मांडत बसले. कुणी म्हणेल आस्तिक माणूस सायन्सचा विद्यार्थी असू शकत नाही का ? हे मला मान्य आहे. खरे तर हा मुद्दा घेण्याचे कारण काय होते ते टाईप करेपर्यंत विसरले गेले आहे. ती चर्चा पुन्हा पहावी लागेल. पण ढोबळमानाने एव्हढे सध्या सांगता येईल कि सायन्सच्या टर्म्स वापरून सायंटिफिक ऑर्ग्युमेण्ट्स कोळून पिल्याचा भास / देखावा निर्माण करण्याचा मौलवींचा प्रयत्न दिसला. याला आव आणणे असे म्हटले तरी चालेल. हा मुद्दा नंतर क्लिअर होईल.
ते सायन्सचा वापर स्पष्टीकरणासाठी करतात पण सायन्स हेच देव आहे असे काही म्हणत नाहीत. का ?
जिथे विज्ञान थांबते तिथे देव ( काहींच्या शब्दात अध्यात्म) सुरू होते हे प्रतिपादन चुकीचे आहे.
Fallacy: God of the Gaps ( माहीतीचा अभाव = देव आहे ).
गॉड ऑफ गॅप्स हे सातत्याने मांडल्याने ज्याला ही टर्म माहीती नाही तो पराभवच मान्य करेल. सोपे करण्याऐवजी अवघड करण्याकडे कल.
B) इंग्रजी टर्म्सचा प्रभाव (Jargon Fallacy)
(Fine tuning, teleology, probability, desig)) पण त्या टर्म्सची स्पष्ट व्याख्या नाही.
इथे जावेद अख्तर बराच काळ गोंधळले. नतरच्या सेशनमधे ते भानावर आले आणि या टर्म्स स्पष्ट करा असे म्हणू लागले. टर्म्स इंग्रजी आहेत ।आ आक्षेप नसून ज्यांच्या व्याख्या स्पष्ट नाहीत किंवा ज्या टर्म्स प्रचलित नाहीत त्या वापरून भंबेरी उडवून देणे हा उद्देश चर्चेत सहभागी होणार्यांना तत्काळ लक्षात आला पाहीजे. इथे काही साधी वचने कामाला येतात.
माहीती नाही असे सांगणे. समजावून सांगा असे म्हणणे. आपल्याला वाडवडलांनी सांगितलेले असते कि प्रश्न विचारून तुम्ही एकदा बावळटात जमा व्हाल पण तो नेमक्या वेळी न विचारल्याने आयुष्यभर मूर्खात जमा व्हाल.
पुढे - त्या शब्दांपासून देव निष्कर्षापर्यंतची तर्कसाखळी दाखवली नाही
इथे शब्दांचा वापर ज्ञानासाठी नाही, authority निर्माण करण्यासाठी होतो. याचा अनुभव घेतलाय का ? आमच्याकडेच authority आहे असा भास निर्माण करण्यासाठी सोप्या गोष्टी अवघड करून दिपवून टाकले जाते. याचा अर्थ ते मुद्दे रिलेव्हंट आहेत का ? तर उत्तर आहे - जरूरी नाही.
Fallacy: Argument from Obscurity / Jargon intimidation
जावेद अख्तर यांनी नंतर नंतर हे शब्द समजावून सांगा असा आग्रह धरला तो बौद्धिकदृष्ट्या योग्य आणि आवश्यक होता.
C) सायन्स = धर्माची साक्षीदार अशी मांडणी
सायन्स देवाला नाकारू शकत नाही म्हणजेच सायन्स अजून पूर्ण नाही हे बरोबर आहे, पण:
यावरून देव आहे असा निष्कर्ष निघत नाही . अज्ञानातून अस्तित्व सिद्ध होत नाही
Fallacy: Argument from Ignorance
३) जावेद अख्तर (रॅशनलिस्ट बाजू) यांच्या चुका
A) व्यंग आणि व्यक्तिमत्वाचा आधार
धर्मगुरूंचे अनुभव / श्रद्धेवर उपरोध / ऐतिहासिक अत्याचार
हे मुद्दे धर्मावर टीका करतात पण देव अस्तित्वात नाही याचे तर्क नाहीत.
