तिसरी कसम

Submitted by अविनाश जोशी on 4 October, 2025 - 04:06

तिसरी कसम
फिल्म लाईन मध्ये बरीच वर्ष काम करल्यावर सुद्धा . इतर आणि त्याच लाइन मध्ये माणसे एकमेकांना कशी फसवतात आणि काही अप्रत्यक्षपणे काही गाजावाजा न करता मदत ही कशी करतात याच उत्तम उदाहरण म्हणजे तिसरी कसम हा चितपट आणि त्याचा निर्माता शैलेंद्र . शैलेंद्र ने बऱ्याच चित्रपटांकरिता अतिशय मधुर गाणी लिहली आहेत. गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन असे बहुतेक आर के स्टुडिओचे फिल्म असायच्या. बापू भट्टाचार्य , बासू चॅटर्जी , ऋषिकेश मुखर्जी , शैलेंद्र हे सर्व बिमल रॉय यांच्या बरोबर काम करायचे. बासू भट्टाचार्यांकडे त्यांना आवडलेली एक कथा होती. त्या कथेचे पॉकेट बुक ते सतत खिश्यात बाळगत असे. टांगेवाला हिरामण आणि नौटंकी मधील हिराबाई यांचा हळुवार प्रेमावर आधारलेली ही कथा आहे. शैलेंद्रने त्या कथेचे हक्क विकत घेतले. त्यांनी बासू भट्टाचार्याना चित्रपटाचे दिग्दर्शक नेमले. तसेच बासू चॅटर्जी, बी आर इशारा या दोघांना सहायक दिग्दर्शक म्हणून नेमले. गीतकार अर्थातच शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन हे ही निश्चित झाले. प्रमुख भूमिकांमध्ये हिरामण च्या भूमिकेसाठी दिलीप कुमार ला विचारण्यात आले पण त्याने नकार दिला त्यानंतर भारत भूषण व काही अन्य कलाकारांचा विचार झाला.
शैलेंद्र आणि राज कपूरची घट्ट मैत्री होती. एकदा शैलेंद्र राज कपूरकडे गेले असताना त्यांनी सांगितले की ते एक चित्रपट निर्माण करणार आहेत आणि त्याने राज कपूरला चित्रपटाची पटकथा ऐकवली. पटकथा ऐकल्यावर राज कपूरला कास्टिंगकरिता विचारले. नंतर तो चटकन म्हणाला 'कविराज तुमच्या कथेतला हिरामन मीच आहे' शैलेंद्रला आश्चर्य वाटले कारण राजकपूर त्या वेळेपर्यंत अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुपरस्टार झाला होता. शैलेंद्र म्हणाला 'तुम्ही प्रत्येक चित्रपटाला किती पैसे घेता हे मला माहित आहे. माझं बजेट अतिशय कमी आहे त्यामुळे तुम्ही मला परवडू शकणार नाही'. राजकपूर चटकन म्हणाला, 'मला हिरामण करायचाच आहे त्यासाठी मला फक्त एक रुपया द्या. तेवढा तरी तुमच्याकडे असेल ना ?' शैलेंद्र ने लागलीच एक रुपाया काढून राजकपूरला दिला. त्यानंतर हिराबाई करिता शोध घेणे सुरु झाले. पहिल्यांदा नूतन ठरली होती. परंतु काही कारणामुळे तिला जमले नाही. राजकपूर समोर अगदीच नवखी नटी ठरवण्यात अर्थच नव्हता. शेवटी वहिदा रहिमनला पसंत करण्यात आले. ती नृत्यानंगाना तर होतीच पण तिचे अभिनय कौशल्यही वाखाणण्यासारखे होते. पहिल्यांदा तिने नकारच दिला. पण गुरुदत्तच्या मध्यस्तीमुळे ती शेवटी तयार झाली.
चित्रपटाचे बजेट पाच लाखाचे होते. वहिदारहिमानची जास्त फी सोडल्यास इतर सर्व खर्च रेकॉर्डिंग आणि शूटिंगचा होता. शूटिंग सुरु झाल्यावर बासू भट्टाचार्यांचे पितळ उघडकीस पडले. त्यांना दिग्दर्शनातलं काहीही कळत नव्हते आणि बहुतेक सर्व सिनेमा बी. आर इशारा यांनी दिग्दर्शित केला. सगळ्यात प्रोडकशन कंट्रोलर असल्येल्या संतोष ठाकूरने काहीही कारण नसताना सर्व युनिटला बिनाला शूटिंगला नेले. त्यावेळेस ते शूटिंग जवळच्या कुठल्याही खेड्यात होऊ शकले असते. बिना ला संतोषचे होऊ घातलेले सासर होते व त्यांच्यावर भाव मारण्यासाठी त्याने सर्व तमाशा बिनाला उभा केला. रोज दीडशे दोनशे सासरची माणसे शूटिंग बघण्यास येत होती. एवढेच नाही तर नातेवाईक शिकारीला जात त्यांचा खर्च , गाड्या, बंदुकी, दारुगोळा हा सर्व खर्च शैलेंद्रवर टाकला गेला. ए के हंगल हा चरित्र अभिनेता मुंबईतील एक प्रख्यात महागडा सूट स्पेशालिस्ट होता. संतोष ने त्यांच्याकडून नातेवाइकांकरिता सतरा सूट आणि इतर भारी कपडे शिवून घेतले.
