अभिमान वाटावा असे छोटे-मोठे अनेक क्षण माझ्या वाट्याला येत गेले / पुढेही येतील पण स्वतःपेक्षा आपल्या आप्तजनांच्या कामगिरीचा अभिमान अंमळ जास्तच वाटतो.
अठरावं पुर्ण झाल्या झाल्या लगेच दुसर्या दिवशी माझ्या थोरल्या मुलाने रक्तदान केले आणि मी पण त्याला साथ दिली.
कित्येक बाबतीत तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरी अजूनही रक्ताचे उत्पादन कृत्रीम रित्या करता येत नाही. "कुणास्तव कोणीतरी" रक्त दिले तरच जीव वाचवता येतो. त्यामुळे रक्तदान करा असे मी नेहेमीच सांगत असतो. अनेक जणांनी त्यांचे पहिले रक्तदान माझ्या प्रोत्साहनामुळे ( पक्षी भुणभुण केल्यामुळे
) माझ्यावरच्या प्रेमाखातर केलेले आहे.
हे ऐकत-बघत मोठा झाला असल्याने असेल पण मला मुलाला अजीबात आग्रह करावा लागला नाही. आधी एकदा मोघम बोलणे झाले होते तितकेच. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आठवण मुलानेच केली. त्याचे पहिले रक्तदान आणि मी नाही असे कसे होईल मग त्याच्यासोबत मीपण रक्तपेढीत गेलो आणि रक्तदान केले. माझ्या मुलाचा आणि आपल्याकडून योग्य ते संस्कार केले गेले असावे असे वाटून स्वतःचा अभिमान वाटावा असा हाच तो क्षण.

अपघात, विविध शस्त्रक्रिया, दुर्धर आजार, थॅलेसेमीया, कॅन्सर ई. प्रसंगी भासणारी रक्ताची आणि रक्त घटकांची गरज पुर्ण करण्यासाठी निरोगी माणसांनी रक्त देण्याकरता पुढे येणे म्हणजे एक जबाबदार मानवतावादी भुमिका पार पाडणे होय.
ह्या धाग्याच्या निमित्ताने परत एकदा सगळ्यांना आवाहन करतो की रक्तदान करा जीव वाचवा.
वाह किती छान Proud moments
वाह किती छान
Proud moments
अरे वाह भारी!
अरे वाह भारी!
मला वाटले ते मिलिंद सोमन प्रकरण असेल.. ट्रायथलॉन वगैरे.. पण हे सुद्धा अभिमानास्पदच!
खरंच अभिमानास्पद !
खरंच अभिमानास्पद !
मलाही आयर्न मॅन बद्दल असेल
मलाही आयर्न मॅन बद्दल असेल असं वाटलेलं
लोकोपयोगी उपक्रमात सहभागी होणं कौतुकास्पद आहे.
काही मायबोलीकर हे खरोखरच महान आहेत.
तुम्ही स्वतः, मार्गी, अवधूत सर आणखी ही बरेच.
सॅल्युट सर्वांना!
अभिमानास्पद.
अभिमानास्पद.
मलाही आयर्न मॅन बद्दल असेल
मलाही आयर्न मॅन बद्दल असेल असं वाटलेलं
लोकोपयोगी उपक्रमात सहभागी होणं कौतुकास्पद आहे.>> +१
धन्यवाद वर्षू ताई , ऋन्मेष,
धन्यवाद वर्षू ताई , ऋन्मेष, आशिका, रानभुली , शर्मिला, मॅगी
आयर्नमॅन तो ही मायबोलीवरचा पहिला हे अभिमानास्पद असलं तरी त्याबद्दल इथे लिहून झाले आहे. लिखाण पुर्वप्रकाशित नसावे ही अट तर आहेच शिवाय परत तेच सांगण्यात काय हशील !
खरय, हा क्षण अभिमानाचा
खरय, हा क्षण अभिमानाचा
मला वाटलं मेळघाट मुलांच्या
मला वाटलं मेळघाट मुलांच्या बाबतीत असेल... असो किती वेगवेगळी क्षेत्रं आहेत तुमची... आम्हाला तुमचाच अभिमान वाटतो ... घरी मुलांना ही सांगितलं आहे मी तुमच्याबद्दल अभिमानाने...
खूप छान sr पेंडसे आणि jr
खूप छान sr पेंडसे आणि jr पेंडसे
खूप अभिमानाचा प्रसंग आहे खरा
खूप छान.
