अमेरिकन दादागिरी भाग एक

Submitted by अविनाश जोशी on 9 October, 2025 - 03:47

अमेरिकन दादागिरी भाग एक
सध्या अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची ज्या तऱ्हेनी अमेरिकन दादागिरी चालली आहे ती अमेरिकेच्या सर्व थोर परंपरांना धरूनच आहे. आपल्याला फक्त व्हिएतनाम किंवा फारतर क्युबा आठवतो. परंतु वीस ते पंचवीस देशात तरी अनेक अमेरिकन अध्यक्षांनी असे पराक्रम केले आहेत . बहुतेक ठिकाणी बंड घडवून आणायचे आणि बंडाला पैसे पुरवायचे आणि नंतर देशाला मदत म्हणून सैन्य घुसवायचा किंवा अमेरिकन लोकांची गळचेपी होत आहे म्हणून त्या देशात घुसायचे हा प्रकार कित्येक दशके चालू आहे.
काही प्रमुख देश म्हणजे हवाई बेटे , फिलिपाइन्स , व्हियेतनाम , कोरिया सर्व आखाती देश , इराण , इराक , निकाराग्वा , होंडुरास, कोलंबिया , पनामा, अशी जगभरची अनेक राष्ट्रे त्यात सामील आहेत. असे म्हंटले जाते कि पर्ल हार्बर च्या जपानीज हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले. हे म्हणणे तितकेसे खरे नाही. मूलतः पर्ल हार्बर हा हवाई बेटांचा एक भाग आहे. हवाई बेटांकडून तो बळजबरीने घेण्यात आला आहे. हे तर मान्य करावेच लागेल की सर्व दोस्त राष्ट्रांना , इटली आणि जर्मनी हे दोन महान शत्रू होते. तेव्हा जर्मनीवर अणुबॉम्ब टाकणे संयुक्तीक झाले असते. परंतु इतिहास असे सांगतो की याचा विचार झाला होता परंतु चर्चिलचे असे म्हणणे होते , जर्मनीला असे नष्ट केले गेले तर भविष्य काळात रशियाला थोपवू शकणारी ताकतच युरोप मध्ये उरणार नाही. तसेच जर्मनीच्या पूर्वेकडचे सर्व देश रशिया गिळंकृत करेल.
चर्चिलला अणुबॉम्ब प्रकल्पाची पूर्ण माहिती होती. आणि लॉस अलमॉस येथे यशस्वी अणु चाचणी झाल्यावर , अमेरिकेतून चर्चिलला संदेश गेला 'बेबी इज बॉर्न' आणि त्यांचे प्रतिउत्तर होते 'देन डिलिव्हर इट'.
त्यानंतर जपानवर दोन अणुबॉम्ब टाकण्यात आले. त्याची करणे म्हणजे जपानजवळ कुठलाही दोस्त राष्ट्रांचा भूभाग नव्हता आणि अमेरिकेला समुद्रात काय परिणाम होतो हेही बघायचे होते. आणि सर्वात मुख्य म्हणजे जापनीज गोऱ्या कातडीचे नव्हते. 1760 मध्ये अमेरिका स्वतंत्र झाला असला तरी वंशभेदाची युद्ध ही अमेरिकेतही सर्रास चालू आहेत. डॉक्टर कार्व्हर अथवा मार्टिन लुथर किंग यांची चरित्र अवश्य वाचावीत.
अमेरिकेचे धोरणच असे राहिले आहे की राष्ट्र कमजोर करायचे , इथे क्रांती करायची किंवा स्वतःची वसाहत तयार करायची आणि पुनर्बांधणी नावाखाली तिथे अनेक अमेरिकन उद्योग वसवायचे.
यात निकाराग्वा देशाची फारशी माहित नसलेली गोष्ट आपण बघू. निकाराग्वा हा कोणिसाव्या शतकाच्या पाचव्या किंवा सहाव्या दशकात एक निसर्ग संपन्न आणि रमणीय प्रदेश होता. पश्चिमेकडे पॅसिफिक तर पूर्वेकडे कॅरेबियन समुद्र लाभला होता. त्यामुळे सुंदर समुद्र किनारा आणि उत्पन्नाचे साधन म्हणजे कॉफीचे मळे. हळू हळू अमेरिकन उद्योगाचे लक्ष निकाराग्वाकडे गेले. त्यांनी हळू हळू निकाराग्वात उसाचे पीक घेऊन साखरेच्या उत्पादनास सुरवात केली. ही साखर अर्थातच अमेरिकेला निर्यात होत असे. या व्यवहारात या उद्योगांचा फायदा बराच होता. जसाजसा हा व्यापार वाढू लागला तसा त्याचा फटका अमेरिकेतील उत्पादकांना बसू लागला. अमेरिकेतील उत्पादकांनी सरकारच्या मागे लागून साखरेवर आयात कर बसवला. त्यामुळे निकाराग्वातील साखर उत्पादकांना कमी नफा होऊ लागला आणि त्याचा फटका तेथील गरीब मजुरांना आणि शेतकऱ्यांना बसू लागला. उसामुळे कॉफीची लागवडही कमी झाली होती. तेथील सरकारही अतिशय निष्काळजी आणि लाचलुचपतीने भरलेले होते. अशावेळी झेलाया नावाच्या एका तरुणाने युरोपमध्ये उच्च शिक्षण घेतले. नव्या समाजाची आणि नवीन शास्त्रांची त्याची चांगलीच ओळख झाली. प्रखर देशभक्त असलेला हा तरुण , देशाचे भले करायचे असे स्वप्न घेऊन आपल्या बेल्जीयन बायकोसोबत देशात परत आला आणि तो 1893 साली देशाचा अध्यक्ष झाला. अध्यक्ष झाल्यावर त्याने सामाजिक आणि आर्थिक सुधारणा अमलात आणल्या . सरकारचे सर्व भ्र्रष्टाचार निकालात काढून त्याने दळण वळणाची साधने वाढवली. वीज उत्पादने व इतर महत्वाच्या सेवा सुरु केल्या. आरोग्य सेवा सुरु केली. यासाठी त्याला अर्थातच अमेरिकन उत्पादकांवर कर बसवायला लागले. ते कर अमेरिकन उत्पादकांना जाचक वाटू लागले. अर्थात त्यावेळी अमेरिकन सरकारला हा प्रश्न गंभीर वाटला नाही.
