केबीसीमध्ये दोन तीन दिवसापूर्वी एक गुजरातचा मुलगा आला होता जो काही नकारात्मक कारणांनी वेगाने वायरल झाला आहे.
उद्धट, उर्मट, ओवरकॉन्फिडंट म्हणून ट्रोल होत आहे. आई-वडिलांनी दिलेले संस्कार काढले जात आहेत. प्रथमदर्शनी त्याचा शॉर्ट व्हिडिओ पाहिल्यावर माझेही साधारण तसेच मत झाले. पण ठीक आहे, असतात अशी मुले म्हणून पुढे निघून गेलो.
त्यानंतर मात्र दोनेक दिवसात बरेच पोस्ट पाहिल्या ज्यामध्ये तो फार वाईट पद्धतीने ट्रोल होत होता. वाईट वाटले.
आता फेसबुकवर एक पोस्ट पाहिली. त्यात थोडा वेगळा अँगल मांडला होता. वैद्यकीय दृष्टिकोनातून त्याच्या वागण्याचे विश्लेषण केले होते. अर्थात ही फक्त एक शक्यताच होती. प्रत्यक्षात सत्य जे असेल ते असेल..
पण ती पोस्ट वाचून मी मुद्दाम शोधून त्या मुलाचा पूर्ण व्हिडिओ पाहिला.
तुम्ही देखील फक्त शॉर्ट व्हिडीओ पाहिले असल्यास पूर्ण व्हिडिओ जरूर पहा
https://youtu.be/IEijtBQlovA?si=ZnQwP6oURdwX3aYF
दीड दोन मिनिटाच्या शॉर्ट मध्ये त्याचे मोजके संवाद एडिट करून घेतल्याने प्रकरण जितके डेंजर वाटत होते तितकेदेखील नव्हते. पूर्ण व्हिडिओमध्ये त्याच्यातील काही चांगल्या सवयी देखील जाणवल्या. जसे की फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये जिंकून हॉट सीटवर बसायला आल्यावर पाया पडून देवाचे आभार मानणे. शांत असतानाचे त्याचे हास्य निरागसच भासले. आणि हरल्यावर आता पैसे मिळणार नाहीत या दुःखापेक्षा आता अमिताभ बच्चन सोबत फोटो काढायला मिळणार नाही याचे त्याला जास्त दुःख झाले.
आधी तो जे प्रसंगी अमिताभासारख्या जेष्ठ व्यक्तीचा अनादर करून बोलत होता ते शेवटच्या क्षणाला बिलकुल जाणवले नाही.
उलट मला त्या मुलावर आणि त्याच्या पालकांवर तोंडसुख घेणारी माणसे चूकीची वाटू लागली. जर त्या मुलावर योग्य संस्कार झाले नसतील तर त्याच्या बालमनावर काय परिणाम होईल याचा विचार न करता त्याला सोशलमीडियावर नावे ठेवणारी माणसे तरी मग कशी सुसंस्कृत म्हणावीत?
अर्थात यानिमित्ताने पॅरेंटिंग कशी असावी यावर देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या योग्य भाषेत आणि त्या मुलाला टार्गेट न करता असतील तर त्यावर बिलकुल आक्षेप नाही. त्यांचे स्वागतच राहील. या निमित्ताने त्या व्हाव्यात. कारण आताची पिढी आणि आधीची पिढी यातील जनरेशन गॅप कमालीचा मोठा आहे. आधीच्या तुलनेत मुलांना सूट देण्याचे प्रमाण जसे वाढले आहे, तसे ते खटकणारे देखील बरेच आहेत जे सारे या मुलाच्या निमित्ताने रिंगणात उतरले आहेत असे बरेच पोस्ट पाहून वाटल्या.
मलाही साधारण याच वयाची मुले असल्याने या विषयावर चर्चा करायला आणि त्या मुलाला कोणी टारगेट करताना दिसले तर त्यांना समर्थन देऊ नका ही विनंती करायला हा धागा.
ह्या मुलाचा नाद सोडा. आत्ता
ह्या मुलाचा नाद सोडा. आत्ता लेटेस्ट एपिसोडमध्ये जावेद अख्तर आणि फरहान अख्तर आले आहेत ते बघा.
