Submitted by अजिंक्यराव पाटील on 29 August, 2025 - 09:46
हॉस्पिटलबाहेर पावसाने जोर धरलेला असताना ती खिडकीतून पश्चिमेला नजर लावून उभी होती, असाच इंद्रधनू, पण अवकाळी पावसातला. आणि अवकाळी पावसासारखा तो त्यांचा धुंद प्रणय..
"मला नाही जमणार आताच ही जबाबदारी, अबॉर्ट कर.."
लॅपटॉपबाहेर तोंडही न काढता तो म्हटला होता..
5 महिन्यात सात जाऊन एकच रंग उरला होता, काळपट करडा.. दुखणारे ओटीपोट आवळत असतानाच तिला खोलीतल्या कोपऱ्यातून हाक ऐकू आली..
"आई"
आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिले.
पातळशी त्वचा, अर्धवट डोळे नाक कान इवलेशे बोटं एका अर्थाने सुंदर पण आणि विद्रुप पण त्याच्या हातात, तिच्या नवऱ्याचा लॅपटॉप?
"चल आई, बाबाही आलेत, तुम्हाला मी नको असलो तरी मला तुम्ही हवे आहात, चल!"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बाप रे!
बाप रे!
"चल आई, बाबाही आलेत, तुम्हाला
"चल आई, बाबाही आलेत, तुम्हाला मी नको असलो तरी मला तुम्ही हवे आहात, चल!"
हे अपील झाले.
जबरदस्त!
जबरदस्त!
शेवटचं वाक्य परफेक्ट!
शेवटचं वाक्य परफेक्ट!
बापरे!
बापरे!
देवा!
देवा!
धन्यवाद! मते पण द्या
धन्यवाद! मते पण द्या
खिक्क
खिक्क