संत तुकाराम महाराजांची दुर्लक्षीत बाजू
संत तुकाराम यांचे जीवनचरित्र आपल्या परिचयाचे आहेच. त्यांचे बुडवले अभंग इंद्रायणी डोहातून बाहेर येणे किंवा सदेह वैकुंठवास या घटना तर सर्वमान्य आहेतच. तुकारामांचे घराणे अतिशय सधन होते. मोठा चौसोफी वाडा घरात असलेली गाई, घोडे अशी जनावरे त्यामुळे येणारी सुब्बता. घरात परंपरागत चालत आलेली सावकारी होती, बाजारपेठेत मोठे दुकानं होती, अत्यंत सुपीक शेती होती आणि त्या भागाचे महाजन पदही त्यांच्याकडे होते. महाजनांनां जनतेवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी गुन्हेगारांना कैद करणे अथवा त्यांना शिक्षा करणे असे अधिकार त्यांच्याकडे होते. वंश परंपरेने हे सर्व अधिकार आणि सर्व संपत्ती तुकाराम महाराजांकडे आली होती. सुरवातिच्याकाळात त्यांनी उत्तम सावकारी व व्यापार केला. तसेच महाजन म्हणून पंचक्रोशीत असंख्य न्याय -निवाडे दिले. तुकारामांचा मोठा भाऊ सावजी याने लहानपणापासूनच संसार सुखाचा त्याग करून तो नाथ पंथीयांच्या जमावात सामील झाला होता. तुकाराम महाराजांची दोन लग्ने झाली. त्यापैकी पहिली बायको रुक्मिणी पहिल्या मुलाच्या जन्मानंतर अंथरुणाला खिळली होती. दुसरी बायको अवली तिचे घराणेही लोहगावच्या सदन कुटुंबापैकी होते. तिचे वडीलही सावकारी , व्यापारी आणि महाजनी होते. तुकाराम महाराजांना अवली पासून चार मुले झाली. त्यांना चांगले व्यापार ज्ञान होते आणि ते संसारही सुखाचा करू शकत होते. त्यांना कान्होबा नावाचा एक लहान भाऊही होता. संत तुकारामाचे अभंग सर्व परिचित आहेतच परंतु त्यांच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी आणि वृत्तीत पडलेला फरक अनाकलनीय आहे. मध्यंतरी पुणे परिसरात तीन वर्षे दुष्काळ पडला होता. त्यात गुरे आणि माणसे दगावली, कित्येक जण घरे सोडून लांबच्या गावाला राहायला गेली. तुकाराम महाराजांनी यातले काहीही न करता आपले सर्व धन हे लोकांना वाटून टाकले. इथपर्यंत ठीक होते पण नंतरच्या काळात त्यांच्या बायका मुलांना अत्यंत त्रास आणि हाल अपेष्टा भोगायला लागल्या.
तुकारामांच्या विठ्ठल भक्तीला कोणाचा विरोध नव्हता पण त्यांनी त्यांच्या बायका मुलांकडे लक्ष द्यायला हवे होते. स्वतःच्या कुटुंबाला अतिशय दुःखात ठेऊन इतरांना मदत करणे याला थोर भक्त कसे म्हणायचे?. तुकाराम महाराजांना जर विरक्ती आलेली असली तर त्यांनी संसार सुखात उडी घेण्याचे काहीच कारण नव्हते.
त्यांच्या अगोदरच्या तीनशे वर्षांपूर्वी भागवत धर्माला चालना देणारे असंख्य संत होऊन गेले. ज्ञानेश्वर माउली, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई , सावता माळी , गोरा कुंभार, संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ यांच्यापैकी बहुतेकांना श्री विठ्ठलाचा साक्षात्कार झाला होता. त्यांच्या आयुष्यातही अनेक चमत्कार घडले होते. संत नामदेवाबरोबर विठ्ठल मित्रासारखा बोलत असे. संत जनाबाई बरोबरही त्याचे रोज हितगुज चालत असे. या व त्यावेळच्या अनेक संतांनी योग्य रीतीने संसार केला आणि आपल्या बायका मुलांना दारिद्र्यात किंवा दुःखात लोटले नाही. ज्ञानेश्वर माउलींच्या भावंडानी पैठणच्या धर्माज्ञा नंतर संसाराचा त्यागच केला होता. त्यानंतरच्या कित्येक संतांनी जसे स्वामी समर्थ, समर्थ रामदास, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज, श्री अक्कलकोट स्वामी यांनी संसारसुखाचा त्यागच केलेला होता तर गोंदवलेकर महाराजांसारख्या भक्तांनी लग्न करून अतिशय सुखाने संसार केला होता.
