आमच्या घरचा बाप्पा

Submitted by संयोजक on 24 August, 2025 - 06:50

आमच्या घरचा बाप्पा

Screenshot_20250827_063028_Gallery.jpgसनईचा सूर कसा वाऱ्याने धरला
ढगांचा ढोल घुमू लागला
बिजलीचा ताशा जसा कडकड कडाडला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
आला आला आला माझा गणराज आला.....

आपल्या लाडक्या गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन झालेले आहे.
मायबोलीवरदेखील बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे, लोकहो.
तुमच्याकडेदेखील बाप्पा विराजमान झाले ना?
मग वाट कसली बघताय.... तुमच्या घरातील बाप्पाच्या सुंदर मूर्तीचे, मखराचे, आकर्षक सजावटीचे फोटो द्या की इथे.
यंदाच्या सजावटीसाठी काही विशेष देखावा, थिम असल्यास त्याबद्दल प्रतिसादात नक्की लिहा.
आणि हो त्याबरोबर तुमचा सुद्धा "सेल्फी विथ बाप्पा" जमल्यास नक्की टाका इकडे.

यासाठी आपल्याला आधी 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रुपचं सभासद होणं गरजेचं आहे.
मग वाट कसली बघताय, घ्या मोबाईल, करा क्लिक आणि टाका इथे फोटो.

गणपती बाप्पा मोरया !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20250902_085423_Gallery.jpg
.
Screenshot_20250902_092305_Gallery.jpg
.
Screenshot_20250902_092310_Gallery.jpg

GanpatiShindeWada.jpeg

GanpatiShindewada2.jpeg

माझ्याकडचा गणपती आणी आइकडच्या महालक्ष्म्या.
9e469c5e-4199-4d60-8a53-f0ae5e1a56b6.jpegbefc880e-78d2-4d7a-81d3-4fe8fcfe81b3.jpeg

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला. कोकणातल आमच्या गणपतीच विसर्जन . बाजूची हिरवाई खूप सुंदर दिसते ह्या दिवसात.

IMG-20250902-WA0014_0.jpg

कोकणात जायचा बेस्ट सीझन >> खरं आहे. गणपती बेस्ट सिझन असतो कोकणात. पाऊस त्या मानाने कमी आणि हिरवाई प्रचंड.. प्रत्यक्ष विसर्जन ही एवढं भारी वाटत.
सड्यावरून वहात येऊन कोंडीत ( मोठा खड्डा ) पडणारं पांढरशुभ्र गार, फेसाळ पाणी, रिमझिमता पाऊस, चहू बाजूंनी तररलेली भात शेती, पाण्याचा खळखळाट, पक्ष्यांची किलबिल आणि विसर्जनाला आलेली चार माणसं करत असलेला झांजा नाद ,गणपतीचा गजर एवढाच काय तो आवाज असं असतं आजुबाजूच वातावरण. विसर्जनाच्या ठिकाणी लाईट नसल्याने आमचं विसर्जन नेहमी दिवस उजेडीच होतं. इथल्या सारखं मध्यरात्री वगैरे अशक्य आहे.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!
IMG_3931.jpg

यावेळेस जरा उशीरच झाला पण फोटो व माहिती द्यायचे ठरवले होतेच. हा आमच्या घरचा यावेळचा गणपती.

यावेळची थीम समुद्र तळ - ओशन फ्लोअर - अशी होती. म्हणजे फाइण्डिंग नीमो मधे सुरूवातीच्या काही सीन्स मधे दिसतो तसा तळ किंवा स्नॉर्कलिंग करताना दिसतो तसा. पण फोटोत दिसतात तशा पाण्याच्या रंगांच्या छटा आवश्यक होत्या. त्याकरता काय वापरता येईल याची शोधाशोध केल्यावर इपॉक्सी रेझिन प्रकारातले एक केमिकल वापरता येते हे समजले. हे hazardous chemical आहे पण यात असलेले धोकादायक घटक पदार्थ नसलेला एक पर्याय आम्हाला मिळाला. त्याबद्दल डिटेल्स खाली देत आहे. हे वापरायचे असेल तर ते डिटेल्स व तुम्ही जे स्पेसिफिक रेझिन वापरणार त्याच्या फाइन प्रिन्ट्स वगैरे वाचूनच ठरवा.

आम्ही जे वापरले दोन स्वतंत्र केमिकल्सचे कॅन्स असतात. दोन्हीतले केमिकल एकत्र एकजीव करून मग जेथे हवे तेथे ओतायचे. हे ओतायला एक ४ फूट लांब, २ फूट रूंद आणि साधारण ४ इंच जाड अशी एक फायबर फ्रेम वापरली. त्यात पहिल्या दिवशी एक लेयर ओतली. मग दोन दिवसांनी त्यावर समुद्रातील प्राणी, झाडे, तळाची वाळू ई. लावली. त्यानंतर त्यावर दुसरी लेयर - त्यावर काही मासे/प्राणी- असे करत करत चार लेयर झाल्या. हे सगळे पूर्ण व्हायला ८-१० दिवस लागले. प्रत्येक वेळेस दोन्ही कॅन्समधली केमिकल एकजीव करताना विशिष्ठ रंगाची शाई त्यात वापरून पाण्यातील निळ्या रंगांच्या छटा तयार झाल्या.