निकाराग्वा देशाचे महत्व अजूनही एका कारणामुळे होते. कॅरेबियन समुद्र आणि प्रशांत महासागर यांना जोडणारा एक कालवा तयार करण्याचे घाटत होते. याकरिता दोन ठिकाणांची पाहणी करण्याचे काम सुरु होते. एक तर निकाराग्वा किंवा मग कोलंबिया देशातील पनामा स्टेट सर्व दृष्टीने निकाराग्वा कालवा हा पनामा कॅनॉल पेक्षा सोपा आणि कमी खर्चाचा होता. झेलाया अमेरिकेला सर्व तर्हेची मदत करायला तयार होता. येथेच अमेरिकन सरकारने निकारगावगा मध्ये कॅनॉल बांधायचयचे ठरवले. परंतु पनामा कॅनॉल च्या आसपास ज्यांच्या जमिनी होत्या त्यांना त्या जमिनी कॅनॉल झाल्यास कोट्यवधी डॉलर्सचा नफा मिळणार होता. त्यांचे बरेसे प्रयत्न विफल गेले. शेवटी त्यांनी एका वकिलाला गाठून त्याच्या मार्फत प्रयत्न सुरु केले. निकाराग्वा मधून कॅनॉल गेल्यास खर्च 15 कोटी डॉलर पर्यंत आला असता तर पानामामध्ये 70 ते 80 कोटी डॉलर गेला असता. पानामातल्या भूधारकांनी लॉक्स नावाच्या एका हुशार वकिलाला या कारणाकरिता नेमले. निकाराग्वात कॅनॉल झाल्यास झेलायाने सर्व पैसे जनतेकरिता खर्च केला असता आणि तिथले अमेरिकन उद्योग धंदे अडचणीत आले असते. अमेरिकेने एका फ्रेंच कंपनीला निकाराग्वाचे कॉन्ट्रॅक्ट 14 कोटी डॉलरला एका फ्रेंच कंपनीला दिले. परंतु दुर्दैवाने ती कपंनी बंद पडली. पनामा वाल्यानी परत जोर धरला . नेमलेल्या वकिलाने बरासा प्रचार करून पहिला. लाच देऊन पहिली त्यावेळेस एक विचित्र घटना घडली. अत्ताच्यासारखीच पूर्वीच्याकाळीसुद्धा पोस्टाची तिकिटं मोठ्या देशातून छापून घेत असत. आज सुद्धा नेपाळ, भूतान , श्रीलंका इतर देशांची तिकिटं भारत छापतो. तस निकाराग्वा ची तिकिटे अमेरिकेत छापली जात होती. त्यातील एका तिकिटावर कॅनॉल दाखवला होता आणि त्याच्या तेथील मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक दाखवला होता. खरे तर कॅनॉल अस्तित्वातच नव्हता. कॅनॉल ज्वालामुखीपासून 150 किलोमीटरतरी दूर होता. तो ज्वालामुखी 100 वर्षाहून जास्त निद्रिस्त होता. दुर्दैवाने 1902 मध्ये कॅरेबियन बेटावरचे बहुसंख्य ज्वालामुखीचे उद्रेक झाले. त्या वकिलाने हा प्रसंग साधला. त्याने एक पत्र तयार केले ज्यात लिहले होते , कॅनॉल परत तेथेच बांधल्यास अपरिमित हानी होऊ शकते. ते पोस्ट तिकीट त्याने त्या पत्रकावर लावले होते. वर्तमानपत्रातही ज्वालामुखीचा उद्रेक असे बरेच लिहले गेले. अमेरिकन प्रेसिडेंट रुझवेल्ट याने शेवटी पनामा कॅनॉलला मान्यता दिली. झेलाया ने असंख्य प्रयत्न करूनही अमेरिका ठाम राहिली. अर्थातच निकाराग्वा अमेरिकेतील सॉफ्ट कॉर्नर संपुष्टात आला. त्यानंतर झेलायाने पश्र्चिम ते पूर्व किनारा अशी सरळ रेषेत अतिजलद लोह मार्गाची योजना केली. या प्रकल्पात त्या देशाची बरीच भरभराट झाली असती. त्याच्या खर्चाकरिता झेलायाने युरोपिअन बँकांकडून कर्ज मागितले. अर्थातच अमेरिकेला ते सहन झाले नाही कारण ही रेल्वे झाली आणि ती सुद्धा युरोपियन पैशाने तर अमेरिकेचा तिथला प्रभाव संपून कदाचित युरोपिअन प्रभाव वाढला असता.
त्यानंतर अमेरिकन राज्यकर्त्यांनी आणि पनामातील हस्तकांनी विविध बातम्या पसरवायला सुरवात केली. हा लोहमार्ग म्हणजे कॅनॉलचा प्रतिस्पर्धी असून त्यामुळे कॅनॉलचे महत्व कमी होईल आणि शत्रूंचा प्रभाव त्या लोहमार्गावर असेल. त्यानंतर CIA च्या हस्तकांनी आपला एक हस्तक बंडखोर म्हणून निकराग्वा मध्ये उत्पन्न केला. त्याला भरपूर अर्थसहाय्य आणि शस्त्रसहाय केलं. स्थानिक अमेरिकन लोकांनी आणि उद्योगांनी त्याला जास्त पाठबळ दिले. पण या बंडाचा बिमोड करण्यात झेलायाचे सैन्य यशस्वी ठरले. ते पाहताच अमेरिकन युद्धनौका लोकांच्या रक्षणाकरिता निकाराग्वामध्ये घुसल्या. झेलायाने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो अज्ञातवासात निघून गेला. शेवटी झेलाया 1919 साली अमेरिकेत नियॉर्क मध्ये मरण पावला. अमेरिकन उद्योगपतींनी आणि सैन्यांनी देश अक्षरशः ओरबाडून काढला. स्थानिक जनतेवर असंख्य अत्याचार झाले. एकेकाळी सदन असलेला हा देश आज निर्धन बनला आहे.
पनामा जमीन मालकांनी त्यांच्या एजेंटला कामाकरिता 1905 च्या आसपास 80 लाख डॉलर्स किंवा आजच्या तुलनेत 32 कोटी डॉलर्स दिले. यावरून त्याकाळातील भ्रष्टाचार लक्षात यावा.
पनामा कालव्यात कोलंबिया बरोबरही अमेरिकेने गोंधळ घातला ते नंतर केव्हातरी ....
आज सुद्धा युक्रेनचा आणि अमेरिकेचा तसा कुठलाही संबंध नाही आणि इतिहास पहिला तर काही वर्षांपूर्वी हा सर्व भाग रशियनच होता. अमेरिका अर्थातच सैन्य पाठवू शकणार नाही. पण रशियावर बंदी आणू शकते. ती न पाळल्यास राष्ट्रांवर दादागिरी करू शकते. आता विसाव्या शतका इतकी राष्ट्रे दुर्बल राहिलेली नाहीत. भारत सारखा देशही आज अमेरिकेवर अवलंबून नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यानंतर जपानवर दोन अणुबॉम्ब टाकण्यात आले. >>
थोडी पार्श्वभूमी बघायला हवी. मुळात अमेरिकेने युद्ध जाहीर करण्याअगोदर, सर्वप्रथम जपानने ७ डिसेंबर १९४१ रोजी पर्ल हार्बरवर आणि इतरत्र हल्ले केले ज्यात अमेरिकेचे खूप नुकसान झाले. म्हणजे मुळात खाजवून खरूज काढण्याचे काम जपानने केले , ज्यामुळे अमेरिका युद्धात उतरली. नंतर जपानचा पराभव निश्चित होता असे मानले तरी ते हार पत्करण्यास तयार न्हवते, हा ऍटम बाँब टाकण्यामागे मूळ मुद्दा आहे.