नेसायला लुगडी नाहीत, मुलांचे कपडेही फाटलेले, गाठी मारून कशीबशी नेसलेली लुगडी, अशी अवली शेवटी आपल्या वडिलांकडे गेली. तिचे हाल पाहून तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या मुलांना थोडे कपडे दिले, चांगले जेवायला घातले आणि मिठाने भरलेली एक बैलगाडी देऊन अवलीला देहूला पाठवले. सासऱ्याला आपल्या जावयाची व्यापारातील कर्तबगारी आणि हुशारी माहिती होती. त्यांनी तुकाराम महाराजांना निरोप पाठवला की हे मीठ या गावातून विकले जाईल आणि उत्तम पैसे मिळतील. तुकाराम महाराजांनी सर्व ठिकाणी हिंडून ते मीठ विकले आणि त्यात त्यांना अडीचशे रुपयांचा फायदा झाला. तेवढ्या पैशात पाच सहा महिनेतरी घर चांगले चालले असते. परत येताना एका गरिबाने मदतीची याचना केल्यावर त्यांनी त्याला ते अडीचशे रुपये देऊन टाकले. घरी परत आले ते रिकाम्या हातानेच.
तामिळ तिरुवल्लीवर या संतांपासून ते काली घाटच्या परमहंसांपर्यंत सर्वानाच देवांचे सख्यत्व लाभले होते. या सर्व संतांनी अभंग किंवा भक्तिपर काव्य रचना केल्या होत्या. तुकारामांनी कितीही देव मिळवला असेल किंवा काही लोकांनी त्यांचे गुणगौरव गायले असतील परंतु त्यांनी स्वतःच्या बायकोला आणि मुलाबाळांना घरोघरी भीक मागायला पाठवले हे ही सत्यच आहे. त्यांच्या कित्येक कृती त्यांच्या व्यापारी धोरणाच्या आणि कुटूंबाच्या हिताच्या विरुद्ध होत्या. त्यांचे दुकान , सावकारी हे जरी त्यांनी व्यवस्थित सांभाळली असती किंवा सर्व कामे आपला छोटा भाऊ कान्होबा याला देऊन टाकली असती तर त्यांच्या कुटुंबावर अशी वेळ आली नसती. घरात मुलांना चतकोर भाकरी देऊ न शकणारे तुकाराम, इतरांच्या बाबतीत फारच सढळ हाताने मदत करत असत. एकदा शिवाशी महाराज आपल्या शंभर घोडेस्वारांसकट आळंदीला दर्शन घेण्यासाठी गेले. थोड्याच वेळात तेथे तुकाराम महाराजांचे गावकऱ्यांसोबत आगमन झाले. शिवाजी महाराजांना काही उपदेश केल्यावर शिवाजी महाराजांनी निघायची परवानगी मागितली. तुकाराम महाराजांनी त्यांना जेवून जा असे सांगितले. शिवाजी महाराज म्हणाले ते एकटे नाहीत त्यांच्याबरोबरशंभर स्वार आहेत. तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितले कि तुम्ही काळजी करू नका आणि काही वेळातच त्यांनी आळंदीच्या देवळाच्या ओसरीत सर्व स्वरांना भाजी भाकरी देण्याची व्यवस्था केली. असे करू शकणारे तुकोबा स्वतःच्या संसाराबद्दल पोराबाळांना खाऊ घालू शकत नव्हते हे आश्चर्यच म्हणावे लागेल. दुकानातील माल लोकांना फुकट वाटणे किंवा कर्जाचे हप्ते आणि त्यावरील व्याज वसूल न करणे यामुळे आयुष्याच्या शेवटी बायको मुलांना आणि धाकट्या भावाला अतिशय त्रास सहन करावा लागला. लोकांकडून घेतलेले कर्जरोखे एकदिवस त्यांनी गोळा केले आणि इंद्रायणीत टाकून दिले. हाच व्यापार आणि सावकारी त्यांनी आपला छोटा भाऊ कान्होबा याला सुपूर्त केली असती तर त्यांचे कुटुंब अतिशय सुखात राहिले असते.