माझ्या फीडमधे आज https://www
माझ्या फीडमधे आज https://www.youtube.com/watch?v=4sWafDZVvFk हा विडीओ आला. त्यातल्या बाईंची 'लहानपणी पालकांनी धुतले म्हणून ..... ' अशी सुरुवात बघुनच धन्य झाले.
मला वाटते शो स्पाईस अप करायला मुद्दामच त्या मुलाची निवड केली. बाउंड्रीज ची समज नसलेला एखादा मुलगा असतो तसा वाटला. मुलाचे वागणे स्क्रिप्टेड वाटले नाही. मात्र त्याच्या पर्सनॅलिटीची जाणीव मोठ्यांना असणार आणि त्यातुन 'गंमत' होईल अशी अपेक्षाही असणार, थोडक्यात मोठ्यांच्या रिअॅक्शन त्यानुसार स्क्रिप्टेड ! इतक्या लहान मुलाला इतके ट्रोल करणे, विडीयो व्हायरल वगैरे बघता शो वाल्यांना जे अपेक्षित होते ते झाले.
खरा प्रश्न आहे तो त्या लहान मुलाला अहमिकेने ट्रोल करणार्या मोठ्यांच्या मानसिकतेचा! ९-१० वर्षाचे लहान मूल ! ज्याला थोडी वर्तन समस्या दिसत आहे असे कुणाचे तरी लेकरु! शो वर आले म्हणून इतके पाठी लागायचे? अशी मुलं समाजात असतात. आपण शाळेत असताना आपल्या वर्गात किंवा शेजारच्या वर्गात असे एखादे मूल असे. आत्ताही आपल्या ओळखीत-नात्यात असेल. आपल्याला टिवीवर दिसतो तो शो. ती दोन-दोन मिनीटांची क्लिप्स म्हणजे आख्खा मुलगा नव्हे. टिवी शोत भाग घेण्यासाठी त्याचे पालक त्याला घेवून आले याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्या अजाण लेकराला ट्रोल करायचा फ्री पास मिळाला. त्याचे संस्कार काढताना लोकांनी स्वतःचेच संस्कार उघडे पाडले. त्या मुलाचे वर्तन सुधारायला नक्कीच वाव आहे, पण मोठ्यांचे काय?
तुझा धागा म्हणून वाचला. काय
तुझा धागा म्हणून वाचला. काय झालंय अंदाज आला, व्हिडिओ अजिबात बघणार नाही किंवा चर्चा ही करणार नाही.
यात तो मुलगा ट्रोल होतंय हे तुला समजतंय. तू लहान मुलांच्या बाबत सजग आणि संवेदनाशील आहेस हे मला माहित आहे. तर कशाला काढतोस असे धागे? बाकी सिनेमा धागे इ. बद्दल काही प्रश्न नाही. पण मायनर ट्रोल होतोय तर ते करू नये. चूक कुणाची हा प्रश्नच नाही. आपला हातभात लागू नये वाटतं.
पण अनिताब बच्चनने हा एपिसोड
पण अनिताब बच्चनने हा एपिसोड केला त्याबद्दल त्याला कोणी द्दुषण देत नाहीये हे पाहून मजा वाटली.
Hmm, कॉन्ट्रॅक्ट से बंधा हुआ
Hmm, कॉन्ट्रॅक्ट से बंधा हुआ असेल बहुतेक
जर scripted नसेल तर अमिताभला
जर scripted नसेल तर अमिताभला का दोष द्यायचा? आणि असेल तर त्यासह पूर्ण केबीसी टीम दोषी आहे असे वर म्हटले आहेच.
आज मला धडाधड केबीसीचेच व्हिडिओ दिसत आहेत. अमिताभ आणि शाहरुख ही दोन माणसे कमाल आहेत. त्यांच्याकडून खरे तर कसे बोलावे आणि कसे वागावे हे शिकण्यासारखे बरेच आहे. जर आपली मुले त्यांचे चाहते असतील आणि त्यांची वर्तणूक ओबजर्व करत असतील तर त्यांच्यावर आपसूक चांगले संस्कार होताहेत असे समजावे.
पूर्ण केबीसी टीम दोषी आहे असे
पूर्ण केबीसी टीम दोषी आहे असे वर म्हटले आहेच.>>> गंदा है पार धंदा है. ठीक है,पण अनिताभ You too ...