२६ जुलै १९४५ ला जपानला सांगण्यात आले की तुम्ही बिनशर्त शरणागती पत्करा, पण त्यांनी दाद दिली नाही. (Potsdam Declaration, defining "Unconditional Surrender")
त्यानंतर पहिला अणुबाँब ६ ऑगस्टला टाकूनही जपानने शरणागती पत्करली नाही.

दुहेरी अणुबॉम्ब हल्ला आणि रश्याचा हल्ला यानंतरही शरणागती पत्करण्यास १५ ऑगस्टच्या दुपारची वाट बघावी लागली. तिसर्‍या अणुबाँबची तयारी सुरू झाली होती आणि १९ ते २१ ऑगस्टच्या दरम्यान तो तयार होणार होता. जपानने शरणागती पत्करली नसती तर तिसरा अणुबाँबपण वापरला गेला असता, पण तो टाळला गेला. २६ जुलैपासून ते ६ ऑगस्टच्या हल्ल्यानंतर जर जपानने लगेच शरणागती पत्करली असती तर दुसरा अणुबाँबपण (कदाचित पहिलापण) वापरावा लागला नसता. पण जपानमध्ये लढायची खुमखुमी शिल्लक होती, ज्यामुळे प्रथम ६ ऑगस्टला आणि नंतर ९ ऑगस्टला अणुबाँब हल्ला झाला. थोडक्यात सांगायचे तर जपानची कीव करायची काहीही गरज नाही.

हिटलरला जगात शांतता प्रस्थापित करायची होती म्हणून त्याने शांततेचे प्रयत्न सुरू केले. या कामात जपानने त्यांना मदत केली. अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या या शांतीप्रयत्नांमुळे नोबेल पुरस्कारासाठी त्याचे नाव सुचवले गेले होते.

अविनाश जोशी, तुमची लेखातली माहीती बरीचशी “अर्धसत्य” म्हणता येइल.

निकाराग्वा व पनामा कॅनालचा इतिहास खचितच रंजक आहे . पण तो तुम्ही वर सांगीतला इतका सोप्पा व सरळ आहे असा वाचकांचा गैरसमज होउ शकतो.

तो इतिहास व त्यात अमेरिका का व कशी पडली त्यासाठी १९ व्या शतकातला ( १८००-१९००) त्यावेळच्या फ्रेंच- ब्रिटीश-जर्मन या युरोप मधल्या महासत्तांमधला सर्व जगभर कॉलनायझेशन करण्या साठी
चाललेला संघर्ष समजुन घेतला पाहीजे.

तो ईतिहास इथे थोडक्यात मांडणे कठिण आहे. मी प्रयत्न करीन. पण तुर्तास इच्छुकांनी आंतरजालावर अमेरिकेने त्यावेळेला ( १८५० च्या सुमारास) जे “ मन्रो डॉक्ट्राइन” व त्याच मन्रो डॉक्ट्राइन चा पुढचा भाग म्हणजे “ रुझव्हेल्ट कॉरोलरी“ (१९०० च्या सुमाराला ) या धोरणांचे अवलंबन केले त्याबद्द्ल जरुर वाचावे. ते वाचल्यावर त्यावेळचे अमेरिकेचे सेंट्रल अमेरिका व साउथ अमेरिकेतल्या देशांबाबतचे धोरण समजण्यास मदत होइल.

ते जर लक्षात घेतले नाही व नुसते “ झेलायाच्या“ नॅरो द्रुष्टीकोनातुन तो निकाराग्वाचा इतिहास बघीतला तर तो सारासार इतिहास म्हणता येणार नाही.