Fallacy: Ad Hominem / Emotional Appeal
B) नैतिकता = देवाशिवाय शक्य आहे (हा मुद्दा इर्रिलेव्हंट)
हे विधान खूप वेळा आले: नैतिक माणूस देवाशिवाय , श्रद्धेशिवाय ही असू शकतो. म्हणजे देव, श्रद्धा यावर विश्वास न ठेवताही.
चला एकवेळ हे खरे आहे असे मानूयात. पण हे देव आहे का नाही या प्रश्नाशी थेट संबंधित नाही
Fallacy: Non Sequitur निष्कर्ष प्रश्नाशी जुळत नाही .
४) संचालक (Moderator) पातळीवरची चूक
मूळ प्रश्नावर परत आणण्याचा आग्रह कमी
देव आहे का? - धर्म चांगला/वाईट अशी घसरण. इथे सौरभ द्वि कि त्रिवेदी यांचा हस्तक्षेप गरजेचा होता.
टाईम लिमिट असावे का हा प्रश्न मी वाचकांवर सोडतो. मला ते ठरवता येणार नाही. पूर्वीच्या ज्या चर्चांचा उल्लेख केला त्या दिवसेंदिवस चालत असत.
चर्चा debate ऐवजी panel conversation झाली.
५) चर्चा नीट व्हायची असती तर काय हवे होते?
फक्त हे तीन प्रश्न हवे होते:
क्ष- देव म्हणजे काय? (व्याख्या)
य - असा देव अस्तित्वात आहे याचे तर्क/पुरावे काय?
ज्ञ - ते तर्क किंवा पुरावे logically valid आहेत का?
हे न करता दोघेही भावनिक, सामाजिक, भाषिक आणि प्रतिमात्मक शॉर्टकट्स वापरत राहिले. इथे प्रेक्षकांचा बुद्ध्यांक हा आपल्यापेक्षा कमी आहे हा माज जाणवत राहिला. माफ करा ऑरोगन्स साठी हा शब्द मी वापरला आहे. सौम्य शब्द लक्षात येत नाही.
आपल्याला काय वाटते ?
मात्र ही चर्चा एकदा ऐकलीच पाहीजे हे मात्र मी दहा वेळा म्हणेन.
प्रतिसाद नसणे म्हणजे दखल घेणे नाही हे ठाऊक आहे. दखल घेत असाल तर प्रतिसाद टाळण्यामागे काय कारण आहे हे सांगितले तर आभारी राहीन.
जर मुस्लिम असे म्हणत असेल की
जर मुस्लिम असे म्हणत असेल की अल्ला असे सांगतो की मूर्तीपूजा हे महापाप आहे. म्हणून मी जिथे जिथे मूर्तीपूजा होते आहे तिथे तिथे माझ्या परीने त्याचा विरोध करणार. शक्य असेल तर अशा मूर्ती आणि त्या जिथे आहेत ती देवळे तोडणे हे माझ्या अल्लाच्या मते पुण्याचे काम आहे. तालिबानने २००० साली बुद्धाच्या मूर्ती अशाच फोडल्या. गझनीच्या मेहमूदाने सोमनाथाची अशीच विटंबना केली. बाबर , औरंगजेब ह्या थोर इस्लामी राजांनी अशीच पुण्याची कामे केली.
तर अशा मोमीनावर आपला अल्लाच खरा जगनियंता आहे हे सिद्ध करून दाखवायची जबाबदारी आहे की नाही?
कुणाकुणाला सांगायचं कि मी
कुणाकुणाला सांगायचं कि मी कुणाचा ड्युआयडी नाही ते.
ऋन्मेषजी, मी इथे या डिबेटच्या इतिहासाची लिंक दिली आहे, ती उघडून बघा. डिबेट मधे सिद्ध करायचं नाही असं कसं म्हणता येईल ?
माझ्या मते इथे धागालेखकाला
माझ्या मते इथे धागालेखकाला लल्लनटॉप वर जी चर्चा झाली ती मुद्देसूद झाली नाही ही तक्रार आहे. त्यामुळं अशा चर्चेत आधीच काटेकोर नियम बनवले तर ती भरकटणार नाही. बुद्ध मूर्ती फोडणे हे फाटे फोडणेच आहे.
