Submitted by किरण कुमार on 15 December, 2025 - 02:11
चमचम करतो जिथे इंडिया, भारत खातो ठोकर आहे
श्रीमंतीच्या सत्तेमधला भणंग इथला वोटर आहे
रिते बंगले गच्च झोपड्या दरी वाढली दोघांमधील
त्याच्या हाती पिझ्झा, याच्या स्वप्नीसुद्धा भाकर आहे
राम उपाशी, रहीम उघडा माणसातला कुणा दिसेना
पण मूर्तीवर चढते सोने, दर्ग्यावरती चादर आहे
कृषीप्रधानी देशामध्ये भाव पिकाला कसा मिळेना ?
इथे जगाच्या पोशिंद्यावर का कर्जाचा डोंगर आहे ?
इथे तिरंगा विकण्यासाठी सिग्नल वरती उभे लेकरू
संविधान अन् हक्काचा मग टीव्हीवरती जागर आहे
ग्रंथ एकदा वाच जरा तू इतिहासाला समजायाला
भाषण केवळ घागर वेड्या, पुस्तक म्हणजे सागर आहे
कुठे लिहाया जमते मजला शब्दामध्ये भळभळ सारी
तुटकी फुटकी कविता माझी जखमेवरची फुंकर आहे
- किरण कुमार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केवळ अप्रतिम!!
केवळ अप्रतिम!!
क्या बात है
क्या बात है
समर्पक!!
समर्पक!! 👏 👏
वास्तवदर्शी.
वास्तवदर्शी.
दाहक वास्तव
दाहक वास्तव
खरंय!
खरंय!
छान जमली आहे!
छान जमली आहे!
मस्त!
मस्त!
छान !!!
छान !!!
धन्यवाद मित्रांनो ...........
धन्यवाद मित्रांनो ............./\...........
आवडलीच एकदम..!!
आवडलीच एकदम..!!
व्हा व्हा!
व्हा व्हा!
वास्तवदर्शी.
वास्तवदर्शी.
क्या बात है. एकदम अॅज इट इज
क्या बात है.
एकदम अॅज इट इज
अप्रतिम कविता !
अप्रतिम कविता !
कवितेला छान गेयता आहे. मीटरमधे म्हणायला मजा येते आहे.
क्या बात है. खूपच सुंदर रचना
क्या बात है. खूपच सुंदर रचना आहे. एक से एक शेर आहेत. वाह!
धन्यवाद रसिक मित्रांनो ..../\
धन्यवाद रसिक मित्रांनो ..../\...
छान जमली आहे!+1
छान जमली आहे!+1