तिच बाब जपानवर अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्ब्स बाबतही लागु पडते. संपुर्ण पार्श्वभुमी सांगीतल्या शिवाय ईतिहासाचा दाखला दिला तर डिस्टॉर्टेड द्र्ष्य सहज सादर करता येते.

दुसरे महायुद्ध १ सप्टेम्बर १९३९ ला सुरु झाले. अमेरिका त्या युद्धात ७ डिसेम्बर १९४१ ला पडली. मधली सव्वा दोन वर्षे अमेरिका युद्धात का पडली नाही?( ती सव्वा दोन वर्षे चर्चिल फ्रॅन्कलिन रुझव्हेल्टची युद्धात पडण्यासाठी सारखी दाढी खाजवत असतानाही!)

त्याचे कारण अमेरिकेची जनता त्या वेळेला या विचारांची होती की ते युद्ध युरोप मधल्या देशांचा प्रॉब्लेम आहे. त्यात आपल्याला पडायची जरुर नाही. पण ७ डिसेम्बर १९४१ ला जपानने पर्ल हार्बर या हवाइतल्या अमेरिकन नाविक दलावर वॉर्नीन्ग न देता हल्ला केला. त्यात ३००० अमेरिकन सैनिक मारले गेलेव अनेक युद्धनौका उध्वस्त केल्या गेल्या. म्हणुन मग अमेरिकेला युद्धात भाग घ्यायलाच लागला. पुढे जुन १९४५पर्यत अमेरिकेच्या बळावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीला शरणागती पत्करायला ला॑वली. पण तिकडे पॅसिफिक फ्रंटला जपान काही शरणागती पत्करायला तयार नव्हते. युरोपमधले युद्ध जरी संपले होते तरी पॅसिफिक युद्धात फिलिपिन्सच्या कॉरीगॉडर आयलंड इथे व ओकिना॑वा व इवोजिमा आयलंड॑ वर जपानी व अमेरिकन सैन्यात तुंबळ व हातघाइची युद्धे चालुच होती. त्यात असंख्य अमेरिकन सैनिक मारले जात होते. १७ जुलै १९४५ मधे अमेरिकन प्रेसिडेंट हॅरी ट्रुमनला जेव्हा सांगीतले गेले की आता अणुबाँब तयार आहे तेव्हा अमेरिकेने लिफलेट्स टाकुन जपानला त्या महाभयंकर अस्त्राची वॉर्निन्ग दिली होती की शरण या. पण जपानने ती वॉर्निन्ग दुर्लक्षित केली व पुढे मग अमेरिकेने वापरलेल्या त्या अण्वस्त्रांचा भिषण संहार सर्व जगाने पाहीला.

तसेच तुम्ही वर जे अमेरिका व व्हिएतनाम/ कोरिया युद्धाचा उल्लेख केला आहे तोही संपुर्ण पार्श्वभुमी न देता केला आहे. त्यासाठी दुसरे महायुद्ध संपल्यावर अमेरिकेची भांडवलशाही व रशिया/ चायनाचा साम्य॑वाद यांच्यात जो संघर्ष कोल्ड वॉरच्या रुपाने सुरु झाला त्याबाबत अधिक माहीती समजावुन घेतली पाहीजे. तसच प्रेसिडेंट आयसेनहॉवर यांनी जी “ डॉमीनो इफेक्ट” ची भिती १९५२ ते १९६० दरम्यान व्यक्त केली होती ती अमेरिकेची भिती त्यासाठी नीट समजवुन घेतली पाहीजे.

क्रंमंशः

थोडक्यात १९ ऑक्टोबर १९५० ला चायनाचे लाल सैन्य जेव्हा कोरियन पेनिन्सुला मधे घुसले तेव्हा अमेरिकेची भिती ही होती की कोरियातच ही कम्युनिस्ट घुसखोरी थांबवली नाही तर रशिया व चायना त्यांचा साम्यवाद हळु हळु संपुर्ण इंडोचायना मधे म्हणजे आधी कोरिया मग व्हिएतनाम- लाओस- कंबोडिया-थायलंड-बर्मा- इंडोनेशिया अश्या एक एक देशात पसरत जाइल व ते सर्व देश रशिया- चायनाच्या अधिपत्याखाली जातील. तेवढेच नाही तर जपान-ऑस्ट्रेलिया व न्युझिलंडही त्याच्या पाठोपाठ कम्युनिस्ट होतील अशी भिती अमेरिकेला वाटत होती. हीच ती आयझेनहॉवरची “डॉमीनो” थिअरी!म्हणुन अमेरिका कोरियन युद्धात पडली व ३८थ पॅरेलल वर तडजोड होउन उत्तर व दक्षिण कोरिया असे दोन देश तयार झाले( उत्तरेत कम्युनिस्ट तर दक्षिणेत लोकशाही)

त्याच सुमारास १००वर्षापेक्षा जास्त वास्तव्या नंतर १९५४ मधे व्हिएतनाम मधे Dien Bien Phu इथे हो ची मिन्ह ने फ्रेन्च सैन्याचा निर्णायक धुव्वा उडवला व फ्रेन्चांनी व्हिएतनाम मधुन पळ काढला.

तेव्हा अमेरिकेला वाटले की त्यांनी जर व्हिएतनामधे फ्रेंच पळुन गेल्यावर हस्तक्षेप केला नाही तर कोरियात चायनाला थोपवण्याचा काहीच उपयोग होणार नाही! म्हणुन व्हिएतनाम रामायण ! तिथे हो ची मिन्हच्या गनीमी काव्याने अमेरिकेला २० वर्ष तिथे युद्ध करुनही पळ काढावा लागला. त्या युद्धा ला खुद्द अमेरिकन जनतेचाच विरोध होता! असो.

अजुनही खुप डिटेल इतिहासात जाता येइल. पुढे कधीतरी.

