Submitted by ऋतुराज. on 5 October, 2025 - 23:59
नमस्कार मायबोलीकर,
दसरा झाला आणि दिवाळी आता अवघ्या पंधरा दिवसांवर आली आहे. बाजारात दिवाळी अंक यायला सुरुवात झाली आहे.
तर हा धागा यंदाच्या दिवाळी अंकासाठी. कोणकोणते दिवाळी अंक घेतले? त्यात काय काय वाचले? यावर चर्चा करायला हा धागा वापरू.
इथल्या मायबोलीकरांचे लेख, कविता, कथा कोणत्या दिवाळी अंकात छापून आले असल्यास त्याची माहिती इथे नक्की देऊया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनुक्रम - अनुवाद आहेत.
अनुक्रम - अनुवाद आहेत. वाचायला हवे
रत्नाकर मतकरींची क्षमा मागून
रत्नाकर मतकरींची क्षमा मागून
"आडनावावर जाऊ नका, खोटे आडनावाचे समदे लोक काय खोटेच बोलतात काय? आणि खरे आडनाव लावणारे नेहमी खरे बोलतात काय? भोळे आडनावाचे सगळेजण थोडेच भोळे असतात? सगळे आंबेडकर बाबासाहेब नसतात..."
>> मृद्गंधा <<
>> मृद्गंधा <<
>> एकूण मी पहिल्यांदाच हे नाव ऐकले आणि वाचले>>
करुणापटो म्हणून एक सायन्स फिक्शन कादंबरी आहे त्यांची. भारीए.
पळशीकरांचा तो लेख फार कळकळीनं लिहिला गेला आहे. एरव्ही ते असं करत नाहीत. त्यांचं त्यांच्या क्षेत्रात मोठं काम आहे. अभ्यासू व्यक्तीवर असा हतबल सूर लावण्याची वेळ एखाद्या समाजात येत असेल, तर ते काय चांगलं लक्षण नाही.
बाकी, बागडांचं काय, मस्त आयआयटीतला जॉब हे. बरं असतं. परवडते शुद्ध कलेची चैन वगैरे.
मस्त चर्चा. फराळासारखी खमंग.
मस्त चर्चा.
फराळासारखी खमंग.
चिनूक्स, धन्यवाद.
मस्त माहिती/चर्चा! मुक्त
मस्त माहिती/चर्चा! मुक्त संवादच्या अंकाचा फॉर्मॅट मस्त आहे. झूम, पाने उलटण्याचा फील वगैरे आवडले. लेख थोडेफार चाळले. फोकसने वाचायचे लेख वाटतात.
क्रिककथाची अनुक्रमणिका कल्पक आहे. हंसमधली तरूणी सामन / साल्मन पकडत आहे का?
आत्तापर्यंत आलेली माहिती बरीचशी डावीकडे झुकलेल्या अंकांची आहे
हंस बद्दल माहीत नाही. पण कथा वगैरे असलेले, ज्वेलर्स, कपडे ई च्या ग्लॉसी जाहिरातींची पाने असलेले "टिपिकल" अंक इथे अजून फारसे आलेले दिसत नाहीत.
ग्लॉसी अंकांवर फोनेटिकली एससी
ग्लॉसी अंकांवर फोनेटिकली एससी एसटी आडनावांचे लेखक असतील तर अनुक्रम द्या. ते कसं कळतं ते इथले जाणकार सांगतील. आडनावे देण्याऐवजी डायरेक्ट जात लिहिलीत तर काम आणखी सोपं. मायबोलीवरही आडनावे/ जात लिहिणे खंपलसरी करता आलं तर अॅडमिनना सांगा. प्रोनाऊन पेक्षा जात लिहा म्हणावं.
>> ग्लॉसी अंकांवर फोनेटिकली
>> ग्लॉसी अंकांवर फोनेटिकली एससी एसटी आडनावांचे लेखक असतील तर अनुक्रम द्या <<
अंकाच्या नावात श्री असेल तरच द्या. कथाश्री, संविधानश्री उदाहरणार्थ.