खूप छान. खरं तुमच्याकडे किती सुंदर क्षण आहेत पण त्यातून हा निवडलात, हा मोठेपणा आहे हर्पेने. अजुन क्षण येऊ देत.
खूप छान sr पेंडसे आणि jr
खूप छान sr पेंडसे आणि jr पेंडसे
खूप अभिमानाचा प्रसंग आहे.... +१.
छान! Keep it up
छान!
Keep it up
भारीच! खरंच अभिमानास्पद!
भारीच! खरंच अभिमानास्पद!
जबरी! कौतुकास्पद. अनुकरणीय.
जबरी! कौतुकास्पद. अनुकरणीय.
खरंच कौतुकास्पद हर्पेन. यातून
खरंच कौतुकास्पद हर्पेन. यातून प्रेरणा घेऊन माझ्याही मुलाला आता मी हे सांगतो.
अरे काय लिहिलं आहेस! मलाच
अरे काय लिहिलं आहेस! मलाच फार भारी वाटलं. अंगावर रोमांच आणि काटा दोन्ही म्हणत नाहीत त्याला... पण जे काही म्हणत असतील ते आलं. त्यालाच अभिमान म्हणत असणार.

हेच ते संस्कार!
जबराट!
खरेच अभिमानास्पद क्षण. तुमचे
खरेच अभिमानास्पद क्षण. तुमचे गुण मुलामध्ये नक्की आले आहेत.
खरंच कौतुकास्पद. लेकीला हा
खरंच कौतुकास्पद. लेकीला हा लेख वाचून दाखवेन .
Harpen, तुमच्यासारख्या अनेक
Harpen, तुमच्यासारख्या अनेक अज्ञात दात्यांमुळे माझ्या आईचे आयुष्य दोन तीन वर्षे वाढले होते. त्यामुळे मला खूप आदर आहे रक्तदातांसाठी.
एक छोटी परतफेड म्हणून मी दोन तीन वेळा प्रयत्न केला होता, पण hb कमी म्हणून त्यांनी परत पाठवले. १२+ लागते.
छान अभिमानास्पद कृती.
छान अभिमानास्पद कृती.
छान, कौतुकास्पद उपक्रम
छान, कौतुकास्पद उपक्रम
खरंच अभिमानास्पद आहे रे
खरंच अभिमानास्पद आहे रे
ज्युनियरचे आभार आणि हा विचार येतोय म्हणून अभिनंदन
मी मुलाला दाखवतो हे
त्यालाही आयडिया आवडणार असे वाटतंय
मी करत असतो रक्तदान पण बड्डे month वेळी.
Frequency वाढवली पाहिजे
>>>>>मी करत असतो रक्तदान पण
>>>>>मी करत असतो रक्तदान पण बड्डे month वेळी.
छान. मी आणि नवरा संधी मिळेल तेव्हा रक्तदान करतो.
खरेच अभिमानास्पद क्षण.रक्तदान
खरेच अभिमानास्पद क्षण.रक्तदान सर्वश्रेष्ठ दान.
वाह! मस्त!!
वाह! मस्त!!
वाह हर्पेन खरंच अभिमानास्पद
वाह हर्पेन खरंच अभिमानास्पद
कवे, हेमाताई, धनवंती, सामो,
कवे, हेमाताई, धनवंती, सामो, देवकी, अनन्त्_यात्री, ईबा, हर्पा, अतुल, अमित, निर्मल सामी, प्राचीन माबो वाचक, झक्या, सिमरन, छन्दिफन्दि, धनुडी धन्यवाद मंडळी
मनापासून आभारी आहे. लोभ आहेच तो असाच राहू द्या वाढू द्या.
हेमाताई आणि अमित विशेष प्रतिसाद _/\_
धनवंती, हिमोग्लोबीन वाढवून एकदा तरी रक्तदान करेनच असा संकल्प करून पहा.
अतुल झक्या सामी लेकरांनी रक्तदान केले की कळवा.
लाही आयर्न मॅन बद्दल असेल असं
लाही आयर्न मॅन बद्दल असेल असं वाटलेलं
लोकोपयोगी उपक्रमात सहभागी होणं कौतुकास्पद आहे.>> अगदी
खूप कौतुकास्पद आणि
खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद ! सामाजिक जाणिवेचा वारसा.
Pages