संध्याकाळी भाग्यलक्ष्मी घरी आली तेव्हां तिने पाहिलं कि कुलदीपक तिची बेडरूम साफ करून नोकरांच्या रूम मधे झोपायला गेला होता.
तिने हेड मिस्ट्रेसला बोलावलं आणि कुलदीपकला बोलवायला सांगितलं.
ती कपडे बदलत असताना कुलदीपक आला.
"सॉरी मॅडम, मी अशा वेळी आलो"
" त्याची काही गरज नाही. तू नवरा आहेस माझा"
"हो, पण तुम्हीच मला ताकीद दिलेली होती ना ?"
"हम्म, ते सगळं बिसर. मी तुला बोलवलंय "
" हो. काय काम होतं ?" कुलदीपकने विचारलं.
" तू जेवलास कि नाहीस ?" भाग्यलक्ष्मी ने प्रेमाने विचारलं.
तिचं प्रेमाने वागणं पाहून कुलदीपक चक्रावून गेला.
तो जेव्हांपासून इथे आला होता तेव्हांपासून भाग्यलक्ष्मीचे आजोबा म्हणजे महादेवराव आगलावे सोडले तर कुणीच त्याच्याशी नीट वागत नव्हतं.
महादेवराव वाटलावे हे फार मोठं प्रस्थ होतं. आगलावे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक !
त्यांनी या ग्रुपची सुरूवात खूप कष्टाने केली होती.
अगदी सुरूवातीला त्यांनी रेल्वे स्टेशनच्या बाहेर फूटपाथवर बसून स्टोव्हवर अंड्याची भुर्जी आणि पावचा धंदा सुरू केला होता. रस्त्यावरचे कामगार, भिकारी हे त्यांच्याकडे जेवायला येत. खूप फायदा होत नसला तरी दोन पैसे सुटत. सकाळ, दुपार आणि रात्र असे ठरलेले गिर्हाईक केले कि दिवसभर त्यांच्याकडे वेळ असे. रहायला फूटपाथ, अन्नाचा धंदा असल्याने पोट भरायची सोय आणि दिवसभराच्या खर्चासाठी पैसे सुटत असल्याने दिवसभर अन्य काही काम मिळते का हे बघण्यात वेळ जाई.
हळूहळू त्यांना हातगाडीवर सामान पोहोचवण्याची कामे मिळू लागली. बेकरीतून पावाच्या लाद्या, नानकटाई, खारी, बिस्कीटं, केक असे सामान ते हॉटेलला पोहोचवत.
त्यावेळी त्यांना महाद्या असे बोलवत असत.
पण सामान टाकत असल्याने त्यांना हॉटेल लाईनची माहीती झाली.
फूटपाथवरच हातगाडीवर त्यांनी पहिले हॉटेल सुरू केले.
चहा, वडापास आणि मिसळपाव !
नंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
वर्षभरात समोरच्या रस्त्याला दुकानाच्या बाहेर फास्ट फूड सेंटर सुरू केले.
सहा महीन्यात एक मोठे हॉटेल सुरू झाले.
त्याला लागणारे जिन्नस आणि वस्तू यांचा अभ्यास करता करता त्यांनी सप्लाय चेनच्या धंद्यात प्रवेश केला.
मग मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई इथून सामान भरायला सुरूवात झाली.
हळूहळू शहरातले सर्व हॉटेल्स, दुकानदार त्यांचे ग्राहक झाले.
बँकेत खाती उघडली गेली.
त्यांचा कारभार पाहून बँक अधिकार्यांनी त्यांचे कर्ज मंजूर केले.
आणि मग सप्लाय चेन मधून त्यांनी उत्पादन सुरू केले. मोठ मोठे सप्लायर्स, डिस्ट्रीब्युटर्स, स्टॉकिस्ट्स ओळखीचे असल्याने माल खपायला वेळ लागला नाही.
आणि आज आगलावे हे नाव देशात आदराने घेतलं जात होतं.
आगलावें मुळे वाघभिववे इंडस्ट्रीज सुद्धा नावारूपाला आली होती. त्यांचा स्टेशनरीचा व्यवसाय देशभरात प्रसिद्ध होता.
भाग्यलक्ष्मीने लाल कुंकू इंडस्ट्रीज ही नवी कंपनी आगलावे ग्रुप ऑफ कंपनीची नवीन कंपनी म्हणून सुरू केली होती. महिलांच्या उत्पादनामधून आता लाल कुंकू ने रेल्वेच्या वॅगन्स, हेलिकॉप्टर्स आणि रक्षा उत्पादने बनवायला सुरू केली होती.
पण लाल कुंकू इंडस्ट्रीजचा कारभार गेली काही वर्षे महादेवरावांचे स्नेही जल्लापा वाघभिववे यांचा नातू एकनाथ हाच बघत होता.
त्याच्या वर विश्वास टाकून भाग्यलक्ष्मी ग्लोबल एक्स्पान्शन्स मधे गुंतली होती. सध्या फेअरनेस प्रॉडक्टस आणि अन्य स्कीन प्रॉडक्ट्सवर तिचे लक्ष होते.
