पाककृती स्पर्धा २: आईस ब्लू बनाना स्मुदी - निल्स_23

Submitted by निल्स_23 on 4 September, 2025 - 00:43

तर इतर दोन स्पर्धांमध्ये भाग घेतला आणी ज्या स्पर्धेवर सर्वाधिक चर्चा झाली त्यातच भाग घेतला नाही....असे व्हायला नको.
म्हणून ही झटपट होणारी टेस्टी, हेल्दी स्मुदी.
साहीत्य:
1 फ्रोझन केळं
थोडेसे अननसाचे तुकडे
ग्रीक योगर्ट
हवे असेल तर अल्मंड मिल्क
चिया सीड्स

मी निळा रंग यावा म्हणून गोकर्णाची निळी फुले पाण्यात भिजवून ठेवली होती.

कृती एकदमच सोपी. केळी, अननस, ग्रीक योगर्ट आणी अल्मंड मिल्क ब्लेंडर मध्ये घुरर् करून घ्यायचे. त्यावर चिया सीड्स आवडत असतील तर अजून फळे, सुकामेवा, सीड्स घालून आस्वाद घ्यावा.

Screenshot_20250904_101220_Gallery.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चित्रात किवी दिसतय आणि अननस दिसत नाहीये, फोटो चुकीचा दिला गेले का ?
बाकी गोकर्ण फुलांमुळे रंग मस्त आलाय.
हे स्मुदी प्रकरण एवढ आवडत नाही त्यामुळे करून पिणार नाही पण दिसतय खूप छान.

छल्ला ही एंट्रि पाककृती स्पर्धा 2 साठी आहे. विना चूल पदार्थ बनवणे.
पाककृती स्पर्धा 3 आहे फळांचा तिखट मीठ वापरून पदार्थ.
ती एंट्री इथे आहे

https://www.maayboli.com/node/87154

रंग खूप सुरेख आलाय. एकदम समुद्र..
मला पण पूर्ण ग्लासचा फोटो बघायला आवडेल. स्मुदी आवडणार्‍या आणि पिणार्‍या घरातल्या मेंबरांपर्यंत पोचवते रेसेपी.

ग्लासचा फोटो काढायला पुन्हा करेन आता.
सजावट आणी फोटोसाठी बोल मध्ये केले. ग्लासमध्ये चिया सीड्स आणी ड्रायफ्रुट्स स्मुदी मध्ये मिक्स करून वरती हवे ते फ्रुट्स घालून घेता येईल.