देव आहे का ? उत्तर हो आहे तर सिद्ध करा.
God ला Exit का बरं करताय
God ला Exit का बरं करताय
God ला Exit का बरं करताय >>
God ला Exit का बरं करताय >> सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात आणून दिलीत आपण. हे सर्वच निरर्थक झालं त्यामुळे !
बदलतो. लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.
नव्याने आलेले प्रतिसाद वाचनीय
नव्याने आलेले प्रतिसाद वाचनीय आहेत. फ्री झालो कि आणखी भर घालायचा विचार आहे.
आभार सर्वांचे.
>>
>>
माझ्या मते इथे धागालेखकाला लल्लनटॉप वर जी चर्चा झाली ती मुद्देसूद झाली नाही ही तक्रार आहे. त्यामुळं अशा चर्चेत आधीच काटेकोर नियम बनवले तर ती भरकटणार नाही. बुद्ध मूर्ती फोडणे हे फाटे फोडणेच आहे.
देव आहे का ? उत्तर हो आहे तर सिद्ध करा.
<<
मूर्ती फोडणे हे फाटे फोडणे वगैरे नाही. थेट विषयाशी संबंधित आहे.
एक सुंदर मूर्ती कुणाला दिसली तर ती फोडून नष्ट करावी अशी प्रेरणा कोण देतो? अर्थातच धर्म देतो. नाहीतर उगीच असे कोण करेल?
इस्लाम असे मानतो की कुराण हा देवाचा अखेरचा शब्द आहे. हो, देवाचा. जो आहे की नाही ज्याविषयी ही चर्चा आहे.
त्या कुराणातच देवाने असे सांगितले आहे की मूर्ती पूजन हे महापाप आहे . ते थांबवेल तो पुण्यवान.
तुम्ही जो पूजत आहात तो खोटा देव आहे. माझा देव अमूर्त आहे आणि तोच खरा देव आहे म्हणून मी मूर्ती तोडणार. असे म्हणणार्या मुस्लिम धर्मीयावर
देव आहे का हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. इतका विध्वंस करू इच्छितो तो कुठल्या पुराव्यावर आधारित आहे? असे विचारण्याचा हक्क अन्य धर्मीयाला आहे , नास्तिकालाही आहे. नास्तिकाला कुठल्या मूर्तीबद्दल आक्षेप असायचे कारण नाही.
पण त्यांना ते सिद्ध करून
पण त्यांना ते सिद्ध करून दाखवायची गरज आहे का?
जोपर्यंत आस्तिक लोक नास्तिकांवर तुम्ही सुद्धा देव मानायला हवे अशी जबरदस्ती करत नाहीत तोपर्यंत मला वाटते तसे ते सिद्ध करायची कोणालाच गरज नाही.>>
+१
“कोणालाच” ऐवजी “आस्तिकांना” चालेल.
शेंडे नक्षत्र आणि ऋन्मेष
शेंडे नक्षत्र आणि ऋन्मेष तुम्हा दोघांना मी इथेच उत्तर दिले तर मी स्वतःच स्वतःला काँट्राडिक्ट करीन. शेंडेनक्षत्र यांनी जो मुद्दा इथे उपस्थित केला आहे त्यामुळे या धाग्यावर वेगळीच चर्चा जन्माला येईल.
ऋन्मेष, तुम्ही या धाग्याचं प्रयोजन काय हे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही म्हणून हा प्रश्न विचारत आहात. जर आस्तिक आणि नास्तिक यांच्या मधे देव आहे किंवा नाही या विषयावर चर्चा आयोजित केली हे उघड आहे तर तुमच्या म्हणण्याला काय उत्तर द्यायचे ?
शेंडेनक्षत्र तुमच्या मुद्द्याच्या अनुषंगाने शाम भागवत यांनी प्रतिसाद दिला आहे. हे चर्चा वेगळ्या दिशेने जातेय याचे निदर्शक आहे. तरी पण मी हा मुद्दा निरूत्तरीत ठेवणार नाही. पण माझी अट एकच आहे कि उत्तर प्रत्त्युतरात हा मुद्दा फार काळ चालणार नाही याची काळजी तुम्ही घ्याल.