या सर्व उदयॊगात बजेट कुठल्या कुठे वर गेले. फायनान्सर कट कट करायला लागले. अखेर हो ना करता 1965 साली चित्रपट तयार झाला. सुरवातीपासून तब्बल पाच सहा वर्ष लागली होती. चित्रपट शोकांतिका असल्याने कुठलाही डिस्ट्रिब्युटर त्याला घ्यायला तयार नव्हता. शेवटी दिल्ली, यूपी च्या एका वितरकाने तो चित्रपट 1 जुलै ला वितरणाची तयारी दाखवली परंतु आयत्या वेळेस कोर्टाने वितरकवर बंदी आणली. बंदी उठवण्यासाठी शैलेंद्र विचार न करिता जामीन राहिला. या काळात शैलेंद्रचा बांद्र्यात एक बंगला होता आणि तिथे तो, त्याची बायको आणि त्याची पाच मुले राहत होती. वितरकाने पैसे न भरल्यामुळे जामीन राहिलेल्या शैलेंद्रला मोठी रक्कम , पर्सनल कर्ज घेऊन कोर्टात भरावी लागली.
शैलेंद्रचे मद्यपान अतिशय वाढले आणि त्याचा वयाच्या 43 वर्षी दुःखद अंत झाला. तिसरी कसम हा चितपट उत्तम चालला त्याने अनेक पारितोषिके पटकावली पण त्यापासून शैलेंद्रला काहीही फायदा झाला नाही. शैलेंद्रचे सर्व सावकार घरी येऊन बसू लागले आणि बायकोला बंगला विकून कर्ज फेडण्याविषयी गळ घालू लागले. परंतु कुटुंब दुसरीकडे कुठे जाऊ शकेल असे त्यांच्याजवळ एकही ठिकाण नव्हते. यातून राज कपूर ने मार्ग काढले. त्याने एका वकिलाला गाठून आणि शैलेंद्रच्या बायकोची समजूत घालून पाच मुलांना आईवर खटला भरून बंगल्याच्या विक्रीवर स्टे ऑर्डर आणली त्यामुळे राहण्याची सोय तर झाली. राज कपूर शैलेंद्रला दर महिना 500 रुपये देत होता. त्याने त्याच्या 17-18 वर्षाच्या मुलाला 500 रूपये महिना देणे सुरु केले. ही रक्कम तो मेरा नाम जोकर च्या नुकसानीपर्यंत देत राहिला. तसेच त्याने 2-3 वर्षांनी चित्रपटाचे सर्व उत्पन्न आणि देणेदार यांची सांगड घालून कुटुंबाला बऱ्यापैकी रक्कमही मिळवून दिली.
शैलेंद्र सारख्या सज्जन आणि भावविश्वात रमणाऱ्या कवी ला असे फसवल्याने खरोखरच वाईट वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या चित्रपटात शैलेंद्र बुडाला आणि गेला इतकेच माहित होते.

भिडस्त स्वभाव खुप वाईट. शैलेंद्र भिडस्त असणार. चित्रपटाच्या बजेट नाटकी हिरो हिरविनी वाढवतात हे ऐकले होते. प्रॉडक्शन कंट्रोलरने निर्मात्याला बुडवलेले पहिल्यांदा ऐकले. ए के हंगल टेलरही होते माहित नव्हते.

इतक्या सुंदर , कलात्मक सिनेमाच्या निर्मितीमागे अशी कटू, व्यावहारिक होरपळ असावी, हे दुर्दैव !

ओह फार दुर्दैवी...

कलाकारी वेगळी आणि धंदा वेगळा हेच खरे. आपल्याला त्यातील खाचाखोचा माहीत नसल्यास तशीच विश्वासू माणसे सोबत असावीत अन्यथा जग टपलेलेच असते.

शैलेंद्र या चित्रपटामुळे बुडाला हे माहिती होतं पण डिटेल्स एवढे माहित नव्हते.
दूर्दैव..

या चित्रपटाची कथा फणीश्वरनाथ रेणू यांच्या ‘मारे गये गुलफाम’ या कथेवर आधारित आहे.