एक क्षण अभिमानाचा
माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात अधून मधून येतात अभिमानाचे छोटे छोटे क्षण. पण हे लहान क्षणच आपल्या प्रवासाची (आतापर्यंतच्या किंवा पुढच्या) दिशा दाखवायला खूप अनमोल ठरतात.
**
“अरे.., तू आज माझ्या पर्समधले पैसे घेतलेस का?”
मुलाने घरात पाऊल टाकता क्षणीच मी विचारले. आल्या आल्या लगेच कुणाला प्रश्न विचारू नये ही जाणीव होती मला. पण नं दिसलेली पाचशेची नोट स्वस्थ बसू देत नव्हती मला गेल्या दोन तासांपासून.
बिनकुलपाच्या ड्रॅावर मध्ये अगदी हाताशी लागेल अशी एक पर्स ठेवलेली असायची अन् त्यात घरखर्चाला म्हणून लागणारे थोडेफार पैसे असायचे. खरतर त्यातले पैसे कधी मोजलेलेही नसायचे. पण काल मला नेमके सुट्टे पैसे हवे होते म्हणून बघितलं त्यात, तर फक्त पाचशेची एक नोट होती तिथे. ‘ह्यात सुटे पैसे ठेवायला हवेत’ मनाने नोंद करून ठेवली.
आज ऑफिस मधून येतांना थोडी घरगुती खरेदी केली अन् आल्यावर पर्स मध्ये पैसे ठेवायला गेले तर त्यातली पाचशेची नोट गायब!
मी फोन चेक केला. अजूचा काही मेसेज नव्हता. म्हणजे त्याने पैसे घेतलेले दिसत नाही. घरात तेव्हा आम्ही दोघेच रहायचो.
अजू मला त्याच्या बारीक-सारिक खर्चाकरिता आदल्या दिवशी पैसे मागायला नेहमीच विसरायचा. अन् मी सकाळी सातच्या आत घराबाहेर पडायचे तेव्हा तो गाढ झोपेत असायचा. त्याला अगदी कॉलेजला निघतांना पैशांची आठवण व्हायची. मग पर्स मधले पैसे घेऊन तो मला ताबडतोब मेसेज टाकायचा. (त्यावर, ‘तुला काल सांगायला काय झालं होतं?’ हे मी नं विसरता लिहायचे). पण तो काही त्याची सवय बदलत नव्हता. अन् पैसे घेतल्याचा मेसेज टाकायलाही विसरत नव्हता.
घरकाम करणारी विश्वासाची मावशी बहुतेक वेळेला आम्हा दोघांच्या अनुपस्थितीत येऊन शेजारून किल्ली घेऊन काम करून जायची. विश्वास तोडत नाही तोपर्यंत सगळ्या मावश्या माझ्या विश्वासच्याच असतात.
मग अजूचा मेसेज नाही, तर पैसे गेले कुठे..? म्हणून तो घरात आल्या आल्या मी त्याच्याकडे विचारणा केली.
“अगं.. हो.. आज नं सकाळी मला एवढी घाई झाली..” (‘होणार नाही तर काय? रात्री टाइमपास करायचा.. कॉलेजला निघायच्या एक तास आधी उठायचं..’ मी मनातल्या मनात! मुलं मोठी झाली की मनातल्या मनात बोलणं फारच वाढतं)
“एकदम निघतांना, खाली उतरल्यावर मला आठवण झाली, स्कूटर मधलं पेट्रोल संपलय मग मी धावतच आलो.. पैसे घेतले..” त्या गडबडीत तुला मेसेज टाकायचा राहूनच गेला. “हे घे उरलेले पैसे..” म्हणत त्याने खिशातून पाकीट बाहेर काढलं.
“अरेच्चा! हे काय..” त्याने पाकीटातून निघालेल्या पाचशेच्या नोटेकडे बघितलं.
“मी पेट्रोलपंपावर पैसे द्यायचेच विसरलो.. खूप गर्दी होती आज तिथे... थांब आलोच मी..” म्हणत आल्यापावली तो सकाळच्या पेट्रोलचे पैसे द्यायला गेला.
त्या क्षणी वाटलं एक आई म्हणून जिंकले मी आज! मुलाने एवढं प्रामाणिक असणं ह्या पेक्षा अधिक काय हवं!
मला मुलाचा अभिमान वाटला!
**
प्रसंग खूप छोटा आहे. अगदी लिहू की नको असं वाटत होतं.. पण एक आई म्हणून मला अभिमान आहे ह्या क्षणाचा.
छान किस्सा!
छान किस्सा!
प्रसंग छोटा असला तरी प्रामाणिकपणा आपल्या जागी मोठा आहेच.
निरागसतेचे वय ओलांडून मुले व्यावहारीक जगात प्रवेश करतात तेव्हा खरे या गुणांची कसोटी लागते. आणि तेव्हा मुलांनी असे काही केले की एक पाठ स्वतःची सुद्धा थोपटून घ्यावीशी वाटतेच
बाकी हे पैसे विसरणे आणि नंतर देणे हे माझ्यासाठी रूटीन आहे इतका मी विसरभोळा आहे. त्यामुळे किस्सा स्वतःशी सुद्धा रिलेट झाला.
प्रसंग छोटा असला तरी
प्रसंग छोटा असला तरी प्रामाणिकपणा आपल्या जागी मोठा आहेच.+1
छान आहे किस्सा.
त्या क्षणी वाटलं एक आई म्हणून
त्या क्षणी वाटलं एक आई म्हणून जिंकले मी आज
>>>> १००० %
गोड आठवण आहे.
गोड आठवण आहे.
काय सुंदर किस्सा आहे शर्मिला.
काय सुंदर किस्सा आहे शर्मिला. होय जिंकलीस तू.
छान किस्सा! आवडला!
छान किस्सा! आवडला!
जीवनाचे सार्थक होण्याचा क्षण
जीवनाचे सार्थक होण्याचा क्षण अनुभवणे ते हेच.
खुप सुंदर आणि अभिमानास्पद किस्सा.
त्या क्षणी वाटलं एक आई म्हणून जिंकले मी आज +१११
छान किस्सा! आवडला!
छान किस्सा! आवडला!
छान
छान
छान किस्सा!
छान किस्सा!
प्रसंग छोटा असला तरी प्रामाणिकपणा आपल्या जागी मोठा आहेच.>>+१
छान किस्सा !!
छान किस्सा !!
अजूनही जीवनमूल्ये जपणारे आहेत
अजूनही जीवनमूल्ये जपणारे आहेत हे पाहून बरे वाटले. काही समाजात खरे बोलणे, प्रामाणिकपणा दाखवणे हा मूर्खपणा समजतात तर दुसर्याला टोपी घालता न येणे या नामुष्कीच्या बाबी समजतात.
सुधीर कांदळकर +१
सुधीर कांदळकर +१
छान आहे किस्सा, समाधान देणारा
छान आहे किस्सा, समाधान देणारा .
प्रसंग छोटा असला तरी
प्रसंग छोटा असला तरी प्रामाणिकपणा आपल्या जागी मोठा आहेच.+1