मूळ विषय देव आहे कि नाही हा आहे. मी धनश्री यांना त्या चर्चेत उपस्थित झालेले एक विधान फक्त सांगितले. ते मी इथे नव्याने क्लेम केलेले नाही. धर्म आणि देव या वेगवेगळ्या एण्टिटीज आहेत. त्यामुळे चर्चा धर्मावर जाईल. तुम्हाला ते हवेय का ?
नसेल तर स्वागत आहे.
मी चर्चा अजून ऐकली नाही. मी
मी चर्चा अजून ऐकली नाही. मी एका प्रतिसादात वाचले की देव आहे हे सिद्ध करायची जबाबदारी आस्तिक लोकांची म्हणून त्यावर उत्तर दिले की जर ते आपला देव नास्तिकांवर लादत नसतील तर त्यांनाही तो आहे हे सिद्ध करायची गरज नाही.
पण गंमत इथेच संपत नाही,
उद्या जर अस्तिकांनी सिद्ध केले की देव खरेच आहे,
तरीही त्याची पूजा करायची की नाही हा अधिकार सर्वस्वी माझाच आहे.
हा बघ देव आणि पड आता पाया म्हणून कोणी माझ्यावर सक्ती करू शकत नाही
शेंडेनक्षत्र,
शेंडेनक्षत्र,
तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न तात्त्विकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत, यात शंका नाही. विशेषतः “देव म्हणतो म्हणून सार्वजनिक अवकाशात विध्वंस करण्याचा अधिकार कुठून येतो?” हा प्रश्न कोणत्याही विवेकवादी चर्चेत टाळता येणार नाही. तुमचे आधीचे दोन्हीही प्रतिसाद वाखाणण्याजोगे होते पण मला माफ करा. कारण खिसमसच्या सुट्ट्या पडत असल्याने काम पूर्ण करायचे प्रेशर होते.
मात्र तिसरा प्रतिसाद पाहून त्याला उत्तर द्यावे कि न द्यावे हा प्रश्न उभा राहिला आहे.
मात्र धाग्याचा मूळ विषय लक्षात घेतला तर, इथे चर्चा देव आहे का?, कुराणाचे दावे सिद्ध होतात का? किंवा मूर्तीभंजनाचे नैतिक अधिष्ठान काय? या प्रश्नांवर नव्हे, तर लल्लनटॉपसारख्या वादविवादात मुद्देसूदपणा कसा राखता आला असता या मुद्द्यावर आहे.
त्या अर्थाने तुमचे मुद्दे चुकीचे नसले, तरी ते धाग्याच्या मूळ विषयाचा विस्तार आहेत; थेट उत्तर नाहीत. म्हणजेच इथे प्रश्न भरकटतो की नाही हा मुद्दा तुमच्या प्रश्नांच्या वैधतेवर नाही, तर त्यांच्या सुसंगततेवर अवलंबून आहे.
मूर्तीभंजन, देवसिद्धी, इस्लामिक नैतिकता, हे सगळे स्वतंत्र धाग्यांत सखोलपणे चर्चेला पात्र विषय आहेत. पण इथे ते आणले की नेमकी तीच समस्या पुन्हा निर्माण होते, ज्याबद्दल धागालेखकाची (माझी मुद्दाम म्हणत नाही) तक्रार आहे ... चर्चा मूळ मुद्द्यापासून दूर जाणे. म्हणून तुमचा रोख समजण्यासारखा असला, तरी या धाग्यात तो मांडला गेल्यावर तो उदाहरण ठरतो .... भरकटलेल्या चर्चेचाच. हे लक्षात ठेवून थोडक्यात उत्तर असे आहे.
तुम्ही इथे जे मुद्दे मांडले आहेत ते आधीपेक्षा अधिक स्पष्ट आणि तात्त्विक आहेत, हे मान्य करायला हवं. विशेषतः “देव म्हणतो म्हणून विध्वंस करण्याचा अधिकार कुठून येतो?” हा प्रश्न टाळता येणार नाही.
सार्वजनिक अवकाशात जेव्हा एखादी कृती केली जाते ...... मूर्ती फोडणे, ग्रंथ जाळणे, शिक्षा देणे .... तेव्हा “माझ्या धर्मात असं सांगितलं आहे” हे कारण पुरेसं ठरत नाही, हे आधुनिक नैतिकतेचं गाभासूत्र आहे.