या क्षेत्रातल्या अग्रगण्य अशा सायकली जोशीशी तिला टक्कर घ्यायची होती. हा जोशी ग्रुपही प्रचंड मोठा होता. सरकारं हलवण्याची ताकद जोशी या नावात होती.
पण काही तरी चुकत होतं.
महादेवराव यांनी भाग्यलक्ष्मी ला एकदा बोलावून सांगितलं होतं.
"मी गेल्यावर तू फक्त कुलदीपक वरच विश्वास ठेव. त्याच्या वर डोळे बंद करून विश्वास टाकू शकतेस. जेव्हां तू खूप अडचणीत येशील तेव्हां तोच तुला बाहेर काढेल"
तेव्हां भाग्यलक्ष्मीला त्यांची ही बडबड एका हुकूमशहाची बकबक वाटली होती. पण आज त्यांचे शब्द किती खरे आहेत हे तिच्या लक्षात आले होते.
कुलदीपकशी तिचं लग्न एका असाधारण परिस्थितीत झालं होतं.
ती कुलदीपकला अजिबात ओळखत नव्हती.
पण ती परिस्थितीच अशी होती कि महादेवरावांना दोघांना लग्नाचा हुकूम दिला होता आणि तिच्या विरोधाला काहीच किंमत उरली नव्हती.
कारण महादेवराव यांना विरोध म्हणजे इस्टेटीवर पाणी सोडावं लागणार होतं.
ते न करता तिने लग्न तर केलं पण पहिल्याच दिवशी कुलदीपकला त्याची जागा दाखवून दिली.
त्याला रात्री सगळे झोपल्यानंतर नोकरांच्या रूममधे झोपायला जायचं ही ताकीद दिली होती.
जोपर्यंत सगळे झोपत नाहीत तोपर्यंत किचन साफ करणे, तिची बेडरूम साफ करणे आणि दुसर्या दिवसासाठी तिच्या ड्रेसेस ला इस्त्री करून ठेवणे अशी कामे दिली होती. शिवाय हे सगळं महादेवरावांना कळू द्यायचं नाही असा दमही भरला होता. आजवर त्याच्याकडून ती चूक झाली नव्हती.
त्याला हे सगळं आठवलं आणि आजचं तिचं प्रेम पाहून त्याच्या पोटात खड्डा पडू लागला होता.
पन तिचं प्रेम कृत्रिम मव्हतंं.
तिने आज त्याच्याकडे नीट पाहीलं.
ऋत्विक पाटील , टॉम क्रूज आणि झिपर्या सोमण सुद्धा त्याच्या पुढे पाणी भरतील असं त्याचं मर्दानी सौंदर्य तिला आज पहिल्यांदा जाणवलं.
हलकेसे सोनेरी केस, चेहर्याची रोमन ठेवण, हुणांचा तांबूस रंग आणि दणकट असले तरी कपडे घातल्यावर सडपातळ दिसणारे त्याचे शरीर देवानंद पवार आणि जयकिशन दगडफोडेची आठवण करून देत होतं.
तिने त्याला डायनिंग हॉल मधे जेवायला नेलं.
स्वतःच्या हाताने त्याला जेवायला वाढलं.
कुलदीपकचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता. तो सावध होत होता.
आणि तिने त्याच्या केसात प्रेमाने बोटं फिरवत विचारलं..
" तू सांगितलं नाहीस, कोण आहेस तू, कुठून आलास, इथे येण्यापूर्वी म्हणजे डिलीव्हरी बॉयच्या नोकरीपूर्वी काय करत होतास ? "
कुलदीपकचं मन मागे गेलं. सांगावं कि सांगू नये या विचारात असताना त्याच्या मनात हलकल्लोळ उडाला होता.
गेले काही दिवस आगलावे पॅलेस ने त्याला आश्रय दिला होता.
पण त्याचं आयुष्य नेहमीच असं नव्हतं.
भयंकर खळबळजनक घटनांनी भरलेलं होतं.
क्रमशः
वा छान!
वा छान!
छान, वेगवान. पण या भागात काही
छान, वेगवान. पण या भागात काही नाट्यमय भाग नव्हता. नावे मजेशीर आहेत. व्यवसाय कसा वाढविला याचं वर्णन थोडं जास्त आहे असे मला वाटते.
चांगली सुरू आहे कथा
चांगली सुरू आहे कथा..
Full tp
प्रतिलिप मधली कथा वाटतेय तिथे
प्रतिलिप मधली कथा वाटतेय तिथे सेम अशाच असतात स्टोर्या
दादा, तिसरा आणि चौथा भाग
सर्वांचे मनापासून आभार मानतो.
दादा, तिसरा आणि चौथा भाग टाकला आहे.
प्रतिलिप वर मी काही वाचले नाही. तिथली कथा नाही ही.
एका स्टोरी टेलिंग ॲप वर ही
एका स्टोरी टेलिंग ॲप वर ही कथा आधीच ऐकलीय हिंदी मध्ये
वेलक्म बहुबली
वेलकम बहुबली