तुषार अमृताचे

Submitted by चंद्रहास शास्त्री on 29 October, 2025 - 23:10

तुषार अमृताचे
©️ हसरा चन्द्र

अंगावरी येती कधी, तुषार स्वये अमृताचे
काटाच येतो घेऊनी, बीज कोवळ्या फुलांचे.

नसतोच तसा मी तेव्हा, माझा असा राहिलेलो
उघडझाप ही खिडकीची, ताटवे उभे लतांचे

मग तेव्हा खरी वाटते, कागदी नाव आपुली
जाणते तीच ती काही, अर्थ अबोल भावनांचे

वैशाख वणवा थांबतो, येतो पाऊस जरासा
अंदाजही अवचित कधी, चुकतात हवामानाचे

डोळे मिटून ही बदके, जरी का अवतीभोवती
हंस तरी वेचून जाती, मोती सहज प्राक्तनाचे

Group content visibility: 
Use group defaults