लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट

Submitted by ऋतुराज. on 26 October, 2025 - 01:42

लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट

लोकसत्ताच्या १९ ऑक्टोबरच्या लोकरंग पुरवणीत "कलातारक लिटफेस्ट" (डॉ कमल राजे) आणि "संमेलन आणि लिटफेस्ट: काही निरीक्षणे" (मेघना भुस्कुटे) हे दोन लेख आले होते. त्याबरोबरच मुंबईत होणाऱ्या आगामी लिटफेस्टची घोषणा देखील करण्यात आली.
कथा, काव्य, नाट्य, शिल्प, नृत्य, लोककला, चित्रकला आदी सर्व कलांचा समावेश असणारा 'लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट' मराठी संस्कृतीच्या बहुआयामी सौंदर्याची खूण ठळक करेल. कथा-कादंबऱ्यांच्या लेखकांशी संवाद, व्यंगचित्रांमधील गंमत, नाटक-सिनेमातील मंडळींशी सजग गप्पा, लोककलांशी ओळख, स्टॅण्डअप विनोदजगतातील तारांकितांच्या भेटी, पुस्तक प्रकाशन, वाचकांच्या भेटीला लेखक, वर्तमान काळाशी भान असलेल्या साहित्यिकांचा वैचारिक पैस अनुभवण्याची संधी आणि या सगळ्याबरोबरच पुस्तक खरेदीची मौज असा रंगतदार सोहळा अनुभवायला मिळणार आहे.
अश्या या साहित्य आणि कलाविषयक बहुरंगी कार्यक्रमाची रूपरेषा व वेळापत्रक खाली दिले आहे.
https://epaper.loksatta.com/Mumbai-marathi-epaper?eid=7&edate=26/10/2025...
https://epaper.loksatta.com/Mumbai-marathi-epaper?eid=7&edate=26/10/2025...
हा अभिजात लिटफेस्ट, प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर प्रांगण, कल्याण येथील आचार्य अत्रे सभागृह, पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा होईल.
संदर्भ: लोकसत्ता.

मुंबई ठाण्यातील मायबोलीकरांनी या सर्व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Following.

सुनिता देशपांडे( आहे मनोहर तरी), शरद बाविस्कर( सुरा) यांच्या पुस्तकांतून बरेच कळले आहे. शरद बाविस्करांची डॉ.‌आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली मुलाखतही यूट्यूबवर आहे. आता नवीन काय निष्पन्न होईल? तसेच इतर कलाकार, लेखकांचे असावे.

*लिटफेस्ट' मराठी संस्कृतीच्या बहुआयामी सौंदर्याची खूण ठळक करेल. * - उपक्रम स्तुत्य आहे, मलाही कांहीं कार्यक्रमाना तरी हजेरी लावायला खूप आवडेल.
( अभिजात, मराठी संस्कृती इ. अधोरेखित करताना कार्यक्रमाला नांव मात्र ' लिटफेस्ट ' द्यायचं हे मला तरी फार खटकतं ! ' साहित्य सोहळा ' किंवा तत्सम कांहीही कां नसावं ? )