बाकी अमितव, माझे प्रतिसाद तुला बरेच झोंबतात असे दिसते. त्याबद्दल तुझी क्षमा मागतो.
>> बाकी, बागडांचं काय, मस्त
>> बाकी, बागडांचं काय, मस्त आयआयटीतला जॉब हे. बरं असतं. परवडते शुद्ध कलेची चैन वगैरे. <<
श्याम मनोहर वाचणारे शुद्ध कलेची चैन करणारेच असतात. त्यामुळे शुद्ध कलेची चैन करणाऱ्या लोकांचा यूनिवर्सल सेट मानूनच मी आतली वर्तुळे काढत असतो संप्रति.
बाकी पळशीकरांचे देखील तेच आहे की. मस्त दाबून x वेतन आयोगांचे पगार. फक्त काय बदललं तर आता यांना भाव देणारे लोक झपाट्याने कमी होत आहेत. हीच खरी खंत असते. बाकी सरकारी समित्या, मुलाखती, आंतरराष्ट्रीय NGO इत्यांदींच्या भानगडी असतातच.
विरुद्ध पक्षाचे हाइपोथिसिस आपणच हिरारीने मांडायचे आणि त्याचे खंडन करत बसायचे याशिवाय या प्रोफेश्वरांनी काय XX केले आहे?
माझे प्रतिसाद तुला बरेच
माझे प्रतिसाद तुला बरेच झोंबतात असे दिसते. >> विसंगती चटकन दिसते. बाकी तुमच्याशी काही वैर नाही.
पण तुम्ही असेच लिहित रहा मला मजा ही येते वाचायला.
मृद्गंधा दिक्षित ची करुणापटो
मृद्गंधा दिक्षित ची करुणापटो ही साय फाय भविष्यातील डिस्टोपिया प्रकारातली बरी कादंबरी आहे. पाचपाटलांनीच ओळख करून दिली होती.
रॉय यांचा उच्चवर्णीयांनी लेख लिहिण्याबाबत आक्षेप दिसत नाहिये. त्यांचा मुद्दा आहे की ज्या तळागाळातील समाजाबद्दल कळवळीने लिहिले जाते, त्यांच्या बद्दल बोलत आहोत हा समाजवादी विचार मांडला जातो त्या समाजाकडून प्रत्यक्ष कधी ऐकणार?
जसे बंगालातले सगळे साम्यवादी नेते बसु, चॅटर्जी , मुखर्जी , चक्रवर्ती निपजले.
रॉय,
रॉय,
तुमचा मुद्दा आणि आक्षेप दोन्ही मान्य आहेत.
मुक्त संवादासाठी मी लिहितो, शिवाय त्यांना लेख मिळवून देण्यात मदतही करतो. तुम्ही म्हणता तसे प्रयत्न संपादक करतात, याची मी तुम्हाला ग्वाही देतो.
मात्र ते अनेकदा विविध कारणांमुळे शक्य झालं नाही, होत नाही.
माहेरसाठी मदत करायचो, तेव्हाही हे प्रयत्न करत असे. त्यावेळी एक गंमतशीर अनुभव असा की माहेर हे ब्राह्मणी मासिक आहे म्हणून आम्ही त्यात लिहिणार नाही, असंही काहींकडून अनेकदा ऐकलं. मी नेटाने दरवर्षी प्रयत्न करायचो. मग एकतर उडवाउडवीची उत्तरं मिळत किंवा वर सांगितलं ते कारण मिळे.
असो.
>> जसे बंगालातले सगळे
>> जसे बंगालातले सगळे साम्यवादी नेते बसु, चॅटर्जी , मुखर्जी , चक्रवर्ती निपजले. <<
हे तर साम्यवाद्यांच्या (समतावाद्यांच्या) स्क्रिप्ट प्रमाणेच आहे. आधी प्रबुद्ध समाजाने नेतृत्व हाती घ्यायचे. आणि मग नंतर नंगानाच करायचा.