बहुतेक लोकांनी त्याच्याकडे पैसे असताना त्यांना लुटले. आपल्या निष्काळीपणामुळे आपल्या बायकामुलांनचे हाल होत आहेत हे त्यांना लोकांच्या स्थितीपुढे कधी कळलेच नाही.
संत तुकाराम अतिशय मोठे भक्त होते त्यांनी रचलेले अभंग अतिशय सुश्राव्य आणि काव्यमधुर आहेत.
तीनशे वर्षांपूर्वी झालेल्या ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या पसायदानात 'जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें' याचा अर्थ दुर्जनांनी आपली मनोवृत्ती बदलावी आणि सृजन विचार करून एकमेकात मैत्री वाढवावी असा होतो. याच विषयावर व्यवहारी असणाऱ्या तुकाराम महाराजांनी तीनशे वर्षेनंतर खालील ओळी लिहलेल्या आहेत.
मऊ मेणाहूनही आम्ही विष्णुदास
कठिण वज्रास भेदूं ऐसे
भलेतर देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथी हाणू काठी
थोडक्यात त्यांनी, चुकणारा माणूस फक्त विचारांनी बदलणार नाही तर त्याला डोक्यात काठी मारूनच सरळ केले पाहिजे असे लिहले आहे. दुर्दैवाने त्यांना कोणीही गुरुस्थानी नव्हते . निवृत्तीनाथांना गहिनी नाथांनी गुरु उपदेश केला होता तर निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना तर ज्ञानदेवांनी सोपानदेवाला गुरु उपदेश केला होता. संतांची मांदियाळी म्हटलेल्या पंढरीत , मुक्ताईने विठ्ठलाचा सखा असणाऱ्या नामदेवाचे मडके कच्चेच आहे असे म्हंटले तर रागावलेले नामदेव विठ्ठलाकडे गेले आणि हा प्रकार सांगितला , विठ्ठल त्याला म्हणाले तुला गुरु उपदेशाची आवश्यकता आहे आणि त्यांना विसोबा खेचरकडे उपदेशसाठी पाठवले. त्यानंतर नामदेवाच्या वृत्तीत फारच फरक पडला.
शेवटी असे वाटते कि विठ्ठलाने महाकवी तुकोबारायांना एखादा गुरु द्यायला हवा होता. किंवा गुरु-शिष्य परंपरेनुसार गुरु निवृत्तिनाथ मानले जातात. त्यांनी तरी आपल्या शिष्याला थोडे समजावून सांगायला हवे होते.
संत तुकाराम महाराजांची दुर्लक्षीत बाजू
Submitted by अविनाश जोशी on 15 August, 2025 - 08:10
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला हे अगदी लहानपणापासून वाटत
मला हे अगदी लहानपणापासून वाटत आलेले आहे. मुलं जन्माला घालून त्यांची पुढे वाताहात करणाऱ्या पालकांचा आदर करणे मला अवघड जातं. अर्थात तुकारामांचे अभंग आणि अध्यात्मिक उंची वादातीतच आहे परंतु ही बाजू देखील सत्यच आहे. तुम्ही अतिशय संयत पणे हा लेख लिहिला आहे .
शिरीन +१
शिरीन +१
भयंकर आहे.
भयंकर आहे.
