शशक - २ - { परिवर्तन } - { रसरंगी }

Submitted by रसरंगी on 3 September, 2025 - 10:04

मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!

कठीण निर्णय होता. काय करणार? शेवटी आपलीच मुलगी. वडील म्हणून जितकं समजवायचं ते सगळं केलं. तिचीच तीव्र इच्छा होती तिला मुलगी नाही तर मुलगा बनायचंय. ती म्हणाली तिचं स्वप्न ती मुलगा बनूनच पूर्ण करू शकेल

आता विचारान्ती मलाही पटतंय. आज तुझ्या मुलीचं - माझ्या नातीचं - -एका मुलामधे यशस्वीपणे परिवर्तन झालं आहे.

आपण अजूनही त्याचा उल्लेख 'ती' असाच करतोय. पण प्रयत्न करू संबोधन बदलायचा. नावही बदलायला हवं. लोकांनाही सांगायला हवं. काय लपवणार?

काय ठेवशील नवीन नाव?

आधीचंच थोडं बदलूया. शिखंडीनीचं शिखंडी करूया. पांचालनगरीत आजच दवंडी पिटवतो की प्रजेने राजकुमार शिखंडीला योग्य मान द्यावा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक्दम मस्त आणि समर्पक!

छान आहे, पण मला नेमकी समजली नाही. म्हणजे मुलगी कि नात?>.>
संवाद वडील आणि त्याचे पिता यांच्यात आहे. वडिलांची मुलगी म्हणजे आजोबांची नात.

संवाद वडील आणि त्याचे पिता यांच्यात आहे. वडिलांची मुलगी म्हणजे आजोबांची नात. >>> अच्छा आता समजलो.
"वडील म्हणून जितकं समजवायचं ते सगळं केलं." या वाक्यामुळे गोंधळलो होतो