फर्ग्युसनच्या ग्राऊंडवर १३ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत पुस्तक महोत्सव आहे. यंदाचं तिसरं वर्ष. चांगलं आहे. आज फक्त वरवरनं रेकी करावी, कुठं कुठं काय काय आहे? 'आपल्या कामाचे' स्टॉल्स कुठं कुठं आहेत हे बघून ठेवावं, असा माफक उद्देश होता जाण्यामागं. तर त्याप्रमाणे खरीदो-बेचो (B35), नॅशनल बुक ट्रस्ट(C1), वॉल्डन (A17), सस्ता साहित्य मण्डल(E8), आरके पब्लिकेशन (F23), राजपाल प्रकाशन (F41), राजकमल प्रकाशन (G10) असे काही हेरून ठेवलेत सध्यातरी.
तर आज काय फक्त सहज बघून यायचं आहे, आज खरेदीबिरेदी काही करायची नाही, मागच्या महोत्सवांत केला तसा हावरेपणा करायचा नाही, आता आपण मॅच्युअर झालो आहोत, त्यामुळे डोममध्ये आत शिरल्यावर कुंडलिनी जागृत झाल्यासारखे वेडेचाळे करायचे नाहीत, किंवा इथं सासुरवाडी असल्यासारख्या रोजरोज घिरट्या तर बिलकुलच घालायच्या नाहीत, वगैरे काहीतरी ठरवलं होतं जाताना, पण तरीही काही पुस्तकं 'मला घे' 'मला घे' म्हणत लहान मुलांसारखी मागेच लागली. हातपाय आपटत भोकाड पसरून रडायलाच लागली अगदी. काय करणार मग!
बाकी चालून चालून पाय दुखण्याच्या प्रॉब्लेमला यावेळी जरा टॅक्टफुली हाताळावं लागेल असं दिसतंय. डोममध्ये मधल्या पॅसेजेसमध्ये लोकांना थोडंफार बूड टेकण्यासाठी काहीतरी सोय केली असती आयोजकांनी तर बरं होतं. पण असो.
एकूण हा सगळा पेशवाई पंगतीचा थाट वगैरे. त्यातला आजचा हा समजा स्टार्टरच्या आधीचा स्टार्टर. पहिला राऊंड. किंवा तत्सम तोंड खवळणं वगैरे.
आता पुढं आठवडाभर कसकसले मेनकोर्सेस, Desserts, मुखशुद्धी इत्यादी मध्ये अजून काय काय येतंय ते बघायला लागेल. त्यासाठी जागा मोकळी करायला घ्यावी लागेल. आणखी नवनवीन चळती येण्याची दाट शक्यता दिसायला लागली आहे. त्या काय आपण रोखू शकत नाही.


PS: धागा पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने काढलेला आहे. तर त्याशी संबंधित माहिती, अपडेट्स, प्रतिसाद, अनुभव, टिप्स, वगैरे लिहायचे असतील यू आर मोस्ट वेलकम..!
मला एकदातरी ह्या पुस्तक
मला ह्या पुस्तक महोत्सवाला हजेरी लावायची खूप इच्छा आहे. एकदा तरी नक्की जमवेन.
बिपिनजी, अभिनंदन आणि खूप कौतुक तुमचं..!
फेसबुकवर तुम्ही घेतलेल्या तीन लेखकांच्या मुलाखती पाहिल्या. संदेश कुळकर्णींचीं तुम्ही घेतलेली मुलाखत विशेष आवडली. डॉ. दिक्षितांची मुलाखत बघायची आहे. बघते नंतर..!
रूपाली विशे - पाटील
रूपाली विशे - पाटील
निखिलेश चित्रे यांचे मी वर उल्लेक्ग केलेले पुस्तक "गॉगल लावलेला घोडा "वाचले आहे का?
जरूर वाचा,
पालघर आणि आसपास चा परिसराची पार्श्वभूमी आहे.
केशवकूल, नाही वाचले पुस्तक..!
केशवकूल, नाही वाचले पुस्तक..!
लायब्ररीत असावे बहुतेक.. पुस्तकं चाळताना नाव वाचल्यासारखे आठवते. नसेल तिथे तर मागवते online मग..!
पुस्तक महोत्सवात मजा आली . एक
पुस्तक महोत्सवात मजा आली . एक ज्येष्ठ म्हणाले आठ दिवस कसे गेले कळलं नाही . ते रोज तिथे असायचे . पूर्ण वेळ.
खरंच लय भारी !
महोत्सवात शनिवारी एक मुलाखत घेतली - अभिनेते , लेखक - संदेश कुलकर्णी
त्यांचं पुस्तक - मोंटूकले दिवस . धमाल आहे . मोठे किंवा छोटे कोणासाठीही .
काही मुलाखती इथे पाहायला मिळतील
फेसबुक पेज - मनोविकास प्रकाशन
सगळ्यांचा खूप आभारी आहे
धनवंती
धनवंती
पराग
रुपाली
व इतर
खूप आभारी आहे
@एस आर डी
खरंच या काळात तिथे मस्त गटग होऊ शकतं
छान धागा.
छान धागा.
भाऊकाका मुलीचं अभिनंदन.
छान धागा.
छान धागा.
बरीच नवीन पुस्तके माहीत झाली
संप्रति सर, तुमच्याकडुन
संप्रति सर, तुमच्याकडुन प्रेरणा घेउ, नववर्षी, 'एक और मन' हा प्रवीण कुमार यांचा कविता संग्रह विकत घेतलेला आहे. बाप रे!! पहील्यांदा त्यांनी जी 'भूमिका' लिहीलेली आहे तिच्यातच इतके सुंदर आणि मनास स्पर्शून जाणारे प्रसंग लिहीलेले आहेत.
माझेच मन परत एकदा जिवंत होउन उठल्यासारखे झालेले आहे.
केशवकूल, ' गॉगल लावलेला घोडा'
केशवकूल, ' गॉगल लावलेला घोडा' हे पुस्तक online मागवलं. एक - दोन कथा वाचल्या. आवडल्या. बाकीच्या वाचेन नंतर..
कथेतली वर्णन केलेली स्थळं ओळखीची असल्याने कल्पना करावी लागली नाही. डोळ्यांसमोर उभी राहिली. पहिल्या कथेतलं डहाणूतलं स्थळ तर काकांच्या घराजवळचं आहे.
Pages