आजच्या परिस्थितीत आपण कसं
आजच्या परिस्थितीत आपण कसं आकलन करतो हे आजच्या काळाशी सुसंगत आहे. काही गोष्टी त्या वेळच्या फ्रेममधे जाऊन पाहता यायला हव्यात. देवच्या भक्तीचं वेड कसं आलं, समाजात ते कुठपर्यंत झिरपलेलं होतं याची कल्पना नाही. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडीलांनीही संन्यास घेतला होता. पण नंतर ते संसारात परतले म्हणून त्यांच्यावर बहीष्कार टाकला गेला होता. गोरा कुंभाराच्या पायाखाली त्याचं मूल आलं तरी त्याला भान नव्हतं.
अध्यात्म, भक्तीमार्ग याची सुद्धा नशा असू शकते. ज्या काळात मनोरंजन, ज्ञानशाखा यांचे अस्तित्व अगदीच शून्यवत होते त्या काळात कदाचित भक्तीमार्गाला प्रतिष्ठा असू शकेल.
आजच्या काळाच्या चष्म्याने केलेले विश्लेषण योग्यच पण त्या काळच्या रीती माहिती नसल्याने अशा ऐतिहासिक व्यक्तिरेखांना जज्ज करता येत नाही असे वाटते. चुभूद्याघ्या.
लेखातच आलेय की दुष्काळ
लेखातच आलेय की दुष्काळ पडायच्या आधी ते सधन होते, लग्ने झाली होती, मुले झाली होती. तेव्हा ते देवभक्तीकडे वळल्याचे किंवा अभंग लिहित असल्याचे उल्लेख नाही.
तिन वर्षे दुष्काळ हा खुप मोठा काळ आहे, तिसर्या वर्षात असताना येणारे चौथे वर्षही दुष्काळात जाणार की कसे हे माहित नसते. नंतर डेटा गोळा करणारा लिहितो की तिन वर्षे दुष्काळ पडला. या काळात इतर बहुसंख्यांप्रमाणे तुकारामांच्या संसाराची वाताहत झाली व गरिबी आली असे वाचलेय. टोकाची परिस्थिती स्वभावात टोकाचा बदल करु शकते. आधी व्यापार उदीम करणारे तुकाराम दुष्काळातील भयंकर अनुभवाने निरिच्छ व उदासिन झाले असावेत. आयुष्यात पहिल्यांदाच वृद्धत्व, मृत्यु इत्यादी पाहणारा राजकुमार सिद्धार्थ त्या अनुभवाने पुर्ण बदलुन गेला असे इतिहास म्हणतोच ना.
तुकारामांना वेदांचे ज्ञान होते हे अभंगांवरुन कळते. तिथलेच ज्ञान त्यांच्या अभंगातुन परत प्रत्ययास येते. दुष्काळाने सगळ्या समाजावरच परिणाम केला असणार. गांजलेल्या, परिस्थितीमुळे स्वार्थी बनलेल्या समाजाला उद्देशुन त्यांनी अभंग लिहिले, स्वतःला देवभक्तीत बुडवले. संसार तर सगळेच करतात पण सगळे तुकोबा होत नाहीत. अशा एखाद्या अलौकिक माणसाच्या हातुन जे काम होतेय त्याकडे पाहुन त्याच्या हातुन इतर हजारो जे सहज करतात ते होऊ शकले नाही याबद्दल आपण माफ करु शकतोच ना?
संत एकनाथांनी संसार केला आणि सोबत देवभक्ती केली, समाजप्रबोधन केले. तुकारामांना दोन्ही गोष्टी एकत्र नाही जमल्या. बिचार्या आवलीने त्यांचा संसार कसातरी ओढला.
पंढरीचे भूत मोठे | आल्या
पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे ||
बहू खेचरीच रान | बघ हे वेडे होय मन ||
तेथे जाऊ नका कोणी | गेले नाही आले परतोनी ||
तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला ||
साधना, रानबुली, सहमत. अगदी
साधना, रानबुली, सहमत. अगदी हेच लिहावेसे वाटले. त्यावेळचे दुसरे सावकार मंबाजी गोसावी यांनीही त्यांना खुप त्रास दिला आहे. त्यांच्या जमिनी हडपल्या त्या त्यांची मुले मोठी झाल्यावर देहूत येऊन त्यांनी परत मिळवल्याचे वाचले आहे. तुकारामांच्या निर्वाणा नंतर संपूर्ण कुटुंबाने देहू सोडले. म्हणजे किती त्रास असेल याची कल्पनाच केलेली बरी.
