शशक - १ - विस्मय चकित नजर - माबो वाचक

Submitted by माबो वाचक on 29 August, 2025 - 01:49

आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले.
मुन्नाभाई ने मायबोलीवरील शशक स्पर्धेचा धागा बंद केला, मोबाईल बाजूला ठेवला आणि सर्किटला हाक मारली.
“ए सर्किट, ये विस्मयचकित नजर क्या होती है?”
सर्किट क्षणभर विचार करून म्हणाला, “भाई, बोले तो, एक आंख से विस्मय को देखने का, और दूसरी आंख से चकित को देखने का.”
“ये विस्मय और चकित कौन है?”
“होंगे कोई टपोरी, भाई”
“ए सर्किट, उन दोनों को उठाके लेके आ, मुझे भी विस्मय चकित नजर से देखना है”
“अभ्भी लाता हूं, आप चिंता मत करो भाई”
आता कोणत्या दोन बकऱ्यांना विस्मय आणि चकित बनवायचे याचा विचार करत सर्किट तिथून सटकला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users