काही काही गाणी अशी असतात की ती ऐकण्याची आपल्याला काही काळासाठी तरी चटक लागते. 'हुस्ना' हे गाणं ऐकण्याची मला गेले अनेक दिवस चटक लागली आहे असं म्हणायला हरकत नाही!
लाहोरमधे राहणाऱ्या आपल्या प्रियेला उद्देशून भारतातल्या प्रियकराने म्हटलेलं हे गाणं. पीयूष मिश्रा हा या गाण्याचा कवी, गायक आणि बहुतेक संगीतकारही आहे. गाणं म्हणण्याची त्याची स्वतःची एक विशिष्ट स्टाईल आहे आणि हे गाणं मला आवडण्यामागे त्या स्टाईलचाही मोठा भाग आहे. गाण्यात जेव्हा तिचा 'हुस्ना' असा उल्लेख पहिल्यांदा होतो त्यानंतर 'ओ हुस्ना!' या शब्दांत जी वेदना त्याने आणली आहे ती केवळ सुंदर आहे. ही आर्त विरहाची भावना ऐकून अर्थात इतरही गाणी/कविता आठवल्या आणि त्यांमधली साम्यंही जाणवली.
'त्या गाठी, त्या गोष्टी, नारळीच्या खाली, पौर्णिमाच तव नयनीं भरदिवसा झाली' या ओळी काय किंवा ' सांग सख्या रे, आहे का ती अजून तैशिच गर्द राईपरी?' या ओळी, किंवा ' लोहरी का धुआं क्या अब भी निकलता है जैसा निकलता था उस दौर में वहाँ' या ओळी, भाव तोच.
विरहाच्या भावनेबरोबरच अजून एक पदर म्हणजे 'सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात?'
मी भले तिच्या आठवणीने विकल झालोय, पण 'रोता है रातों में पाकिस्तां क्या वैसे जैसे हिंदोस्तां' हा प्रश्न इथेही आहेच.
माझं हे गाणं असंख्य वेळा ऐकून झालंय आणि अजूनही कित्येक वेळा नक्कीच ऐकलं जाणार आहे 
मला वाटले की तू पुढची हत्ती
मला वाटले की तू पुढची हत्ती कथा टाकली..
Husna नावाची हुशार हत्तीण..
म्हणून पळतपळत वाचायला आले....
पीयूष मिश्रा बाप माणूस आहे.
पीयूष मिश्रा बाप माणूस आहे. त्याचे इक बगलमे चाँद होगा (gangs of wasepur) पण ऐका.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=eGlifxsvyjo
अजून एकदा ऐका.
@pramodpatil05737
6y↑274
अजूनही बगळ्यांची माळफुले ऐकणारी पिढी हयात हे बघुन आनंद होतो
मन पल्लवीत झाले
हे सर्व अप्रतिम
इक बगल में चाँद > > हो आणि
इक बगल में चाँद > > हो
आणि आरंभ है प्रचंड
हुस्ना ऐकलं नव्हतं.
हुस्ना ऐकलं नव्हतं.
एक बगल मैं चांद ऐकलेलं ते पण छान आहे "आरंभ है प्रचंड" तर खूपच आवडीचं आहे.पियुष मिश्रा चा आवाज युनिक आहे .गायक पेक्षा लेखक म्हणून जास्त आवडतो.वरती लिहिल्याप्रमाणे बाप माणूस.
वावे, छान ओळख करून दिलीस
वावे, छान ओळख करून दिलीस गाण्याची. कानात वाजत राहत गाणं..!
आर्त, व्याकुळ स्वरातील शब्द काळजापर्यंत नक्कीच पोचतात.
गाण्याच्या खालची एक कमेंट वाचून आतुन भरून आलं मन..!
आज हे गाणे ऐकले. निव्वळ
आज हे गाणे ऐकले. निव्वळ हाँटिंग आहे. अक्षरक्षः हॉन्टिंग म्युझिक, हॉन्टिंग आवाज व काव्य.
कोक स्टुडिओमुळे खरंतर अनेक
कोक स्टुडिओमुळे खरंतर अनेक चांगली गाणी ऐकायला मिळालीत. माझी या गाण्याची ओळख तिथेच झाली. पण हेच गाणं कोक स्टुडिओ व्यतिरिक्त जेव्हा कुठेतरी ऐकलं होतं तेव्हा ते मला जास्त आवडलं होतं. कोकस्टुडिओ व्हर्जनमध्ये पुढे पुढे म्युझिक जास्त ओव्हर पॉवर झालंय असं मला वाटलं. पण त्या गाण्याची कदाचित तशी गरज असावी.
छान गाणे. हे ऐकले नव्हते.
छान गाणे. हे ऐकले नव्हते.
सुरुवातीची दोन तीन मिनिटे ब्लॅक अँड व्हाईट काळातील विरहगाणे ऐकत असल्यासारखे वाटले. नंतर म्युजिक बिट्स वाढल्या. पूर्ण ऐकले नाही. रात्री ऐकेन. ती गाणी ऐकायची आवडीची वेळ आहे, स्पेशली कोक स्टुडिओचे..
आधी मला शीर्षक वाचून Husn -Anuv Jain हे गाणे वाटले होते.
https://youtu.be/gJLVTKhTnog?si=rcM91bojuh1Q5BAy