Submitted by Ramdas sawant on 19 June, 2009 - 07:28
कोल्हापूर स्पे....................ल..................
खळाळत्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर…मनातल्या माणूसकीचा पाझर कोल्हापूर…
रंकाळ्याचा वारा कोल्हापूर…पन्हाळ्याच्या धारा कोल्हापूर…
खासबागेतील कुस्ती कोल्हापूर…जेवल्यानंतरची सुस्ती कोल्हापूर…
चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध कोल्हापूर…मनानं, शरीरानं, आत्म्यानं बेधुंद कोल्हापूर…
मिसळीचं वाटण कोल्हापूर…पांढ~या रश्श्यातलं मटण कोल्हापूर…
शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर…राजकारणातली गेम कोल्हापूर…
शाहीरीचा बाज कोल्हापूर…गळ्यातला साज कोल्हापूर…
मातीमधलं घोंगडं कोल्हापूर…नखशिखांत रांगडं कोल्हापूर…
ताराबाई पार्कातलं चुणचुणीत कोल्हापूर…शिवाजी पेठेतलं झणझणीत कोल्हापूर…
क्षणोक्षणी जिथेतिथे…
भरपूरपुरेपुरे…ते…….
माझं कोल्हापूर
गुलमोहर:
शेअर करा
नमस्कार
नमस्कार रामदास,
ही कविता 'कविता' विभागात हलवा.
ही कविता तुमची स्वतः ची आहे काय? अशीच एक कविता आधी वाचल्यासारखी वाटते.
मायबोलीवर फक्त स्वतः लिहीलेले साहित्य प्रकाशित करता येते.
चु.भू.दे.घे.
--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
मोकाट ला
मोकाट ला अनुमोदन!!!
हे लेखन
हे लेखन आहे... पुरेपर कोल्हापूर (पेरुगेट जवळ, पुणे) ह्या हॉटेल च्या मेनु कार्ड वरील...
(अहो आठवड्याला एक चक्कर असते आमची....... )
बरोबर
बरोबर बोललात. ही कविता आहे.
---------------------------------------------------------------
लाख मेले तर चालतील
परन्तू लाखाचा पोशिन्दा जगला पाहिजे.