त्याने कुठे काही त्याबद्दल मत नोंदवले आहे? आणि अमिताभ आणि शाखा रोल मॉडेल? देवा रे देवा. झडकरी धाव, उचील मला.
पूर्ण केबीसी टीम दोषी आहे असे
डपौ
त्यांची वर्तणूक ओबजर्व करत
त्यांची वर्तणूक ओबजर्व करत असतील तर त्यांच्यावर आपसूक चांगले संस्कार होताहेत असे समजावे
>>>
म्हणजे तू इथं समाजशास्त्र लिहायला मोकळा.
आधी जा बघ ते काय करतायेत.
"त्यांची वर्तणूक ओबजर्व करत
"त्यांची वर्तणूक ओबजर्व करत असतील तर त्यांच्यावर आपसूक चांगले संस्कार होताहेत असे समजावे" -
असा उद्याचा भारत घडणार तर! रेखाय नमः, परवीनाय नमः, अमृताय नमः... गेला बाजार प्रियांकाय नमः
मी फक्त शाहरुख आणि अमिताभ
मी फक्त शाहरुख आणि अमिताभ बद्दल लिहिले. इतर कलाकारांची नावे कश्याला त्यात जोडत आहात.
आमची पिढी नशिबवान होती जे आम्ही सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खान यांच्या बहरत्या कारकिर्दी सोबत मोठे झालो आणि अमिताभ आमच्या पिढीला सुद्धा पुरला.
तुमच्या पिढीचे युथ आयकॉन आणि सुपरस्टार कोण आहेत हे त्या पिढीच्या जडणघडणीत फार मॅटर करते.
आणि केशवकूल, जर शो स्क्रिप्टेड असेल तर केबीसी टीमला दोषी ठरवले आहे. माझ्या मते ती शक्यता कमी आहे असे आधीच लिहिले होते. काहीनी ती शक्यता उचलून धरली म्हणून म्हटले.
"फक्त शाहरुख आणि अमिताभ बद्दल
"फक्त शाहरुख आणि अमिताभ बद्दल लिहिले. इतर कलाकारांची नावे कश्याला त्यात जोडत आहात." - हाय रे निरागसता! मैं सद़कें जावा
... सरांना ह्या महापुरुषांची ह्या मंत्रोच्चारांशी असलेली फलश्रुती माहीत नाही.

(No subject)
त्या या दोघांच्या हिरोईन आहेत
त्या या दोघांच्या हिरोईन आहेत? म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे? खरेच समजले नाही..
असो, शुभ रात्री
साधना - औदा म्हणजे (कामाच्या
साधना - औदा म्हणजे (कामाच्या ठिकाणची) पोझिशन इतके माहीत आहे. नमक हलाल मधे अमिताभच्या तोंडी संवाद आहे बहुतेक स्मिता पाटीलशी सुरूवातीला बोलताना (आमचे बरेच हिंदी ज्ञान हे बॉलीवूडमधून आलेले आहे
) - सापडला तो संवाद 
अमिताभची कॉमेण्ट आली आहे कोठेतरी - इंटेलिजंट लडका है लेकिन ओव्हरकॉन्फिडंट है असे काहीतरी, पण इतकेच.
बाकी स्वाती२ च्या व त्यासारख्या मताच्या इतर प्रतिक्रियांशी सहमत.
वरती निल्स_२३ यांची पोस्ट व केबीसी मधे उपस्थित राहिलेल्या इतरांकडून थेट ऐकलेल्या अनुभवांवरून हे स्क्रिप्टेड नसावे असे वाटते. तो मुलगा जे बोलला ते त्याच्या स्वभावानुसार वाटले - तो "बेअरिंग" घेउन बोलतोय असे वाटले नाही. स्पर्धकांत एक मुलगा असा आहे हे दिसल्यावर तो मुलगाच हॉट सीटवर येईल हे बघितले जाणे - हे स्क्रिप्टेड असू शकते.
यात तो मुलगा ट्रोल होतंय हे
यात तो मुलगा ट्रोल होतंय हे तुला समजतंय. तू लहान मुलांच्या बाबत सजग आणि संवेदनाशील आहेस हे मला माहित आहे. तर कशाला काढतोस असे धागे?
<>>>>>>>>>>>>
असा एखादा प्रतिसाद अपेक्षित होताच. मी तो टाळणार होतो. पण तुमचा आहे म्हणून उत्तर देतो.