जॉली एल एल बी २ या चित्रपटात कोर्ट रूम मध्ये अक्षय कुमारच्या तोंडी एक वाक्य आहे. - "बाय गॉड बडे इत्तेफाक है आप की स्टोरी मे"......तसंच निरागस निष्पाप अमेरिकेबाबत मला कधी मधी वाटत, की योगायोगच इत्तेफाकच असे होतात की त्यांना जागतिक शांतीच्या पवित्र आणि उदात्त कार्याचा घेतला वसा चालवण्यासाठी नेहमी जगात कुठल्या ना कुठल्या राष्ट्रात ढवळाढवळ /हस्तक्षेप करावा लागतो.... बिच्चारे Sad

मुसोलिनी, हिटलर, स्टालिन जगज्जेते झाले असते तर शांतीचा ठेका त्यांच्याकडे आला असता. जो जेता असतो तो इतिहास लिहीतो.
दोस्त राष्ट्रे आणि अमेरिकेने शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे युद्ध केलं त्यामुळे शांती प्रस्थापित करण्याचं काम त्यांच्याकडे आलं. जर जपान जिंकला असता तर जपानने शांती प्रस्थापित केली असती.
रस्त्यात जेव्हां भांडणे होतात तेव्हां अंगापिंडाने मजबूत असलेला किंवा ज्याच्याकडे प्राणघातक हत्यार आहे तोच शांतता प्रस्थापित करतो.

सम्राट अशोकाने पन कलिंग युद्धात शांतता प्रस्थापित केली होती. पण त्या वेळी नोबेल नव्हतं. त्या वेळचे लोक हुषार नव्हते. त्यांना पश्चात्ताप व्हायचा शांतता प्रस्थापित करून.
आत्ताचे लोक हुषार आहेत.

इथन हंट शी सहमत. लेखात खूप त्रुटी आहेत. एकतर जर्मनीने शरणागती पत्करली त्याच्या बर्‍याच आधीपासून त्यांची पीछेहाट सुरू होती. ते हरणार हे उघड झाले होते. जपान शेवटपर्यंत हटायला तयार नव्हते.

मुख्य म्हणजे अमेरिका जे करते ते प्रत्येक महासत्ता करते. फक्त अमेरिकेच्या गोष्टी सहज जगजाहीर होतात. रशिया, चीन काय करतात त्यातल्या बहुतांश गोष्टींचा पत्ताही लागत नाही.

अमेरिका दुर्बल झाली आहे किंवा इतर देश आता ऐकणार नाहीत असे चित्र दर ८-१० वर्षांनी निर्माण होत असते. अगदी व्हिएटनाम युद्ध, अफगाणिस्तान, इराक, युक्रेन, जॉर्जिया (देश) - बरीच उदाहरणे आहेत. जोपर्यंत अमेरिकेचे मार्केट लोकांना खुणावत आहे, एक प्रगत लोकशाही व त्यातून मिळणारे फायदे असलेला देश (सध्याचे सरकार व त्यांच्या कारवाया धरूनही) म्हणून त्याचे आकर्षण आहे व जोपर्यंत अमेरिकन ब्रॅण्ड्सची सॉफ्ट पॉवर आहे तोपर्यंत या गोष्टींनी काही फरक पडणार नाही. जोपर्यंत अमेरिकेऐवजी रशिया किंवा चीनला जाण्याची स्वप्ने लोक पाहात नाहीत, जोपर्यंत आपली गुंतवणूक अमेरिकेपेक्षा तेथे जास्त सेफ आहे असे लोकांना वाटत नाही तोपर्यंत अमेरिकेला पर्याय नाही. इतरांचे सोडा, चीनमधलेच श्रीमंत लोक आणि रशियन ऑलिगार्क्स अमेरिकेपेक्षा त्यांच्याच देशात पैसा सेफ आहे असे समजतील असे होउ द्या आधी. मग बोलू. हे कधीच होणार नाही असे नाही, पण एक दोन ठिकाणची पीछेहाट व एखाद्या देशाने उद्दामपणा दाखवणे यातून ते होणार नाही हे नक्की. ते अमेरिकेला नवीन नाही.

इतके दिवस ट्रम्पची वारेमाप तारीफ करणारे व आता मोदींच्या रशिया व चीन भेटींनी हुरळून जाणारे पब्लिक पाहिले की हसावे की कीव करावी कळत नाही. याही महासत्ताच आहेत, त्या ही तशाच वागणार आहेत. सध्या भारत त्यांच्या उपयोगाचा आहे म्हणून ठीक आहे. उद्या इंटरेस्ट्स एकमेकांविरोधात गेले तर अमेरिका परवडली असे हे लोक वागतील.

अमेरिका-ब्रिटन-भारत यांच्यात एक नैसर्गिक अ‍ॅफिनिटी आहे. रशिया व चीन त्याच्याशी सुसंगत नाही. आता अमेरिका व भारतात लोकशाही किती मजबूत आहे वगैरे वाद होतील - ते खरेही असेल. पण मूळ सिस्टीम एकसारखी आहे.

"लेखातली माहीती बरीचशी “अर्धसत्य” म्हणता येइल" आणि "अमेरिका जे करते ते प्रत्येक महासत्ता करते. फक्त अमेरिकेच्या गोष्टी सहज जगजाहीर होतात. रशिया, चीन काय करतात त्यातल्या बहुतांश गोष्टींचा पत्ताही लागत नाही." - दोन्हीशी सहमत!!

अ‍ॅटम बॉम्बमूळे बळी पडलेल्यांबद्दल सहानुभूती वाटली तरी जपानबद्दल कीव वाटणार्‍यांनी एकदा खरच इंपिरीयल जपानचा इतिहास चाळावा. जिथे गेले तिथे स्थानिकांवर केलेले नृशंस अत्याचार ही कॉमन थीम आहे. इथेही जेते होते म्हणून दडपशाही असा प्रकार नसून कीडामुंग्यांसारखी माणसे मारली आहेत. आझाद हिंद सेनेला पाठींबा देताना त्याच वेळी ब्रिटीश सैन्यातून पकडल्या गेलेल्या भारतीय युद्धकैद्यांना जी वागणूक दिली गेली आहे त्याबद्दल वाचून बघा.
https://www.rediff.com/news/column/when-indian-soldiers-went-through-hel...