लोक स्वार्थी असतात. समाजानेच त्यांना जगू दिले नसणार असे मला राहून राहून वाटते.संत ज्ञानेश्वरांना नाही इतकी लहान भावंडे पण कुणालाही त्यांच्या बाजूने ठामपणे उभे रहावेसे वाटले नाही. अगदी पैठणच्या धर्मसत्तेलाही. तसेच संत तुकाराम आणि कुटुंबियांचे झाले असणार. त्यात त्यांची संसारातून निवृत्ती झाली असल्याने अजूनच कठिण. दुष्काळ आणि सामाजिक त्रास यामुळे एकदम टोकाचा बदल होऊ शकतो.
अर्थात हे माझ्रे मत आहे. चूक भूल द्यावी घ्यावी..
लंपन एकदम थोडक्यात आणि नेमके
दुर्लक्षीत = दुर्लक्षित
दुर्लक्षीत = दुर्लक्षित
इंद्रायणी डोहातून = इंद्रायणीच्या डोहातून
बुडवले अभंग = बुडवलेले अभंग
चौसोफी =चौसोपी वाडा (वाड्याच्या चार दिशांना लांबच्या लांब चार सोपे (ओवऱ्या), मध्ये खोल्या, नंतर पडव्या आणि शेवटी मधोमध प्रशस्त अंगण असे. यामुळे या वास्तुरचनेला चौसोपी (चार सोपे असलेले) असे म्हणतात. : संदर्भ : विकिपीडिया)
सुब्बता = सुबत्ता
महाजनांनां = महाजनांना
नाथ पंथीयांच्या जमावात = ?
अवली = तिचे नांव आवली असे आहे नं?
शिवाशी महाराज = ?
स्वरांना भाजी भाकरी देण्याची व्यवस्था = ? 'स्वारांना?
बाकी हे संत महात्मे असे कां वागले हे कुणा एका समर्थ गुरुशिवाय कळणे अशक्य...!
अत्यंत चुकीचे विश्लेषण आहे.
अत्यंत चुकीचे विश्लेषण आहे. तुकारामांची भक्ती ही बेजबाबदार आणि आंधळी अशी नसून ती विवेकनिष्ठ आणि सामाजिक न्यायाच्या तत्व आणि ध्येयावर आधारलेली होती. ह्यावर अधिक माहितीसाठी हे पहा straight from the horse's mouth https://youtu.be/S2pK1mTMqdE?si=ccpcbk1hsFUOwCog . बहुजनांच्या नायकांचा एकतर छळ/कपटाने पराभव करणे (उदा. बळी https://youtu.be/3tkS6NfPWAE?si=MrlGxPgmq9aXZO7G), त्यांना बदनाम करणे (उदा. चार्वाक, तुकाराम) किंवा तसे करणे न जमल्यास त्यांना appropriate करणे (उदा. बुद्ध, कृष्ण https://youtu.be/clOfwlSvlpI?si=U-LdJZfJePuBGoQc) अशी इथली जुनी परंपरा आहे याचे भान असू द्या. तिचे उत्तराधिकारी होऊ नका ही विनंती.
<संत तुकाराम यांचे जीवनचरित्र
{ त्यांचे बुडवले अभंग इंद्रायणी डोहातून बाहेर येणे किंवा सदेह वैकुंठवास या घटना तर सर्वमान्य आहेतच.> बॉरं.
यात काय दुर्लक्षित आहे? हे तर
यात काय दुर्लक्षित आहे? हे तर सगळ्यांना माहितीच आहे. अनेक वेळा त्याची चर्चा होते. नाटकं-सिनेमे निघालेत.