काल जेव्हा मला माझी बायको त्याची क्लिप बघून म्हणाली की बापरे किती उद्धट मुलगा आहे. तेव्हा तिचे मत चूक की बरोबर हा विचार माझ्या डोक्यात आला नाही. कारण तिला जे वाटले ते ती मला म्हणाली. तिला सोशल मीडियावर कॉमेंट टाकायची सवय असती तर तिने तिथे तशीच कॉमेंट टाकली असती. तिची कॉमेंट तिच्या जागी प्रामाणिक देखील असती. पण तिला याची कल्पना नसती की त्याचवेळी अश्या हजारो लाखो कॉमेंट पडत आहेत. परिणामी एक लहान मुलगा ट्रोल होत आहे. जेव्हा बहुतांश कॉमेंट अश्याच दिसतात तेव्हा नव्याने कॉमेंट टाकणाऱ्याचे मत आणखी बळकट होत जाते आणि तो पदरची चार वाक्ये आणखी जोडतो.
मी तेव्हा तिला या प्रकाराची जाणीव करून दिली आणि परिणामी तिच्या मनात लागलीच त्या मुलाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. अगदी आज देखील मला ती म्हणाली बिचारा फारच ट्रोल होत आहे.
मी लोकांना तीच जाणीव करून द्यायला धागा काढला आहे. त्याला सपोर्ट करायला काढला आहे. आणि तो ही उगाच करायचा म्हणून नाही तर इतर बाबीकडे लक्ष वेधून करत आहे. व्हिडिओ देखील मी मुद्दाम पूर्ण शेअर केला आहे, कारण बहुतांश लोकांनी एडिटेड दीड दोन मिनिटे बघून त्याला जज करायला सुरुवात केली आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्यास एखाद्याचे कडवट मत नक्कीच डायल्यूट होईल.
माझा धागा काढण्याआधीच तो पुरेसा ट्रोल झाला आहे. माझा धागा बघून कोणी अजून त्याला ट्रोल करणार असेल तर या मानसिकतेचे मी काही करू शकत नाही. पण मला वाटते आपण सकारात्मक चर्चा घडवू शकलो तर या निमित्ताने बरेच जण वेगळ्या अँगलने विचार करून तो विचार पसरवू शकतात. कारण प्रश्न या एका मुलाचा नाहीये तर हे पुढे इतर कैक मुलांसोबत होऊ शकते. त्यामुळे आज पसरलेले विचार पुढच्यावेळी कामी येऊ शकतात.
या मुलाबाबत म्हणायचे झाल्यास आधीच इंटरनेटवर खूप निगेटीव्ह footprint तयार झाल्या आहेत. आता त्याला समजून घेऊन सपोर्ट दर्शवणाऱ्या फूटप्रिंट तयार होत असतील तर होऊ द्यावे.
अर्थात मला कल्पना आहे की निगेटिव्हिटी जितक्या वेगाने पसरते तितकी पॉझिटिव्हिटी पसरत नाही. पण म्हणून तो प्रयत्न करू नये हा मार्ग नाही झाला. तर प्रयत्न कायम रहावा हे उलट जास्त गरजेचे आहे.
आणखी एक चिंतेची गोष्ट जी मी आधी सुद्धा इतर बरेच ठिकाणी म्हणालो आहे ती म्हणजे या सोशल मीडियावरील वाढत्या ट्रोलिंगबाबत.. दुर्दैवाने पब्लिकली कोणी चुकीचे वागले तर त्याला नावे ठेवणे आमचा हक्कच आहे अशी मानसिकता कित्येक जणांमध्ये दिसते.
एकीकडे आपण अभिव्यक्तीस्वातंत्र्याबाबत जागरूक असतो. पण एखाद्या पब्लिक फिगरला ट्रोल करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येत नसून नेमके त्याउलट झुंडशाहीत येते जे स्वतःच न्यायनिवाडा करून समोरच्याला शिक्षा देतात.
लहान मुलगाच नाही तर मोठ्यांचे ट्रोलिंग सुद्धा करू नये हे जेव्हा जास्तीत जास्त लोकांना समजेल तो सुदिन. पण तूर्तास कोवळ्या मनांचा विचार करून तरी आपले मत काहीही असो ते मांडताना लोकं शब्दांची काळजी घेऊ लागले तरी पुरे.
