तू

Submitted by अनन्त्_यात्री on 28 August, 2025 - 02:09

ग्रीष्म-तप्त भूमीवर तू तर
सर सर मृगसर कोसळणारी

विकल-विव्हल प्राणांवर फुंकर
घालुनी विस्मित तू करणारी

क्षणभंगुरता गर्वे मिरवीत
चिरंतनासम तू फुलणारी

आदि-मध्य-अंताचे बंधन
सहज समूळ तू झुगारणारी

द्वैताच्या फुलल्या बागेतही
अद्वैता रुजवू बघणारी

भळभळते व्रण नकळत बांधून
भरजरी पैठणी तू उरणारी

Group content visibility: 
Use group defaults