मात्र इथे एक फरक ठेवणं गरजेचं वाटतं. मूर्ती फोडण्यामागे धर्म हा एक महत्त्वाचा प्रेरक घटक असला, तरी तो एकमेव कारण नाही. इतिहासात सत्ता, राजकारण आणि प्रतीकात्मक वर्चस्व हे घटक धर्मासोबत गुंतलेले दिसतात. त्यामुळे “धर्मच हे करायला लावतो” असं एकरेषीय निष्कर्ष काढणं थोडं सरलीकरण ठरेल.
देव आहे का नाही, हा प्रश्न तत्त्वज्ञानाचा आहे; पण सार्वजनिक समाजासाठी अधिक तातडीचा प्रश्न असा आहे की कोणत्याही श्रद्धेच्या नावाखाली इतरांच्या स्वातंत्र्यावर किंवा वारशावर आघात करण्याचा अधिकार कुणाला आहे का?
या अर्थाने तुमचा प्रश्न नास्तिकांच्या बाजूनेच उभा राहतो. देव असो वा नसो, श्रद्धा वैयक्तिक असू शकते; पण तिचे परिणाम सार्वजनिक असतील, तर ते विवेकाच्या कसोटीवर तपासले जाणे अपरिहार्य आहे.
हे उत्तर पुरेसं ठरावं ही
हे उत्तर पुरेसं ठरावं ही अपेक्षा आहे. अशा चर्चा मुद्देसूद कशा व्हाव्यात हा विषय असल्याने आपणच जर ते नियम मोडू लागलो तर आपण आपल्या धर्माचे नियम सुद्धा मोडणारच. माझ्या मते शेंडेनक्षत्र यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो विस्मरण होऊ नये यासाठी इथे लिहीला असे मी मानतो. पण त्याच्या साठी आपण स्वतंत्र धाग्याचा विचार करूयात. त्यावर सांगोपांग चर्चा करता येईल. इथे हे प्रेशर राहील कि मूळ चर्चेला वेगळे वळण लागले तर पुन्हा परतायचे कसे ?
बघितली चर्चा.
बघितली चर्चा.
चर्चेची माती झाली का? : निश्चितच.
का?: तुम्ही याचा लेखात छान आढावा घेतला आहे, त्याच्याशी सहमत आहे.
राज यांच्या प्रतिसादाशी सुद्धा सहमत आहे, शेवटले वाक्य वगळता.
सामो यांनी धावते वर्णन आणि थिंकिंग अलाऊड करताना काही योग्य मुद्दे मांडले आहेत.
फाविद यांच्या प्रश्नाचा नक्की रोख मला समजला नाही. पण समजा तसा प्रश्न कुणी विचारला असता मुफ्ती यांनी उत्तर दिले असते की निर्माता तो आहे. काही कारणासाठी त्यानेच हयात असलेली सगळी मानवजात संपवली तर तोच परत ती निर्माणही करेल.
मला वाटते चर्चा सुरू होताच चर्चेची माती व्हायला (मुफ्ती यांच्या पहिल्या भाषणातच) झाली. नंतर जावेद अख्तर यांनीही दोन मुद्दे वगळता चर्चेची पूर्ण माती होण्यास भर घातली. प्रश्नोत्तरांनीही घातलीच.
पण समजा तसा प्रश्न कुणी
पण समजा तसा प्रश्न कुणी विचारला असता मुफ्ती यांनी उत्तर दिले असते की निर्माता तो आहे. काही कारणासाठी त्यानेच हयात असलेली सगळी मानवजात संपवली तर तोच परत ती निर्माणही करेल. >> अगदीच. पुन्हा पुन्हा विध्वंस आणि पुन्हा पुन्हा निर्माण या गृहीतकावर चर्चाही आहेत आणि सायन्स फिक्शन आणि पिक्शनल स्टोरीज सुद्धा आहेत. त्यामुळे मुफ्ती सारख्या आधुनिक अंगाने इस्लाम मांडू पाहणार्याच्या हाती कोलीतच दिले गेले असते.
मानव छान आढावा.
राज आपलेही आभार. माफ करा आधी
राज आपलेही आभार. माफ करा आधी उल्लेख करायचे राहून गेले याबद्दल क्षमा करावी.
