शशक २ - आनंद - उपाशी बोका

Submitted by उपाशी बोका on 28 August, 2025 - 12:14

शाळेच्या दहाव्या रियुनियनला समीर भेटला मोनिकाला.
त्याच्या आवडीची चॉकलेट्स खास त्याच्यासाठी तिने स्वतःच्या हाताने बनवली होती.
चॉकलेट्स चघळत त्याने गप्पांना सुरुवात केली, जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. पहिलं प्रेम होतं त्याचं. अजूनही ती तितकीच सुंदर दिसत होती, जास्तच सुंदर.
मोनिका, मी अजूनही तुझी वाट बघतोय.
ते शक्य नाही, ती ठामपणे म्हणाली.
पण का? तशीही तू एकटीच आहेस.
नाही, मी तुला नाकारले म्हणून गुंड पाठवून माझ्या नवऱ्याचा खून केलास तू, तेपण मी प्रेग्नण्ट असतानाच. मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!
जाउ दे जुन्या गोष्टी. आता तरी माझी हो, आनंदात रहाशील. तो पुटपुटला.
स्लो पॉइजनची चॉकलेट्स तू खाल्लीस, मी आनंदित झाल्ये कधीच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह उपाशी बोका..
दोन्ही शशक मध्ये कनेक्शन आहे का.. शोधायला जाऊ का?

खुनी शशक Lol
उबो अर्नाळकरांची नवी कादम्भारी. भारी आहे.

सगळ्यांचे आभार. _/\_
दोन्ही कथांमध्ये कनेक्शन नाही. मुख्य पात्रे बऱ्याच वर्षांनी भेटतात, हे सांगण्यासाठी शाळेचे रियुनियन असा प्रसंग घेतला आहे आणि पात्रांची नावेपण तीच ठेवली, इतकेच साम्य आहे. (अर्थात कुठलीही नावे घेतली तरी त्याने फारसा फरक पडणार नाही म्हणा.)

'शशक १ - सुपारी' कथेत शेवटी "तितक्याच पैशात" असे जोडायचे होते, पण शब्दसंख्येच्या मर्यादेमुळे तसे करता आले नाही. जाऊ दे, पहिल्या प्रयत्नाला गोड म्हणून घ्या. पुन्हा एकदा धन्यवाद.

छान आहे कथा.
बाकी स्लो पोईंजन असेल तर लगेच उलट्या करून खाल्लेले बाहेर काढता येईल. Happy