Submitted by मी अभिजीत on 22 November, 2025 - 21:42
मागतो तितका हवा आहे मला
जन्म हा भटका हवा आहे मला
घेउ दे आतातरी ओझे तुझे
भार हा हलका हवा आहे मला
मानले निर्दोष दुनियेने असा
आणखी ठपका हवा आहे मला
प्रेम आणि हक्क दोन्ही सांगतो
राग हा लटका हवा आहे मला
फार खाल्ली आयती भाकर तुझी
दे तुझा चटका हवा आहे मला
लागली तल्लफ सहानुभूतिची
चेहरा रडका हवा आहे मला
काढ रांगोळी तुझ्या दारापुढे
पण इथे ठिपका हवा आहे मला
देउनी बंदूक, गोळ्या बोलला
फक्त हा खटका हवा आहे मला
अभिजीत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा