बॉलीवूड . . . अथांग महासागर जणू. 2000 च्या नंतरचा काळ आला तो शाहरुख, सलमान, अमीर आणि सैफ अली खान यांच्या साम्राज्याचा. इतका की, 'बॉलीवूड वर 4 खान राज्य करत आहेत' असं म्हणत लोकं त्यावेळी. मूव्ही मध्ये हिरो असावा तर हाच, नव्हे एकवेळ शाहरुख खान ने व्हिलन साकारला आणि तेही पचवलं लोकांनी. असं आणि हे सगळं.
तोही होताच तिथे, फक्त लक्ष नव्हतं गेलं कोणाचं एवढच. सुरुवात तशीच म्हणजे middle class family, कोणी godfather नाही, मग कष्ट करत-करत NSD आणि struggle वगैरे-वगैरे.
Hero म्हणवून घेण्यासारखं नव्हताच मुळी त्याच्यात. action hero म्हणावं तर well-shape body नाही, comedy करवून घ्या तर expression निघेनात चेहऱ्यावर, romance तर भाकडकथाच म्हणावी!! होत म्हणावं तर 'natural acting' आणि एक खास जयपुरी लकब. हेच ते काय पुण्य घेऊन आला तो.
केली मग सुरुवात. आधी नाटक, मग T.V. Serial, हळू-हळू bollywood खुणावू लागले. 1988 मध्ये आलेली 'Salaam Bombay' drama movie पासून सुरुवात करणारा 'natural acting' वाला हा कलाकार अगदी 2000 पर्यंत कोणाला माहित देखील नव्हता. मग 2001 मध्ये 'The Warrior' ने याला सुवर्ण पटला वर आणून ठेवले. 2003 मध्ये आलेला 'मकबूल' ची स्क्रिप्ट writer ने याला समोर बसवूनच लिहिली असेल बहुधा!! एखादा बागी देखील आपलंसं वाटावा इतका जीव ओतला 'paan singh tomar' मध्ये. हा मुव्ही पाहिल्या नंतर Ice-cream मध्ये गुलाब जामून ट्राय केले असतील पब्लिक ने. 'Billu' मध्ये असणारा मित्र आपल्या आयुष्यात का नाही याची खंत वाटली असेलच. लहानपणी 'jurassic park' पाहायला पैसे नसणारा लहान मुलगा मोठा होऊन 'Jurassic World' मध्ये काम करून Hollywood ला गवसणी घालू लागला. Tom Hanks सारख्या 4 वेळा ऑस्कर विजेत्याला ही याच्या सोबत काम करण्याचा मोह आवरला नाही.
'Natural Acting' चे कित्ते गिरवणाऱ्या साठी पायंडा पाडून, 4 वेळा 'फिल्मफेअर', 1 'पदमश्री' आणि 1 'राष्ट्रीय पुरस्कार' घेऊन व मनात कायमचे घर करून Irrfan Khan 'मरावे परी कीर्ती उरावे' उमटवुनी गेला.
लिखाण आवडले.
लिखाण आवडले.