अजून थोडे. अमेरिका म्हणजे कोणी संतमहात्मे नव्हेत. दुसर्‍या महायुद्धाआधी अमेरिका "आयसोलेशनिस्ट" होती कारण त्यांना एकतर ते त्यांचे युद्ध वाटत नव्हते आणि कदाचित युद्धावर प्रभाव पाडल्यामुळे मिळू शकणार्‍या फायद्यांची तोपर्यंत त्यांना माहिती नव्हती. २० व्या शतकाच्या सुरूवातीला अमेरिका ही जगातील सर्वात मोठी शक्ती नव्हती. ब्रिटन होते. पहिल्या महायुद्धानंतर त्यांची पॉवर कमी होत गेली व अमेरिकेची वाढत गेली. तरी गेली अनेक दशके अमेरिकेचे जे स्थान आहे ते दुसर्‍या महायुद्धानंतर निर्माण झाले.

त्यामुळे दुसर्‍या महायुद्धात स्वतःहून पडण्यात त्यांना काही इंटरेस्ट नव्हता. मात्र १९४५ नंतर जेथे जेथे अमेरिका घुसली ते बहुतांश कम्युनिजमच्या वाढीच्या भीतीने. पण हिटलरला तेव्हाच्या युरोपने शक्तिशाली होऊ देणे व तोपर्यंत काही न करणे - यातून पोळलेला युरोप - त्यातही ब्रिटन- त्यापुढे ताकही फुंकून पिऊ लागले व अमेरिकेचेही तेच झाले.

चर्चिलने महायुद्ध संपल्यानंतर केलेल्या भाषणात याचे मूळ असेल. बहुधा तेच "आयर्न कर्टन" वाले भाषण. अमेरिकेचा मतप्रवाह आपल्या बाजूने वळवण्यात चर्चिल कमालीचा यशस्वी होता. १९३९ च्या आधीपासून आपण एकट्यानेच हिटलरचा धोका ओळखला होता. तेव्हा ब्रिटनने व जगाने आपले ऐकले नाही. तेव्हा ऐकले असते तर इतकी हानी न होताच हिटलरला रोखता आले असते ई त्याने तेव्हा सांगितले आहे. नंतर रशिया व कम्युनिजम वाढीस लागतोय अशी शंका आल्यावर पुन्हा तेच होणार की काय अशी शंका ब्रिटन व अमेरिका दोघांना भेडसावू लागली. कोणत्याही देशात कम्युनिजम वाढू द्यायचा नाही या धोरणातून मग कोरिया, व्हिएटनाम, क्युबा वगैरे अमेरिका पडली (क्युबा मधे सैन्य गेले नाही माहीत आहे).

तेव्हा इतर देशांत आपल्या इंटरेस्ट्सकरता काड्या करणे हे महासत्तांचे "पॅकेज डील" आहे. रशिया व चीनही तेच करतात. भारत अजून तेवढी मोठी महासत्ता नसला तरी आपल्या आजूबाजूला असले काही करत असेल तर आश्चर्य वाटणार नाही.

चीन आणि रशियाने मानवतेचा आणि लोकशाहीचा झेंडा घेतलेला नाही. अमेरिकेने घेतला आहे. त्यावरून अमेरिका जगाला धडे देते आणि हे उद्योग करते. आताच शांततेचं नोबेल जाहीर झालेल्या बाईही अमेरिकेच्या हस्तक आहेत , इस्रायलधार्जिण्या आहेत, अशीही बोलवा आहे. आताच वाचलं की त्यांनी आपलं नोबेल ट्रंपना समर्पित केलं.

फेअर पॉइण्ट. माझा रोख अमेरिका हे सगळे चांगल्या हेतूने करते असा नसून एक महासत्ता जशी वागेल तशीच अमेरिका वागते. रशिया व चीनही हेच करतात. पण अमेरिकेबद्दलची माहिती जितक्या सहज मिळते तितकी त्यांची मिळत नाही - वगैरे होता.

असे म्हंटले जाते कि पर्ल हार्बर च्या जपानीज हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले. हे म्हणणे तितकेसे खरे नाही. मूलतः पर्ल हार्बर हा हवाई बेटांचा एक भाग आहे. हवाई बेटांकडून तो बळजबरीने घेण्यात आला आहे. >>> यात "तितकेसे" काय खरे नाही? १९४१ त्या पन्नास वर्षे आधीपासून पर्ल हार्बर हा अमेरिकेचा भाग झाला होता (तो बळजबरीने घेतला असेल. मग जपान आशियात काय वेगळे करत होते). जपाननेही हल्ला करताना आपण एका रॅण्डम हवाई बेटावर हल्ला करतोय असे समजून केलेला नव्हता - तो अमेरिकेच्या सैनिकी तळावर करायचा अशाच हेतूने केलेला होता. त्यानंतरही लगेच जाउन अणुबाँब टाकला नव्हता. पुढे ४ वर्षे युद्ध चालले. मग इटली व जर्मनी शरण आले. युरोपमधले युद्ध संपले. तरीही जपान ऐकेना. तेव्हा तो निर्णय घेण्यात आला.

अमेरिकेने जपानवर अणुबाँब टाकला त्याची एक थिअरी (ट्रुमनच्या बाजूने) इथे आहे. ट्रुमनला याची कल्पना होती कि सोविएत युनियनने (जर्मनीच्या पाडावानंतर) जपानला शरण येण्याची तारीख १५ ऑगस्ट ही ठरवली होती. दोस्त राष्ट्रांची सहमती यावर होणार होती. त्या आधीच अमेरिकेने अणुबाँब टाकण्याची घाई केली.

