Submitted by स्वानंदी१ on 28 August, 2025 - 12:22
ते दोघे, चुलत भाऊ!
राजकारणाच्या पटावर कधी याची सरशी होई तर कधी त्याची!
दोघांचे स्वभाव वेगळे, व्यक्तिमत्वे निराळी!
खरेतर, काकांचा उत्तराधिकारी म्हणून दुसऱ्याकडेच पाहिले जात होते, पण काकांचे पुत्रप्रेम आडवे आले आणि पहिला सेनाप्रमुख झाला.
दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.
दुसऱ्याने आपली वेगळी चूल मांडली होती.
पहिल्याला राजकारणातील डावपेच भारी पडू लागले;
तेव्हा कसेही करून भावाशी समेट घडवून आणावा असे वाटू लागले.
हिंदीसक्तीचे निमित्त झाले, आणि दोघे भाऊ मनाविरुद्ध एका मंचावर आले खरे, पण पुन्हा गाडी जैसे थे!
दुसऱ्याकडून थंड प्रतिसाद पाहून अखेरीस, पाहिल्यानेच त्याला फोन लावला आणि अजीजीने इतकेच म्हणाला, " मला कधी वाटले नव्हते, तू असा वागशील!"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त...
मस्त...
इथे राजकीय मंडळ आलं तर माबोच्या इतिहासातला पहिला पेटता शशक धागा होईल
पेटते शशक ... राभु
पेटते शशक
... राभु 
आवडली
आवडली
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
पेटते शशक आणि
दोन भाऊ.. माणसासाठी एकत्र आले - हा एक अभिमानाचा क्षण - असा उपक्रम /बाळधागाही निघू शकेल.
पेटते शशक
पेटते शशक
छान लिहिलेय अगदी चित्रदर्शी.
मस्तच जमलंय.
मस्तच जमलंय.