Missing Man Formation

Submitted by अविनाश जोशी on 26 November, 2025 - 06:11

दुबई एअर शोमध्ये भारत निर्मित तेजस फायटर जेटचे अपघातामुळे दुर्दैवी निधन झाले. अनुभवी तेजस पायलट स्क्वॉड्रन लीडर नमांश स्याल यांनी दुहेरी लूप स्टंट करताना हा प्रसंग घडला.
पहिला लूप अत्यंत कौशल्याने पूर्ण केला, पण दुसऱ्या लूपदरम्यान विमान जमिनीच्या अगदी जवळ आले आणि कोसळले. या दुर्दैवी अपघातात पायलटचेही प्राण गेले. स्क्वॉड्रन लीडर नमांश स्याल यांनी तेजसवर शेकडो तास उड्डाण केले होते. दोन वर्षांपूर्वी सिंगापूर एअर शोमध्ये त्यांनी याच प्रकारचा स्टंट यशस्वीरीत्या सादर केला होता.
अमेरिकेचे अत्याधुनिक F-35 फायटर जेटदेखील आतापर्यंत किमान १२ वेळा कोसळले आहेत. बोईंगसारख्या अनुभवी कंपनीचे 737 MAX या नव्या डिझाईनचे विमान चढताच काही मिनिटांत अपघातग्रस्त झाले आणि अनेक लोकांचा जीव गेला. अलीकडेच Dreamliner उड्डाण देखील अहमदाबाद येथे उड्डाणानंतर काही मिनिटांत कोसळले.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (HAL) कामगिरीचे रेकॉर्ड तुलनेने चांगले आहे. Avro विमान निर्मितीपासून HAL ने स्वतः डिझाईन आणि बनवलेल्या विमानांमध्ये अगदी कमी अपघात झाले आहेत. तज्ज्ञच शोधून काढतील — तेजस का कोसळले? मानवी चुका की यंत्रातील बिघाड?
आता दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया—
१) रशियन टीमची भावनिक कृती – Missing Man Formation
अपघातानंतर रशियन टीमने शोमध्ये भाग घेणे थांबवले आणि पायलटला सन्मान देण्यासाठी Missing Man Formation मध्ये उड्डाण केले.
Missing Man Formation म्हणजे काय?
विमानविद्येत आणि लष्करी विमानसेवेमध्ये ही एक सन्मानात्मक हवाई सलामी असते. ती खालील व्यक्तींना श्रद्धांजली म्हणून दिली जाते:
• शहीद झालेले पायलट
• युद्धात मृत्यूमुखी पडलेले सैनिक
• राष्ट्रीय वीर, महत्त्वाचे मान्यवर
• अवकाश मोहिमेत प्राण गमावलेले अंतराळवीर
ही एक अशा पायलटच्या “अनुपस्थितीची” खूण असते—जो आता परत येणार नाही.
फॉर्मेशनचा प्रकार
सामान्यतः चार विमान “V” आकारात उडतात (बाणासारखा आकार):
दोन प्रमुख प्रकार:
1. एक जागा मुद्दाम रिकामी ठेवली जाते — उड्डाणापासूनच.
2. एक विमान अचानक वर चढत दूर जाते — बाकी तीन सरळ पुढे जातात. हे मृत पायलटच्या आत्म्याच्या आकाशाकडे आरोहणाचे प्रतीक आहे.
हा दुसरा प्रकार सर्वात भावनिक आणि ओळखण्यास सोपा आहे.
२) अमेरिकन F-15 टीमची प्रतिक्रिया
अमेरिकेच्या F-15 टीमने त्वरित जाहीर केले की, अशा अपघातानंतर त्यांना शोमध्ये भाग घेणे शक्य नाही.
“आम्ही एका सहकाऱ्याला गमावले आहे. अशा प्रसंगी शो सुरू ठेवणे योग्य नाही,” असे त्यांनी आयोजकांना सांगितले.

स्क्वॉड्रन लीडर नमांश स्याल यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव हिमाचल प्रदेश येथे नेण्यात आले. तेथे त्यांचे अंतिम संस्कार पूर्ण लष्करी सन्मानासह, बंदुकींची सलामी व ‘लास्ट रिट्रीट’ देत करण्यात आले.
त्यांची पत्नी अफसाना स्याल, या देखील भारतीय वायुदलातील फायटर जेट पायलट आहेत. त्यांनी पतीला शेवटचा सलाम दिला आणि सहा वर्षांच्या मुलीचे तसेच वृद्ध वडिलांचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली.
याउलट स्वतःला “स्वतंत्र तज्ञ” म्हणवणाऱ्या काही डिजिटल माध्यमांनी अपघातानंतर तेजसबद्दल चुकीच्या माहितीचा पाऊसच पाडला. अलीकडील सर्वेक्षणात असे दिसून आले की अशी पोस्ट्स भारतीय/हिंदू नावांनी जरी केल्या गेल्या, तरी त्या पाकिस्तान, बांगलादेश आणि काही मध्यपूर्व देशांमधून प्रसारित झाल्या.
मित्रांनो, कोणतीही भारतविरोधी बातमी शेअर करण्याआधी ती कुठून येते हे तपासणे आवश्यक आहे.
WhatsApp मध्ये पाठवणाऱ्याचे लोकेशन पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे—ती वापरा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

HAL हि काही खूप कार्यक्षम कंपनी आहे असे नव्हे.