याची कारणे टीकाकार देतात कि जर जर्मनीच्या पाडावानंतर जपान सुद्धा सोविएतच्या वेळापत्रकानुसार शरण आला असता तर या युद्धानंतर जगभरात सोविएतचा दबदबा वाढला असता. अमेरिकन जनतेच्या मनात पर्ल हार्बरचा राग होताच. पण अमेरिकेला अणुबाँब अन्य राष्ट्रे विकसित करत आहेत अशी कुणकुणही होती. त्यामुळे पहिल्यांदा पाऊल उचलल्यास दुसरे महायुद्ध अमेरिकेने संपवले हे श्रेयही मिळाले असते आणि अणुबाँबच्या वापराने अमेरिका महासत्ता म्हणून उदयाला येईल हा कयास होता ( जे प्रत्यक्षात घडले).

he United States did not wait for the Soviet Union's decision to enter the war against Japan before dropping the atomic bombs, primarily due to strategic concerns about post-war influence and the desire to end the conflict swiftly. While the Soviet Union was expected to declare war on Japan around August 15, 1945, American leaders, including President Harry Truman, were aware of this timeline and still chose to use the atomic bomb as early as August 6 and 9, 1945.
Critics argue that waiting for Soviet intervention would have been a viable alternative, as military analysts believed a Soviet declaration of war would have satisfied the Japanese leadership’s need to accept the inevitability of defeat.
However, some historians suggest that the U.S. decision was influenced by a desire to limit Soviet gains in post-war Asia and to assert American power in the emerging global order.
This view is supported by the fact that U.S. officials, particularly James Byrnes, opposed early negotiations that might have included preserving the Japanese emperor, fearing it would weaken the U.S. position.
The decision to use the bomb was also driven by the belief that a direct military demonstration was necessary to force surrender, as scientists on the Interim Committee concluded that a demonstration alone would not convince Japan to surrender.
Thus, the U.S. acted before the Soviet entry into the war to secure a decisive victory and shape the post-war world order.

या दाव्याच्या पुष्ट्यर्थ काही थिअरीज.
१. https://www.npr.org/2023/08/11/1193189051/looking-back-at-the-decision-t...

२. Was the atomic bombing of Hiroshima and Nagasaki by the US in WW2 justified?
https://www.historyextra.com/period/second-world-war/atomic-bomb-hiroshi...

अन्य अनेक सोर्सेस वर असा मतप्रवाह आहे कि अमेरिकेने प्रेस रिलीज मधे जो दावा केला कि हिरोशिमाच्या मिलिट्री बेस वर आम्ही हल्ला केला तो अर्धसत्य होता. अमेरिकेला त्या वेळी तिथे तीन लाख लोकवस्तीचं शहर आहे याची संपूर्ण कल्पना होती. बाँब शहराच्या मध्यवस्तीत ड्रॉप केला होता. हिरोशिमा मधे चूक झाली असं समजलं तरीही नागासाकी मधे पुन्हा तीच चूक कशी होईल ? जपानने पर्ल हार्बर वर केलेला हल्ला हा मिलिटरी बेसवर केला होता.

जपानची कोंडी झालेली होती. त्यामुळे १५ ऑगस्टला तह होण्याची शक्यता होती. जपानने त्यांच्या सम्राटाची राजवट उलथून न टाकण्याची विनंती केली होती.

अन्य काही दावे.
३. https://www.historyonthenet.com/reasons-against-dropping-the-atomic-bomb
४. https://www.britannica.com/topic/Trumans-decision-to-use-the-bomb-712569
५. https://www.iwm.org.uk/history/the-atomic-bombs-that-ended-the-second-wo...

Admiral William Halsey spoke for many Americans when he urged them to “Kill Japs! Kill Japs! Kill more Japs!”
https://pressbooks-dev.oer.hawaii.edu/ushistory/chapter/the-pacific-thea...

>>सर्व दृष्टीने निकाराग्वा कालवा हा पनामा कॅनॉल पेक्षा सोपा आणि कमी खर्चाचा होता.<<
हे मिसलिडिंग आहे. पॅनमा कनॅल साधारण ५० मैलांचा आहे. निकराग्वा कनॅल बांधण्याकरता साधारण १७० मैलांचं खोद/बांधकाम करावं लागलं असतं, शिवाय मधे एक तलाव असल्याने एन्वॉर्मेंटल इशुज होते. त्याचबरोबर पॅनमा कनॅल करता केलेले टर्म्स अँड कंडिशन्स निकराग्वाच्या गळी उतरवता आले असते का, हा कळीचा मुद्दा आहे...

पण अमेरिकेबद्दलची माहिती जितक्या सहज मिळते तितकी त्यांची मिळत नाही - वगैरे होता.>>> प्रत्येक मिळणारी माहिती त्यांना हवी तितकीच आणि त्यांना हवी तेव्हाच मिळत असावी अशी ही एक शक्यता यात असू शकत नाही का?....माझ्यामते अगदीच माहिती मिळत नाही आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे यापेक्षा आपल्याला सहजी माहिती मिळते आहे म्हणजे सर्व काही आलबेल आहे हा ठोकताळा फार धोकादायक नि बेसावध स्थितीत अनपेक्षितपणे घात करण्याची / दगा देण्याची क्षमता ठेवणारा आहे. ( हे वैयक्तिक नातेसंबंधातून संपर्कात येणाऱ्या अनेक व्यक्तींच्या बाबतीतही तितकेच लागू पडते.... मग लोकं वॉट्सॲपवर स्टेटस ठेवतात Wink )

#TustButVerify

https://youtu.be/fcLaKGNDtzo?si=-bFvbc6kPMtYWHiA&t=190

हा लेख पहिला भाग आहे, असं म्हटलंय. इराक दुसर्‍या भागात असू शकेल. पण वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनच्या बागलबुव्याच्या निमित्ताने हे इथे ठेवतो.
https://youtu.be/fcLaKGNDtzo?si=-bFvbc6kPMtYWHiA&t=190

अमेरिकेत अधिकारप दावरच्या लोकांना अजूनतरी असे उघडपणे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे आवडतं.