धागा वाहता ठेवल्याबद्दल सर्वांचेच आभार. आज खरे तर वेळ आहे पण सुट्टीची कामे असल्याने पुन्हा भेटूच.
फाविद यांच्या प्रश्नाचा नक्की
फाविद यांच्या प्रश्नाचा नक्की रोख मला समजला नाही. >>> माझ्या प्रश्नाचा रोख होता की Logical necessity ही आपलया डोक्याची उपज आहे न की वास्तव.. जरी संपुर्ण विनाशानंतर मानवजात आपोआप पुन्हा अस्तित्वात आलीच ( हे होणार कसे हे त्यांना वैज्ञानिक दृष्ट्या तरी समजवता येमार नाही,इट ईज जस्ट अ ट्रस्ट मी ब्रो आर्ग्यूमेंट ) तरी हे आता सांगत असलेल्या Logical necessity च्या संकल्पना त्यावेळीही जशाच्या तशा संक्रमित होतील हा दावाच तद्दन मूर्खपणाचे प्रतिक ठरतो. आणि त्या जर तशा उरतील याची खात्रीच नसेल तर मग मुफ्ती शमैल नक्वी ने ( अथवा कुणीही) आता अस्तित्वात असलेल्या संकल्पनांची भलामण करण्याचा गाढवपणा सोडून द्यावा.
अच्छा. त्यांचा मूळ दावा फक्त
अच्छा. त्यांचा मूळ दावा फक्त एक संकल्पना असल्याने परत त्याचीच री ओढली असती. असा प्रश्न कुणीतरी विचारेल आणि त्यावर काय उत्तर द्यायचे याची त्यांची अगोदरच तयारी झाली असेल.
धन्यवाद राजअ.
विषय "देव आहे का?' असा होता. पण सुरवातीच्या भाषणातच मुफ्तींनी आस्तिक विरुद्ध नास्तिक असे वळण दिले. एक तर तुम्ही देव नाही हे सिद्ध करून दाखवा, जे कुणी करू शकतच नाही पण मी मात्र देव आहे हे तर्कशुद्ध पद्धतीने सिद्ध करेन ज्याचे कुणाला खंडन करणे शक्य नाही असे बोलुन हा विषय देव आहे की नाही हे सिद्ध करण्याची कसोटी आहे या दिशेने नेला.
पुढे देव आहे यासाठी त्यांनी स्वतः संकल्पना मांडल्या. ते करतानाही 'पण नास्तिक असे म्हणतील, यावर असा युक्तिवाद करतील' ते चालणार नाही, मी आधीच असं असं सांगुन ठेवतो करत काही अगम्य संकल्पना मांडल्या.
आणि देव नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवा सांगितले.
चर्चा खरं तर इथे सुरू झाल्याच संपली होती.
पण जावेद अख्तरांनी मुख्य धर्म अस्तित्वात यायच्या आधीच्या संस्कृती अमुक अमुक देव मानत आता कुठे आहेत ते देव? देव म्हणजे धर्म आलाच, आणि ते मद्य सेवना सारखे आहे, ठराविक मात्रेत त्याचा फायदा होईल पण जसे मद्यावर नियंत्रण राहत नाही तसेच याचेही होते वगैरे मुफ्तींच्या अपेक्षेप्रमाणे भरकटणारे मुद्दे मांडले. (त्यात तथ्य आहे की नाही हे विषयाला irrelevant आहे.)
त्यांनी मांडलेले दोन योग्य मुद्दे म्हणजे निसर्गात न्याय वगैरे नसतोच, ती मानवी संकल्पना आहे आणि देव आहे असा तुमचा दावा आहे तर तो सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे.
जो कुठलाही दावा करतो त्याने तो सिद्ध करावे असा संकेत आहे. पण समजा कुणी दुसऱ्या पक्षाला म्हटले की ठीक आहे तो पक्ष सिद्ध करत नाहीय, तुम्ही विद्वान आहात तर तुम्ही दावा चुकीचा आहे सिद्ध करा. तर या साठी दावा मुळात falsifiable - जो चुकीचा आहे हे दाखवण्यास वाव आहे असा- असावा. नॉन-फाल्सिफायेबदल दावे चर्चेत मांडुन ते खोडुन दाखवा म्हणणे साफ चुकीचे आहे. संकेत काय आहेत याचा संबंध नाही. त्यासाठी अख्तरांनी रुसेल्स टि-पॉट या दाव्याचे उदाहरण दिलेही पण पुढे बोलण्याच्या अथवा ओव्हर कॉन्फिडन्सच्या ओघात ते भरकटत गेले आणि त्यांनी हा मुद्दा नीट रेटला, पोचवला नाही.