श्रीधर तिळवे नाईक परवा म्हणाले होते ते १०० टक्के पटले :
" मार्क्सचे तत्त्वज्ञान हे प्रामुख्याने आर्थिक आहे आणि समाजवादाने जो काही उत्पात माजवला होता जगभर तो त्या तत्त्वज्ञानाचा चुकीचा राजकीय अर्थ काढून केलेला सत्ताधाऱ्यांनी नंगानाच " हा अतिशय शुद्ध फसवा प्रचार मार्क्सवाद्यांनी उठवला आहे. प्रत्यक्षात मार्क्सने राजकीयच प्रणाली व्यवस्थाच मांडलेली आहे. कुणी काहीही म्हणो. त्यामुळे समतावादी दांभिक लोकांपासून लांबच राहिले पाहिजे.
पण मला स्पेसिफिकली दिवाळी अंकांबद्दलच बोलायचे आहे.
उदा. भवताल.
हा म्हणजे पर्यावरणासाठी वाहून घेतलेला अंक आहे.
लोल.
म्हणजे या जगात आता सगळीकडे इंटरनेट आहे. ऑनलाइन सगळ्यांना वाचता येते वगैरे. मात्र आम्हाला कागदावर (तेही पूर्ण रंगीत आणि ग्लॉसी कागदावरच) छापायचे आहे. तेही पर्यावरण बिघडते आहे यावर गळे काढलेले लेख.
हे म्हणजे "पर्यावरण वाचवा, सेव दि एन्वायर्नमेंट" असे लिहिलेले मोठ मोठे प्लास्टिकचे आणि फ्लेक्स चे बोर्ड चौक चौकात लावण्यासारखे झाले. हा हा.
(No subject)
आजच हा अंक आणलाय...
लहानपणी दिवाळी अंक म्हणजे ठकठक, किशोर असायचे ते खूप मिस करतेय
ऐसी अक्षरेचा दिवाळी अंक हळू
...
कालच्या लोकसत्ता लोकरंगमध्ये
कालच्या लोकसत्ता लोकरंगमध्ये कालनिर्णय सांस्कृतिकची जाहिरात आहे. एका लेखकाचं नाव कौत्सुभ असं दिलं आहे.
म्हणजे? समजलं नाही काय
म्हणजे? समजलं नाही काय म्हणताय.
कौस्तुभ हवं.
ओह्ह... माझ्या डोळ्यांनी ते
ओह्ह... माझ्या डोळ्यांनी ते कौस्तुभच वाचलं.
अस्मिताने हे नको ते हवं लिहुनही दोन तीन वेळा त्या दोन्हीत काहीच फरक दिसला नाही. डोळ्याचा का मेंदूचा आजार! 
लोसकत्तेचाच प्रताप असेल हा.
लोसकत्तेचाच प्रताप असेल हा.
भास प्रकाशन म्हणून एक आहे.
भास प्रकाशन म्हणून एक आहे. त्यांनी एक नवीन उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू केला आहे. दिवाळीच्या आधी ते अनियतकालिक प्रकाशित करतात, कथांचं पुस्तकच खरंतर.
गेल्यावर्षीच्या खंडाचं नाव 'भास ११.२४' असं होतं. यावर्षीचा खंड 'भास १०.२५' आला आहे.
मला हा प्रकार आवडला. अमोल उदगीरकर, आदूबाळ, जयदीप चिपलकट्टी यांच्या कथा फारच आवडल्या.

दिवाळी अंकांपेक्षा यात फारच चांगल्या क्वालिटीचा कंटेंट आहे, आणि जहिरातींची पानं पलटण्याचा ताप नाही, हा अजून एक प्लस पॉइंट.
'नवल' मधल्या रहस्यकथा बऱ्या
'नवल' मधल्या रहस्यकथा बऱ्या/चांगल्या आहेत.
>>अमोल उदगीरकर, आदूबाळ, जयदीप
>>अमोल उदगीरकर, आदूबाळ, जयदीप चिपलकट्टी यांच्या कथा फारच आवडल्या<<
काय काय आहेत या कथा? जयदीप चिपलकट्टी यांची कोणती कथा आहे?
बाकीच्या कथांबद्दल काय मत आहे? उदा. रामदास किंवा होळकर?
शिल्पा पाठक यांची कथा कशी वाटली?
Pages