काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फार मोठा बॉम्ब टाकला आहे!
https://youtu.be/VtNXgoykj_s?si=nUbETaMthEcuqrsQ
हरयाणा निवडणुकीत मतदान यादीत एकेक नाव शंभर वेळा टाकून फेक मतदार तयार केले गेले आहेत. एका ब्राझीलच्या महिलेचा फोटो वापरून २००+ वोटर आयडी बनवले गेले आहेत. जी फार वायरल झाल्याने भारतीय जनता पार्टीला आता ब्राझिलियन जनता पार्टी म्हटले जात आहे. तर काही भाजप समर्थकांच्या घरात एका पत्त्यावर शंभर मतदार राहतात असेही दाखवले आहे. या सर्व केसेसमध्ये बाहेरून आलेल्या भाजप समर्थकांनी मत दिले आहेत असा राहुल गांधी यांचा दावा आहे. तसेच कित्येक काँग्रेस समर्थकांची नावे मतदार यादीतून हटवली गेली आहेत.
मतदार यादीतील हा घोटाळा त्यांनी पुराव्यासह सिद्ध केला आहे. पण त्या बोगस ओळखीवर नक्की कोणी मत दिले याचे सीसीटीव्ही फुटेज आता उपलब्ध नसल्याने ते सिद्ध करता आले नाहीये. अधिक माहितीसाठी वरील व्हिडिओ बघा.
निवडणूक आयोग भाजपाला विकले गेले आहे आणि हे आता एका इंडस्ट्री सारखे काम करत आहेत असा त्यांचा दावा आहे.
राहुल गांधी यांनी तब्बल २५ लाख मतांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. जरी प्रमाण इतके नसले तरी यात काही प्रमाणात जरी सत्य असले तर हे लोकशाहीच्या दृष्टीनं फार घातक आहे.
मला राजकारणात तसाही आधीपासून रस नव्हता आणि हल्ली तर सगळ्यांवरचा विश्वास उडाला आहे आणि सारेच चोर वाटू लागले आहेत.
पण हे काहीतरी गंभीर वाटले म्हणून धागा काढला आहे.
इथे सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून यावर चर्चा करावी असे आवाहन करतो. जेणेकरून या संदर्भातील सत्य जनतेसमोर येईल.
प्रकरण गंभीर असलं तरी लोक फार
प्रकरण गंभीर असलं तरी लोक फार फार तर 2 3 divas चर्चा करतील.
नंतर परत ये रे माझ्या मागल्या.
बहुतांशी लोकांना लोकशाही कशाशी खातात हेच माहीत नाही.
अगोदर ही म्हटलो होतो आणि परत म्हणतोय: जनता मुर्दाड आहे आपली.
मुर्दाड वगैरे काही नाही.
मुर्दाड वगैरे काही नाही. बहुतेक वेळा उपलब्ध पर्यायांपैकी योग्य निवडतात लोकं. बरं आपल्याला जो आवडतो तोच चांगला बाकी वाईट अशी पण मानसिकता असते बऱ्याच वेळा.
मतदार याद्यात बऱ्याच चुका आहेत. राहुल गांधी यांनी योग्य मुद्दा घेतला आहे. इलेकशन कमिशन ने पण SIR का कांय ते महाराष्ट्रत पण चालू केले पाहिजे.
गावात तरी दुबार /बोगस मतदान करणं अवघड आहे. प्रत्येक प्रमुख पक्षाचा एजन्ट मतदार केंद्रात असतो आणि त्यांच्या कडेही मातदार यादी असते. थोडा जरी संशय आला तरी आक्षेप नोंदवला जातो.
पण जिथं संपूर्ण गावंच एकतर्फी आहे तिथं बोगस मतदान सहज शक्य होत. विशेषकरुण आमदार /खासदारची गाव. जिथं नेत्यांच्या उद्योगामुळे लोकं घाबरून असतात. त्यावर उपाय म्हणून विडिओ रेकॉर्डिंग किंवा दोन मतदानात वेळ ठेवणे, असले उपाय आयोगाने केलेले आहेत.
मुर्दाड वगैरे काही नाही.
मुर्दाड वगैरे काही नाही. बहुतेक वेळा उपलब्ध पर्यायांपैकी योग्य निवडतात लोकं.
कट्टर समर्थक किंवा विरोधक
कट्टर समर्थक किंवा विरोधक असलेल्यांची गोष्ट मात्र वेगळी आहे.
शाहरुख खान चा उल्लेख नाही.
शाहरुख खान चा उल्लेख नाही. शाहरूख खानने मतदान केले का? त्याचे नाव होते की नाही हे काहीच सांगितले नाही. मतदान केंद्रावर तो कसा आला. किती वाजता आला. किती वाजता उठला. काय जेवला ही माहिती दिली नाही तर हा धागा या आयडीने काढून फाऊल केला.
( या आयडीकडून धागे भरकटवले जात असताना गप्प बसणारे माझ्या कमेंट्स वर नापसंती दर्शविण्यासाठी येणार. स्वागत आहे)
प्रकरण गंभीर असलं तरी लोक फार
प्रकरण गंभीर असलं तरी लोक फार फार तर 2 3 divas चर्चा करतील.
>>>>>>>
म्हणून याला स्वतंत्र धाग्यात आणि चालू घडामोडी विभागात घेतले आहे. अन्यथा कुठेतरी आत राजकीय चर्चांचा धाग्यावर याची चर्चा होत असेलच.
इथे काँग्रेस विरुद्ध भाजपा करण्यात देखील रस नाहीये. तो काँग्रेस पक्ष सुद्धा काही धुतल्या तांदळाचा नाहीये. त्यांनी हे सारे कमी अधिक प्रमाणात शक्य तिथे करून झाले असणारच. पण जर हे मोठ्या प्रमाणावर होत असेल निवडणूक आयोग सुद्धा यात काही प्रमाणात सामील असेल तर ती स्थिती जास्त डेंजरस वाटत आहे.
@ रात्रीचे चांदणे, ही घटना हरयाणातील आहे. तिथली परिस्थिती काय आहे, तिथे असे झोल यशस्वी करण्याची शक्यता किती आहे याची निदान मला तरी कल्पना नाही.
शाहरूख खान.
शाहरूख खान ची गुंतवणूक हा चालू घडामोडींचा विषय आहे.
तो राजकारणी आहे असे त्या धाग्यावर म्हटले आहे. तो भारतीय आहे आणि मतदार आहे. या धाग्यावर परफेक्ट आहे.
शाहरूख खान ला कोण इग्नोर करतंय?