Submitted by द्वैत on 26 October, 2025 - 03:44
एका आसवाचा शोक
करू नको दुणा
सांजवेळी दारी नवा
येईल पाहुणा
सारवल्या अंगणात
पक्षीही येईल
तशी लाट पुनवेची
ओसरू लागेल
ऊन डोकावेल कधी
सावली थांबेल
हसता हसता कधी
पापणी भरेल
नको मोजू अशावेळी
माळेतले मणी
विझू देत दिव्यासंगे
काही आठवणी
आळोखे पिळोखे देत
उजाडेल दिशा
जा धीराने ओलांडून
काजळाची रेषा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओहो!! फारच फारच सुंदर. अतिशय
ओहो!! फारच फारच सुंदर. अतिशय सकारात्मक.
>>>>एका आसवाचा शोक
करू नको दुणा
सांजवेळी दारी नवा
येईल पाहुणा
वाह! वाह!
>>>>>नको मोजू अशावेळी
>>>>>नको मोजू अशावेळी
माळेतले मणी
विझू देत दिव्यासंगे
काही आठवणी
_/\_ काही आठवणी विझत नाहीत.
सुंदर...
सुंदर...