परंतु बऱ्याच पी एस यु सार्वजनिक न्यास कंपन्यासारखे त्यांच्यावर बाबू लोकांचे फार जास्त नियंत्रण आहे. त्यातून तेथे काम करणारे कामगार सरकारी कंपन्यासारखे काम करत असतात.

एके काळी सु ३१ या विमानांचे उत्पादन भारतात करणे हे थेट रशियाकडून आयात करण्यापेक्षा जास्त महाग होते.
https://www.ndtv.com/india-news/indigenous-sukhoi-30mki-costlier-than-ru...

While the initial unit cost is higher, indigenous production aims for long-term benefits like reduced life cycle costs and greater self-reliance. Skill development: Indigenous manufacturing helps build advanced skill sets in India.
Long-term savings: Over time, increased local production facilities could lead to lower costs for future orders.
Reduced dependency: It decreases long-term reliance on Russian OEMs for maintenance and repairs, and enables faster turnaround times.

दुर्दैवाने कोणतेही काम खाजगी क्षेत्रात दिले कि आपल्याकडचे दळभद्री समाजवादी देश विकायला काढला आहे असा टाहो फोडतात.

यामुळे एक राजकीय अपरिहार्यता म्हंणून कामे सार्वजनिक कंपन्यांनाच द्यायला लागतात.

त्यातून संरक्षण विषयक काहीही असले कि बोलायलाच नको.

कोणत्या ही गोष्टीचे तंत्रज्ञान तुम्ही स्वतः विकसित करता तेंव्हा त्याचा LEARNING CURVE बराच लांब असतो निया त्यासाठी लागणार भांडवली खर्च प्रचंड असतो पण जेंव्हा या गोष्टी सुरळीत होतात त्यानंतर त्याचे खरे फायदे दिसू लागतात. इसरो किंवा अणुऊर्जा हि क्षेत्रे अशी आहेत जेथे आता भारत बऱ्यापैकी पुढारलेला आहे. कारण याचे तंत्रज्ञान कोणीही आपल्याला दिले नाही त्यामुळे त्यात दलाली आणि झारीतील शुक्राचार्य कमी होते

याउलट शस्त्रास्त्रांचा बाजार हा अशा दलाल आणि चोरांचा सुळसुळाट असलेला आहे. कराची घोटाळा मुद्दाम वाचा
https://en.wikipedia.org/wiki/Karachi_affair#:~:text=In%201992%2C%20the%...(%24996m).

त्यात मिळणारा मलिदा पण प्रचंड आहे त्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित कसे होणार नाही याकडे बारकाईने लक्ष देणारी राजकारणी बाबू आणि दलाल यांची लॉबी काही दशके भारत कार्यरत होती.

श्री मनोहर पर्रीकर यांनी अशा अनेक बाबू लोकांना मार्गाला लावले, देशाचे दुर्दैव त्यांचे फार यावेळी आणि लवकर निधन झाले. अन्यथा भारत अजूनच जोराने प्रगतीपथावर गेला असता.

DRDO चे अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याच्या वेगवेगळ्या परिस्थितीत आहेत त्याला खीळ घालण्याचे प्रयत्न आपल्या शत्रूंकडून सतत होत असतात. मग हे शत्रू देशांतर्गत किंवा बाहेरचे असोत .

https://www.bhaskarenglish.in/local/rajasthan/news/same-pattern-in-death...

11 Indian Nuclear Scientists Died Unnatural Deaths in 4 Years: Government
https://www.ndtv.com/india-news/11-indian-nuclear-scientists-died-unnatu...

चर्चा वाजतो आहे.‌ अपघात दुःखद आहेच पण त्यामुळे प्रगतीकडे वाटचाल थांबायला नको.‌ वैमानिकाला श्रद्धांजली .‌

11 Indian Nuclear Scientists Died Unnatural Deaths in 4 Years: Government >>> त्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांना श्रद्धांजली. मागच्या अकरा वर्षांत, या मृत्यूंना जबाबदार असलेल्या व्यक्तींना-संस्थांना काय शासन झाले, किमान त्या दिशेने शासनाने काय प्रयत्न केले हेही वाचायला आवडेल.

