नमस्कार मायबोलीकरांनो,
गेली कित्येक वर्षे मायबोली वरच्या प्रत्येक उपक्रमाचा अविभाज्य घटक म्हणजे शशक.
या वर्षी आम्ही तुम्हाला फक्त एक वाक्य देणार आहोत. ते वाक्य शशक मधे यायला हवे एवढीच अट आहे. फक्त शशकसाठी दिलेले वाक्य बोल्ड मात्र आठवणीने करा.
शशक हा उपक्रम नसून स्पर्धा आहे.
पहिल्या शशक स्पर्धेसाठी वाक्य आहे " आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले"
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या :
१. प्रवेशिका पाठवण्याकरिता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
२. 'मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
४. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - शशक - १ - {कथेचे शीर्षक } - {तुमचा आयडी}"
५. प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
६. स्पर्धेचे विजेते मतदानाने निवडण्यात येतील.
७. लेखन कुठेही पूर्वप्रकाशित नसावे.
वॉव छान आहे वाक्य.
वॉव छान आहे वाक्य.
बराच वाव आहे कल्पना शक्तीला. रामसे बंधु टाईप कथा नक्कीच येतील.
बरीच मोठी रेंज आहे या
बरीच मोठी रेंज आहे या वाक्याला.. कुठलेही शशक लिहून त्यात हे घुसवू शकतो
वा! धमाकेदार शशक येणार असे
वा! धमाकेदार शशक येणार असे वाटते आहे!
मी इथे माझीच पोस्ट परत
मी इथे माझीच पोस्ट परत टाकते आहे.
बघा कस्काय वाटतय ते.
संयोजक,
तुम्ही अशी मजेशीर वाक्य पुढील शशक साठी द्या. धमाल होइल.
काय म्हणता लोक हो?
१) बाई! काय प्रकार?
२) सहन होत नाही आणि सांगता येत नाही
३) बस्स! आता पुरे हां