शशक १- विश्वास - अni

Submitted by अni on 28 August, 2025 - 13:45

आज पासून सेमिस्टर ब्रेक सुरु म्हणजे सर्व होस्टेल रिकामी.
पण ती तिकडेच होती.
झोप येईना म्हणून अभ्यास करत बसलेली.

खुप उशिरा रात्री अचानक तिचा मोबाईल वाजला.
स्क्रीन वरील नाव दिसले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले..

"पप्पा..." – ती घाबरून ओरडली.

दोन वर्षांपूर्वीच तर गेले होते पप्पा.
पण नंबर तर त्यांचाच होता.

काही क्षण शांतता. मग पुन्हा हलका आवाज....

"बाळा, अभ्यास कसा चाललाय?"

ती गारठली.
ओठ थरथरले.

"चांगला... तुम्ही कुठे आहात?"

"कायम तुझ्याजवळच आहे बेटा."

फोन कट झाला.

दुसऱ्या दिवशी, ती पुन्हा पुस्तकांमध्ये रमली.
धास्तावलेली नव्हती – आधार मिळाला होता.

ह्यापुढे ती तिच्या आयुष्यात एकटी कधीच नसणार ... हा विश्वास घेऊन जगणार होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमानविय शशक!

Submitted by केशवकूल>>>
मला वाटतं किंचितशी फॅन्टसी .

@झंपी
स्वप्न नाही भासही नाही... बस फक्त विश्वास.
देव आहे हा जसा विश्वास असतो तसेच हे थोडेसे. माझा बाप माझ्यासोबत कायम आहे. अचानक पोरके झाल्यावर सैरभैर झालेल्या तिच्या मनाला आधार हवा होता. तो तिला मिळाला / तिने मिळवला हे सांगण्याचा प्रयास केलाय थोडक्यात..