Submitted by माबो वाचक on 31 August, 2025 - 10:49
“मला वाटलं नव्हतं, तू कधी असा वागशील, मास्तरा” गावातलीच कोणी बाई मास्तरांच्या समोर उभी होती.
“आरं समद्या गावाला शानं कराया आलतास नव्हं, आन सवताच बाईच्या नादी लागलास? आरं पुस्तकं वाचणारा तू, बोर्डावर तुणतुणं वाजवाया लागलास? थू तुझ्या जिंदगानीवर” असे म्हणून ती पाचकन मास्तरांच्या तोंडावर थुंकली.
मास्तर धडपडत स्वप्नातून जागे झाले. त्यांच्या अंगाला दरदरुन घाम फुटला होता. त्यांनी आजूबाजूला पहिले अन शेजारीच पडलेली दारूची बाटली उचलून तोंडाला लावली. दारू हळूहळू शरीरात मुरत गेली आणि मास्तरांना डोळ्यासमोर गोऱ्यापान पिंडऱ्या दिसू लागल्या. त्यांच्या चेहेऱ्यावर स्मित पसरले.
शेजारच्याच फडातून गाण्याचे शब्द झिरपत होते, “अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं….”
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पिंजरा. झकास!! करेक्ट पोटरी
पिंजरा. झकास!! करेक्ट पोटरी (पिंडरी) घात करते.
मस्त !
मस्त !
सामो, बरोबर ओळखलंत. पिंजरावरच
सामो, बरोबर ओळखलंत. पिंजरावरच हि कथा बेतली आहे.
सर्वांचे आभार.
क्या बात है!! जमलीच एकदम.
क्या बात है!! जमलीच एकदम.