खुट्टं झालं कि प्रतिक्रिया
खुट्टं झालं कि प्रतिक्रिया दिली पाहीजे का ? हा प्रश्न माझा स्वतःला आहे. अशा घटनेमागचा पॅटर्न बघून एकदाच प्रतिक्रिया देणं योग्य असं मला वाटतं. नेटवर लोक पिचकार्या मारतात, ते प्रतिसाद नसतात. अशा पिचकार्यांची बातमी होते आणि लोक त्या लाटेत वाहवत जातात.
स्त्रिया, लहान मुलं , दुर्बल घटक यांच्या विरोधात जहरी आणि विखारी प्रतिक्रिया हा आजचा प्रॉब्लेम नाही. लोकांनी हे इग्नोर करायचं असतं असे संकेत ठरवलेत. म्हणजे जे काही चालू आहे त्याबद्दल तुम्ही संताप व्यक्त केला तर तुम्ही मूर्खात जमा होता. दुसरीकडे आपणच समाज कुठे चालला आहे म्हणून लंबुळक्या तोंडाने प्रतिक्रिया देतो.
लहान मुलाच्या कानाखाली द्या असे म्हणण्यात काही चुकतेय असे वाटत नाही का ? अमिताभ बच्चनला उद्धट उत्तरे दिल्याने ज्यांच्या अंगाचा तीळपापड झाला आहे ते लोक इतरांच्या श्रद्धास्थानाबद्दल कसे व्यक्त होतात (१००% नाही,नाहीतर कुणी तरी कीस पाडेल) . फक्त दुटप्पीपणा म्हणून सोडून देता येत नाही.
लहान मुलं. संस्कारक्षम वयातली पिढी जेव्हा एखादी बातमी आणि त्यावरच्या जालीय प्रतिक्रिया वाचत असेल तेव्हां त्या पिढीचे शिक्षण कसे होत असेल ? एखाद्या घटनेबद्दल कशी प्रतिक्रिया द्यावी याबद्दल त्यांच्यावर कोणते संस्कार होत असतील ? संघटीत प्रकार असल्याशिवाय व्हायरल होणे कठीण असते.
मग अशा घटनांना रोखावे म्हणून सरकारवर संघटीतपणे दबाव का आणता येत नाही ? अण्णांच्या आंदोलनात लोक संघटीत होऊ शकतात तर या प्रकाराबद्दल का नाही ? नाहीतर मग सगळेच इग्नोर केले पाहीजे.
संस्कारक्षम वयातली पिढी
संस्कारक्षम वयातली पिढी जेव्हा एखादी बातमी आणि त्यावरच्या जालीय प्रतिक्रिया वाचत असेल तेव्हां त्या पिढीचे शिक्षण कसे होत असेल?
>>>>>>>>>>>>
हा एक चांगला मुद्दा आहे. त्या प्रतिसादातून मुलांना जग कसे आहे हे समजत असते. किंबहुना जग असेच आहे असा अर्थ ते काढत असतात जो चुकीचा आहे. सोशलमिडियावरच्या विखारी जगापेक्षा आपले आजूबाजूचे जग जास्त प्रगल्भ आहे. जास्त समजूतदारपणे विचार करणारे आहे. सोशल मीडियावर अश्या बातम्याखाली प्रतिसाद देणाऱ्यापैकी कित्येक लोकं आपले फ्रस्ट्रेशन काढायला आलेले असतात किंवा आपल्यालाच समाजाचा उद्धार करायचा आहे या गैरसमजातून आलेले असतात.
यावर उपाय काय तर जिथे शक्य होईल तिथे मुलांना सोशल मिडियापासून दूर ठेवावे. जिथे ते शक्य होणार नाही तिथे त्यांना सतत ते जग आभासी असल्याची आठवण करत राहावी.
ओके. फेअर इनफ!
ओके. फेअर इनफ!
धन्यवाद!
धन्यवाद!
मी तो कार्यक्रम पाहिला होता.
मी तो कार्यक्रम पाहिला होता. मला तेंव्हा तो मुलगा उर्मट, गर्विष्ठ नक्कीच वाटला नाही. बालिश अति उत्साहात केलेली त्याची दुर्दैवी चूक होती. "बिचारा" असेच वाटले. त्याला आणि त्याच्या आईवडिलांना troll करणारे जळकूट असतात.
Pages