लिहायचंच झालं तर सत्यसाईबाबांची दुर्लक्षित बाजू, गांधींची दुर्लक्षित बाजू, विवेकानंदांची दुर्लक्षित बाजू, हिंजवडीआयटीची दुर्लक्षित बाजू- असे असंख्य लेख लिहिता येतील. कुणाला काय दुर्लक्षित वाटतं- हा मुख्य विषय. इतर अनेक गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं- हेही आहेच आहे.
विठ्ठलाने महाकवी तुकोबारायांना एखादा गुरु द्यायला हवा होता
>>>
अॅलॉटमेंट संपली असेल- एवढं एकच उत्तर संभवतं. नाहीतर साक्षात विठ्ठल असं दुर्लक्ष कसा करेल?
*हे तर सगळ्यांना माहितीच आहे.
*हे तर सगळ्यांना माहितीच आहे. * - +१ !
अगणित समाजसुधारकांच्या, स्वातंत्र्यसैनिकांच्या, ध्येयासक्त व कलासक्त माणसांच्या घरची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच असते पण तो त्यांचा बेजबाबदारपणा म्हणणं त्यांच्या व्यापक कामाचा अवमान करण्यासारखं आहे. कुटुंबासाठी तें निश्चितच खूप त्रासदायक असलं तरीही तें अपरिहार्य म्हणता येईल पण दोषपूर्ण म्हणणं अन्यायकारक होईल, असं मला वाटतं !
मागे एकदा. मी गौतम
मागे एकदा. मी गौतम बुद्धांच्या संसार परित्यागाबद्दल लिहीलेले होते की - आयुष्यभर नको असलेला संसार करुन स्वतःवर अन्याय करण्याऐवजी त्यांनी घराचा, संसाराचा परित्याग केला जे की योग्यच केले.
पण आता तेच विधान मला आत्मविश्वासाने करता येत नाहीये. एकदा कमिट केल्यानंतर, निर्णयाचा पुनर्विचारच नाही तर संपूर्ण निर्णय टाळून, यशोधरा, राहुल यांच्यावरती अन्याय करणे समंजसपणा होता का?
स्वतःवर अन्याय करत रहायचा की आपल्या कुटुंबियांवरती अन्याय करायचा?
मला उत्तर माहीत नाही.
पण आपली बुद्धी, विचारक्षमता, आपला परीघ फार संकुचित असतो
--------------------------------------------------------
तुकाराम महाराजांबद्दलही तसेच काहीसे वाटते.
ठाम उत्तर देता येत नाही.
आजच्या परिस्थितीत आपण कसं
आजच्या परिस्थितीत आपण कसं आकलन करतो हे आजच्या काळाशी सुसंगत आहे. काही गोष्टी त्या वेळच्या फ्रेममधे जाऊन पाहता यायला हव्यात. >> +१
स्वतःवर अन्याय करत रहायचा की
स्वतःवर अन्याय करत रहायचा की आपल्या कुटुंबियांवरती अन्याय करायचा?>>>>>>
नको असताना, मन दुसरीकडे ओढ घेत असताना शरिराने त्याच संसारात राहणे हे सगळ्यांवर अन्यायकारक. आणि काही कॉलिंग्स इतक्या तीव्र असतात की त्यांना टाळणे अशक्य. गौतमाचा विचार केला तर तो राजा होणार होता. राजाला त्याचे राज्य व जनता जास्त महत्वाचे असतात. कुटुंब ही टॉप मोस्ट प्रञोरिटी नसते. गौतमाने पुढे जे केले ते राज्य व जनतेसाठी फायद्याचे ठरले.
>>यात काय दुर्लक्षित आहे? हे
>>यात काय दुर्लक्षित आहे? हे तर सगळ्यांना माहितीच आहे. अनेक वेळा त्याची चर्चा होते. नाटकं-सिनेमे निघालेत.>> + १
>>आजच्या परिस्थितीत आपण कसं आकलन करतो हे आजच्या काळाशी सुसंगत आहे. काही गोष्टी त्या वेळच्या फ्रेममधे जाऊन पाहता यायला हव्यात. >> +१
या व्यतिरिक्त जे काही लिहिलं ते सर्वच तसेच घडले असे नाही. जशी लेखातच काही उदाहरणे आहेत - बुडालेले अभंग हानी न पोचता परत वर येणे, सदेह वैकुंठास जाणे - यावरून संतांच्या चरित्रात कपोलकल्पित गोष्टी सुद्धा असतात, अतिशयोक्ती असते हे दिसुन येते.