मग प्रश्न पडला की हा देखावा उभा कसा ठेवायचा. त्यापुढे काही ठेवले तर देखाव्याच्या आड येईल. त्यामुळे मागूनच काहीतरी सपोर्ट हवा. त्यात त्यामधे स्क्रू ड्रिल करायचे नव्हते - नाहीतर टीव्ही भिंतीवर लावण्याकरता वापरतात तसे काहीतरी वापरता आले असते. आधी त्याकरता त्या फ्रेममधून हे रेझिन बाहेर काढायचा प्रयत्न केला पण ते जाम बाहेर येईना. शेवटी त्या फ्रेमसकट उभे करायचे ठरवले. मात्र त्याचा एक फायदा झाला तो म्हणजे फ्रेमसकट उभे केल्यावर ते स्वतःच्या वजनामुळे बरेच स्थिर राहिले. तरीही भिंतीच्या सपोर्टने उभे करून इतर बरेच काय काय त्यामागे लावले. मग समोर वाळू पसरून त्यावरही वाळूत असतात त्या गोष्टी ठेवल्या.

आणि त्याच्यापुढे गणपतीची मुर्ती!

वरती बॅकलाइट आल्याने हा दुसर्‍या कोनातला फोटो

IMG_9958.jpgआता फाइन प्रिंट - वैधानिक इशारा Happy हे मटेरियल वापरणार असाल तर हे नक्की वाचा.

आता इपॉक्सी रेझिन (epoxy resin) बद्दल: हे केमिकल वास्तविक फार डेंजरस असते. एकतर टॉक्सिक असते आणि नेहमीच्या तापमानाला त्याची वाफ होऊ शकते - ती नाकातून सुद्धा शरिरात जाणे फार धोकादायक असते. त्याला Volatile Organic Compounds (VOC) असे म्हणतात. अशा प्रकारचे रेझिन या कामाकरता वापरायचे नव्हते. कारण यातला कोणताच धोका पत्करायचा नव्ह्ता. त्यामुळे आधी जवळजवळ ठरवलेच होते हे नाही करायचे. पण मग विषारी नसलेले आणि VOC नसलेले एक रेझिन सापडले. त्यात खालील तीन गोष्टी कन्फर्म केल्या:
- विषारी नाही. Non-toxic
- No VOC
- घरातील वापराकरता सेफ आहे.

हे चेक केल्यावर मग हे वापरायचे ठरवले. तरीही प्रत्यक्षात ते वापरताना
हातावर ग्लोव्ज, केमिकल वापराकरता चालणारा व पूर्ण चेहरा कव्हर करणारा मास्क वापरूनच ते केले आणि घरात आत केले नाही - आमच्या मागच्या डेकवर Vinyl च्या खिडक्या लावून एक बंदिस्त रूम रूम नुकतीच बनवली होती. तेथे हे सगळे बनवले.

आम्ही जे वापरले ते अ‍ॅमेझॉनवर एक "किट" मिळते त्यातले. त्यात एक रेझिन व एक हार्डनर अशी दोन लिक्विड्स, ग्लोव्ज आणि मास्क्स, ते फिरवायचे डाव ई सगळे येते. रेझिन आणि हार्डनर ही दोन स्वतंत्र असताना द्रव अवस्थेत असतात. प्रत्यक्षात बनवताना ती दोन्ही एकत्र करतात, त्यात रंग वगैरे मिसळतात आणि मग ते साच्यामधे ओततात. ते ओतले की थोड्या वेळाने घट्ट व्हायला सुरूवात होते आणि साधारण २४ तासांत काचेसारखे टणक होते. हे काम करताना हातावर, अंगावर जर हे रेझिन आले/चिकटले, तर ते आधी आयसोप्रोपिल अल्कोहोलने घासून मग तो अल्कोहोल उडून गेला की साबणाने धुवावे लागते. बरेच किचकट काम आहे पण एका दिवशी एकदा सलग केले की ते बरे पडते.

एकदा ते टणक झाले की कोठेही ठेवायला सुरक्षित असते. मात्र नंतर त्यावर ड्रिल किंवा पॉलिश करायचे असेल तर पुन्हा घरात आत करायचे नाही, आणि ग्लोव्ह्ज, मास्क, गॉगल ई घालूनच करायचे.

तेव्हा मुळात निवडताना वरचे तीन निकष लावून निवडावे आणि त्यानंतरही पूर्ण खबरदारी घेउनच त्याचा वापर करावा.

क्लास दिसतेय. अजून एक क्लोज फोटो हवा होता. किंवा मी मोबाईलवर बघत असल्याने बारीक डिटेल नीट दिसत नसतील. लॅपटॉपवर चेक करायला हवे.
पण मेहनत आणि ती घेण्याचा उत्साह कमाल आहे. गेल्यावेळी सुद्धा काहीतरी भन्नाट केल्याचे आठवत आहे. नेमके आठवत नाही पण एका प्राचीन मंदिराची प्रतिकृती वगैरे..

खालचा केमिकल लोच्या वाचून मात्र टेन्शन आले. ज्याला यातले कळते, समज आहे त्यानेच असे पर्याय चाचपावेत.

Pages