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https:...

Scientists-mysterious-deaths-Answer.jpg

वैज्ञानिक २००९ -२०१४ या युपीए सरकारच्या काळात मृत पावलेले. हा ॲनेक्श्चर २०१५ मधे मोदी सरकारने संसदेत सादर केलेल्या अहवालाचा आहे. लिंक्स फॉरवर्ड करताना मूळ स्त्रोत एकदा पडताळून पहाणे फार आवश्यक असते आणि माझ्या मते पुर्णपणे चुकीच्या माहीतीपेक्षा अर्धसत्य हे फार फार परीणामकारकरित्या घातक असते, कारण त्यात वरवर पहाता खऱ्या आणि निर्हेतूक दिसणाऱ्या बातम्यांच्या मागे बहूसंख्याच्या (due to Rational Ignorance ) ध्यानात न येणारा आणि जाणीवपुर्वक पेरलेला प्रोपगैंडा असतो.

बऱ्याच वेळेस अशा गोष्टी पूर्ण पुराव्याशिवाय बाहेर आणणे म्हणजे आपल्या शोधास खीळ घालणे असते.

सी आय ए, के जि बी आय एस आय किंवा चिनी गुप्तहेर खाती काय करत आहेत हे संपूर्ण समजल्याशिवाय त्या बद्दल वाच्यता करणे म्हणजे त्यात काम करणाऱ्या दलालांना सावध करणे होऊ शकते यामुळेच सरकार अशा वेळेस "ऑल इस वेल" म्हणून गप्प बसते.

वरील सर्वच केसेस मध्ये घातपात असेलच असे माझे म्हणणे नाही

परंतु सज्जड पुरावा नसेल तर ते प्रकरण न्यायालयापर्यंत नेण्यात तपास यंत्रणांना फायदा नसतो त्यामुळे त्याबाबतचे धूसर पुरावे उजेडात आणण्यात हशील नसतो.

अगदी कमी काळात ११ अणुशास्त्रज्ञ अनैसर्गिक रित्या मृत्यू पावणे हि गोष्ट साधी सरळ नक्कीच नाही/ नसते.

डॉ होमी भाभा यांच्या विमानाला सी आय ए ने अपघात घडवून आणला होता हे नंतर उघडकीस आले.

ALL THESE CASES OF UNNATURAL DEATHS

nothing unusual was UNEARTHED

दोन रेषांच्या मध्ये बरंच सत्य दडलेला असू शकतं. परिच्छेद परत एकदा वाचल्यास त्यातुन बरंच काही अनुमान काढता येईल.

कुडानकुलम अणुशक्ती केंद्र या विरुद्ध आंदोलन आणि त्यात ख्रिश्चन डायोसिस चर्चचा हात हे प्रकरण एकदा वाचून पाहा. काँग्रेसच्या काळातील आहे. डॉ मनमोहन सिंह यांनी संसदेत त्यावर भाष्य हि केलं होतं. वरील ११ शास्त्रज्ञांचे अनैसर्गिक मृत्यू हे याच काळातील आहेत.

During the peak of the Kudankulam Nuclear Power Plant protests around 2011-2012, then-Prime Minister Dr. Manmohan Singh publicly alleged that non-governmental organizations (NGOs), some with foreign funding from the US and Scandinavian countries, were behind the agitation. The Christian diocese and local churches were identified as central focal points and sources of moral support for the local protesters.
कुडानकुलम प्रकल्प रशियाच्या तांत्रिक साहाय्याने चालू होता हे येथे नमूद करण्यासारखे आहे.
https://www.firstpost.com/india/kudankulam-protests-hijacked-by-the-chur...

https://kaipullai.com/2012/03/22/5-reasons-why-there-is-something-wrong-...

पुर्णपणे चुकीच्या माहीतीपेक्षा अर्धसत्य हे फार फार परीणामकारकरित्या घातक असते, कारण त्यात वरवर पहाता खऱ्या आणि निर्हेतूक दिसणाऱ्या बातम्यांच्या मागे बहूसंख्याच्या (due to Rational Ignorance ) ध्यानात न येणारा आणि जाणीवपुर्वक पेरलेला प्रोपगैंडा असतो.

हे आपले मत आहे आणि मी त्याच्याशी सहमत नाही एवढेच बोलून मी खाली बसतो.

अगदी कमी काळात ११ अणुशास्त्रज्ञ अनैसर्गिक रित्या मृत्यू पावणे हि गोष्ट साधी सरळ नक्कीच नाही/ नसते.>>
daniel-kahneman-quote-lbp7v8x.jpga-half-truth-is-the-worst-of-all-liesbecause-it-can-be-defended-in-partiality-quote-1.jpg

Pages