निसर्गात न्याय नसतो या मुद्याबद्दलही असेच काहीसे झाले. मुफ्तींनी त्यावर स्ट्रॉमॅन अर्ग्युमेंट्स केले. अख्तरांनीही दुसऱ्या मुद्यांवर केले.
विषयाचे भान न राहुन आपापल्या बाजूच्या प्रेक्षकांना आपण पुढच्याला कसा धोबीपछाड दिला हे दाखवायला दोघेही उगाच नको ते मुद्दे उचलत राहिले, बाईट देत राहिले असे वाटले. त्यात मुफ्ती तयारीने आल्याने थोडी कुरघोडी करू शकले. अख्तर नंतर सावरले पण वेळ अपुरा पडला.
चर्चा कशी हा धाग्याचा एक विषय आहे.
"देव आहे का?" ही चर्चा करायचीच असेल तर या झालेल्या चर्चेवरून काही बोध घेता येईल.
१. विषय सिद्ध करून दाखवण्याचा नसावा.
२. नॉन-फॉल्सिफायेबल दावे, संकल्पना मांडल्यास तो तसा आहे याची मांडणाऱ्याला पूर्ण जाणीव असावी त्याचा वापर कुरघोडीसाठी करू नये. किंबहुना माझा दावा अशा प्रकारात मोडतो असे जाहीर केल्यास उत्तम.
३. आपल्याला देव आहे असे का वाटते, आपण त्याला का मानतो आणि आपल्याला त्याचे काय अनुभव येतात अशा रीतीने मांडणी असावी.
४. देव नाही असे वाटते त्यांनी अशाच रीतीने आपली बाजू मांडावी, अनुभव वैयक्तिक असु शकतात, या मानसिक संकल्पना कशा इत्यादि जे काही ते मांडावे.
५. वैयक्तिक शेरेबाजी टाळावी. स्वतः तसेच पुढचा समस्त आस्तिक/नास्तिक जगताचा/ची प्रतिनिधी आहे असे समजु नये. सर्व आस्तिक किंवा सर्व नास्तिकांना एकाच तराजूत तोलुन बोलू नये.
अर्थात मग चर्चा तरी काय आणि का करायची हा प्रश्न उरतोच.
मानव,या चर्चेत पहिल्यांदाच
मानव,या चर्चेत पहिल्यांदाच नीट समजेल असा "मानवी" प्रतिसाद आला. धन्यवाद .
मी चर्चा पाहिली नाही. उलट
मी चर्चा पाहिली नाही. उलट टाळली. कारण आजकाल दोन विरुद्ध पक्ष एकमेकांना प्रश्न विचारतात, पण उत्तर कुणीच देत नाही असा अनुभव आहे. निदान आधीच्या प्रश्नांना address करून मग पुढे प्रश्न विचारावेत. पण प्रश्नांना प्रतिप्रश्न विचारणे आणि एकमेकांवर उपहासात्मक शेरे करणे यापलीकडे चर्चा जात नाही, त्यामुळे बघायला आवडत नाही. ही चर्चा पण अशीच साधारण होती असं वाटतंय वरचे प्रतिसाद वाचून. तशी नसल्यास बघेन.
मला जीवनविद्याने केलेली
मला जीवनविद्याने केलेली परमेश्वराची व्याख्या आवडते.
“निसर्गनियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. हा परमेश्वर कृपा किंवा कोप करीत नाही तर माणूसच स्वतःच्या कर्मांनी स्वतःवर कृपा किंवा कोप करीत असतो.”
धन्यवाद रानभूली.
धन्यवाद रानभूली.
हपा चर्चेत नविन काहीच नव्हतं दोन्ही बाजुंनी.
