शशक 2 - विश्वासघात - अni

Submitted by अni on 29 August, 2025 - 03:47

"मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील," क्रिती चिडून म्हणाली. कबीर काहीच न बोलता शांत उभा राहिला. तिच्या हातात त्याचा फोन होता – उघडलेला, आणि त्यात एक अनोळखी मुलीसोबतचे चॅट.

"हे फक्त कामासाठी होतं," तो शेवटी म्हणाला.

"ऑफिसच्या कामासाठी 'मिस यू' म्हणतात का?"

इतक्यात अजुन एक वीडियो मेसेज आला आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले.

क्रितीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. तिने त्याच्यावर कधीच संशय घेतला नव्हता. कॉलेजपासूनचे प्रेम, एकमेकांवर अढळ विश्वास. पण आज ती बधिर झाली होती. कबीरचे स्पष्टीकरण सुरुच होते, पण ती त्याच्याकडे न पाहताच घराबाहेर पडली.

आता मनात फक्त एकच वाक्य घुमत होतं – "मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डीलीट करायचे असतात मेसेज.
ते सुद्धा ऑल क्लिअर न करता नॉर्मल मेसेज ठेवावेत.

आणि व्हिडिओ पाठवायची रिस्क घेऊच नये. त्यापेक्षा व्हिडिओकॉल सेफ राहतो.

फोटो सुद्धा दोघे ऑनलाइन असतानाच कन्फर्म करून लगेच पाठवावेत आणि हाताबरोबर डिलीट करून रिसायकल बिन सुद्धा साफ करावी.

किंवा दोघात एक कॉमन मेल आयडी बनवून तिथे शेअर करावेत.

कच्चा खिलाडी होता कबीर.
आपल्या कर्माने मेला..

पण जाऊ दे आता
Bag न घेता गेली असेल आणि इमोशनल attachment कायम असेल तर येईल काही तासांनी परत... तेव्हा काय करायचे यासाठी मला विपु करायला सांगा त्याला..