काही जणांनी वर दिलेल्या तपशीलवार माहिती बद्दल धन्यवाद
माझ्या लेखाला भाग एक असे नाव आहे याचा अर्थ अजून बरेच अपेक्षीत आहे आणि त्यावर वाद -विवाद होतीलच. एकाच गोष्टीबद्दलचे सत्य वेगवेगळी असू शकतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू वेगवेगळेजण पाहत असेल तर प्रत्येकाचे नाण्यावरच्या तपशिलाचे वेगेळे मत असू शकते. एक अतिशय चांगला पॅराडॉक्स म्हणजे पेला आणि पाणी. आशावादी म्हणतो पेला अर्धा भरलेला आहे, निराशावादी म्हणतो पेला अर्धा रिकामा आहे, इंजिनियर म्हणतो सेफ्टी फॅक्टर 100% आहे , व्यवस्थापन म्हणते 50% वेस्टेज आहे इत्यादी ....
यातील प्रत्येक स्टेटमेंट खरे आहे . इंटरनेटच्या मायाजाल मधून बरीच माहिती मिळू शकते ती देण्याचा माझा उद्देश नाही. मी सहसा माहिती नसलेली गोष्टी देण्याचा प्रयत्न इथे करतो. दुसरा असाच टिळकांना गीतेत कर्म योग दिसला तर ज्ञानेश्वरांना ज्ञान योग दिसला (गंमत म्हणजे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव भावार्थदीपिका असे आहे ) गीता श्रीकृष्णाची आहे असे सर्वजण म्हणतात पण एकाने मला वेगळाच दृष्टीकोन सांगितला . तो म्हणाला , श्रीकृष्ण हा महाभारतातले एक पात्र आहे. महाभारत तर महर्षी व्यासांनी लिहले आहे.
अमेरिकेने पर्ल हार्बरच्या 3000 लोकांच्या बदल्यात जपानचे कित्येक लाख नागरिक मारले एवढेच नव्हे तर कित्येक पिढ्या बरबाद केल्या. याच अमेरिकेने ओसामाबिन लादेनने चपराक दिल्यानंतर अमेरिकेने त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या किंवा इतर मुस्लिम दहशतवाद्यांवर काय कारवाई केली ? अजूनही ओसामा जिवंत असल्याचे उल्लेख येतात.
आपण आपल्या विविध प्रकारच्या दादागिरी विषयी गप्पा मारू. वाद - विवाद करू .

१९ व्या शतकात आणि २० व्या शतका च्या पूर्वार्धात जगभरात ब्रिटनने जितक्या देशात काड्या आणि उचापती केल्या तितकेच उद्योग /उचापती अमेरिकेने २० व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २१ व्या शतकात केल्या आहेत.

एक खंड असा नसेल जेथे या दोन्ही देशांनी उचापत्या केल्या नाहीत.

त्यांना स्पर्धा म्हणून अगोदर जर्मनी जपान किंवा प्रत्युत्तर म्हणून सोव्हिएत युनियन आणि आता चीन त्याच तर्हेच्या उचापती करत आहेत.

फरक एवढाच आहे कि या देशात समृद्धी ( जी ब्रिटनने इतर देशातून वाटमारी करून आणली आणि अमेरिकेने इतर देशांतून साधनसामग्री पळवून स्वदेशात निर्माण केली) आणि व्यक्तिस्वातंत्र्य जितके आहे तितके दुसऱ्या देशात नाही

यामुळे गरीब देशातून या देशांत समृद्धीच्या आशेने असंख्य लोक स्थलांतरित झाले तसे कम्युनिस्ट देशात कोणीही जाऊ इच्छित नाही.

बाकी अमेरिकेची तळी उचलण्यासारखे उद्दात्त वगैरे काही दिसत नाही.

कारण लोकशाहीच्या संरक्षणासाठी त्यांनी इतक्या देशात लोकशाहीने निवडून आणलेली सरकारे उलथली आहेत कि आपणच लोकशाहीचे आधार म्हणून कोणत्या तोंडाने ते मिरवतात हे आश्चर्यच आहे.

बाकी त्यांचे ब्रीदवाक्य democracy for (all american) यात कंसातले शब्द हे अध्याहृत आहेत.

किंवा new world order हे new world (made to) order असं आहे.

>>आपण आपल्या विविध प्रकारच्या दादागिरी विषयी गप्पा मारू. वाद - विवाद करू .<<
इतरांना जी दादागिरी वाटते ती अमेरिकेच्या लाँगटर्म स्ट्रॅटजीचा भाग आहे/असतो - अमेरिका फर्स्ट या दृष्टिकोमातुन. काहिंना आवडत नाहि, तर काहिंना झक मारुन ती पत्करावी लागते.

ह्ल्लीचंच उदाहरण घ्या. आज इजिप्तमधे झालेल्या पीस समीटची बीजं इस्रेलने कतरवर केलेल्या हल्ल्यात आहेत. ट्रंपच्या कूटनितीमुळे सगळे अरब या समीटला हजर आहेत. ट्रंपचा २० कलमी कार्यक्रम काहिंना अमान्य असुनहि हमासवर दबाव आणला गेला आणि (जिवंत) उरलेले ओलिस सोडायला भाग पाडलं. अरबांना हि दादागिरी वाटणं साहजिक आहे, बट बेगर्स कॅनॉट बी चुझर्स.. अशी सगळी गंमत आहे...

https://x.com/MintPressNews/status/1979281153245778148
US General Laura Richardson reveals the Empire’s true motives in Venezuela

In a recent address, the head of US Southern Command openly admitted what Washington usually hides behind the language of “democracy” and “human rights”:
the U.S. seeks to control Latin America’s vast natural wealth — including oil, lithium, gold, and rare earth minerals to fuel Western military & technological advancements.