मुफ्तींनी सांगितलं की कॉन्टिंजंट म्हणजे जिच्या अस्तित्वाची गरज नाही, तिच्यात आढळणारे जे ठराविक गुण आहेत तेच असण्याची गरज नाही, पण ती आहे म्हणजे ती कुणीतरी निर्माण केलीय म्हणजे तिचे अस्तित्व दुसऱ्यावर अवलंबून आहे.
मग चेंडु पासून सुरवात करत सगळ्या विश्वापर्यँत आपण गेलो की काय कॉन्टिंजंट नाही तर आपण फक्त एकाच अशा नेसीसीटी बिइंग पर्यँत पोचतो जीचे अस्तित्व कुणावर अबलंबून नाही आणि जिचे अस्तित्व आवश्यक आहे, जे कुणी नाकारू शकत नाही. ती म्हणजे देव. मग हे विश्व, त्याची अद्भुत निर्मिती सगळे ठराविक नियमांनी कसे संतुलित चालते, त्याच्या असण्याशिवाय हे शक्यच नाही म्हणजेच तो आहे. तो इंटिलीजन्ट, सर्वज्ञानी, त्याला उगम नाही अंत नाहीत इत्यादि जे सगळ्यांना ठाऊक आहेच.
त्याने आपल्याला फ्री विल देऊन आपली परिक्षा घेण्यास पाप व दुःख सुद्धा निर्माण केले. म्हणजे आपल्या फ्री विलने आपण पाप करतो की पुण्य याचा हिशेब ठेऊन मग शेवटी (मेल्यावर) आपले मूल्यमापन करतो. पीडितांना न्याय देतो (पिडा देणाऱ्यांना सजा देणे त्यात आले.)
जगात दुःख व पाप आहे हे देव असल्याचीच ग्वाही देते. देव नसेल तर दुःख व पाप का आहे हे तुम्हीच सांगा. मरतांना पीडित प्रतिशोध घेण्यापूर्वीच गेले तर मग काय त्यांचे भोगणे, त्यांच्या प्रतिशोधाच्या, न्याय मिळवण्याच्या भावना सर्व काय व्यर्थच जाणार हे तुम्हीच सांगा. असं ते म्हणाले.
जावेद अख्तर यांनी कोणते दोन सुसंगत मुद्दे मांडले हे मी वर लिहिले आहे.
आठवुन लिहिताना दोन्ही बाजुंचा आणि कदाचित बघताना माझ्या बायस मुळे मुफ्तींनी मांडलेला एखाद दुसरा व्हॅलीड मुद्दा मी विसरलो/समजु न शकलो असण्याची शक्यता आहे, पण वेगळे असे त्यात काहीही नव्हते हे नक्की.
धन्यवाद मानव
धन्यवाद मानव
नवीन Submitted by मानव
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 25 December, 2025 - 21:08
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 26 December, 2025 - 10:18>>> @मानव तुमच्या या दोन प्रतिसादांत या पूर्ण चर्चेचा संक्षिप्त गोषवारा अगदी व्यवस्थितपणे आला आहे.
अर्थात मग चर्चा तरी काय आणि का करायची हा प्रश्न उरतोच.>>> 🎯
गॉड जर तुम्ही उलट वाचलं तर ते
गॉड जर तुम्ही उलट वाचलं तर ते देव होतं. मूळ देवच. इंग्रजानी तो शब्द आणि देव चोरला. ख्रिसमसचा सांता म्हणजे मूळचा वासुदेव तो पण चोरला.
- अखिल भारतीय ‘ सांता नको वासुदेव हावा’ संघटना
मानव. दोन्ही पोस्टस आवडल्या.
मानव. दोन्ही पोस्टस आवडल्या.
सौ सुनाल कि एक
सौ सुनाल कि एक
फैसला ताबदतोब
Nasa Clicked God Vishnu's Image
https://www.youtube.com/shorts/eoNRUmfulVo
Unseen Power of Sadhu
https://www.youtube.com/shorts/OBOjIG4cyVk
या चर्चेबद्लचे एक पहाण्यात
या चर्चेबद्लचे एक पहाण्यात आलेले विश्लेषण...एकदा ऐकले, आश्वासक वाटले आजून चावावे लागेल अस दिसतयं.
https://youtu.be/KqT0wR1uWLE?si=Sm69cqhk6NK_2RVx
Pages