महाभारतावर - देव असुन खांडववन कसे जाळले, एकाही पक्षी प्राण्याला जिवंत सोडले नाही, काय हे भीषण हत्याकांड, याची काय गरज होती?(दोघांनी एवढे मोठे खांडववन जाळून बाहेर पडणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यापासुन उडणाऱ्या पक्षांना वेचून मारणे शक्य नाही)- यावर लिखाण, चर्चा होते ती केवळ साहित्यिक अध्ययन हेतु लिखाण मानले पाहिजे. तसेच हे सुद्धा. ते खरेच तसेच घडले असे मानुन त्या पात्रांना / व्यक्तींना दोष देणे, दुसऱ्यांवर अन्याय झाला म्हणुन हळहळणे याला अर्थ नाही.
ग्रोक ने खूप छान उत्तरं दिली
ग्रोक ने खूप छान उत्तरं दिली आहेत ती माझ्यापुरती पुरेशी आहेत. जिज्ञासूंनी ग्रोकला विचारून पहावे.
तुकारामांसारख्या सधन
तुकारामांसारख्या सधन माणसाचाही तेव्हा किती छळ व्हायचा! कशामुळे?
लेख चांगला आहे. संताबद्दल
लेख चांगला आहे. संताबद्दल छोट्या छोट्या कथा आणि लहानपणी पाहिलेले चित्रपट यातून जे समजले तितकेच माहीत आहे. फार अभ्यास नाही.
दुर्दैवाने संतांच्या नावावर चमत्कारच फार खपवले गेले आहेत. कोणाची श्रद्धा दुखवायची नाही पण माझा त्यावर विश्वास नसल्याने मग त्या संदर्भाने येणाऱ्या संताचे चरित्र तितक्या गंभीरपणे वाचले, अभ्यासले जात नाही हे सुद्धा यामागे कारण असेल.
तसेच संत आणि समाजसुधारक असणे या स्वतंत्र गोष्टी वाटतात. म्हणजे एखादे संत हे समाजसुधारक देखील असू शकतात किंवा तितके नसू शकतात. पण माणुसकी जपणारे असतात म्हणू शकतो.
समाजसुधारकाबाबत त्यांच्या विचारांवर चर्चा करणे योग्य वाटते. पण तेच संतांबाबत त्यांची देवभक्ती आधी येते आणि बरेच ठोकताळे बदलतात.
गाडगे महाराजाना समाजसुधारक न म्हणता संत का म्हणतात हे मात्र समजत नाही. कीर्तन करायचे म्हणून संत का?
यावर कोणी वेगळा धागा काढू शकेल का? त्यांच्याबद्दल विकी पलीकडे जाणून घेण्यात फार रस आहे.. अन्यथा मीच काढतो एखादा.
साजिरा +१
साजिरा +१
तुकाराम माणूस होते माणसासारखे जगले असतील. उगा मर्यादापुरुषोत्तमगिरी करण्याच्या फंदात पडले नाही. आदर्श न जगता चुकत माकत जगत आकाशाएवढी झालेली माणसं आवडतात.
चेराज यांची पोस्ट मघाशी
चेराज यांची पोस्ट मघाशी पाहिली. ( काही पोस्ट्स मला लगेच दिसत नाहीत. रिफेश केल्यावर किंवा लॉगआउट - लॉगिन केल्यावर दिसतात).
आ ह साळुंखे यांचे संत तुकारामांबद्दलचे भाषण थोडे पाहिले. पूर्ण पहायला सध्या जमणार नाही. पण दिशा लक्षात आली.
वर बुद्धाबद्दल पण हाच मुद्दा आला. तो ही पटला. पण आ ह म्हणतात तसे बघायला ग्रोकची मदत घेतली. तुकारामांबद्दल आह यांनी मत मांडलेच आहे. त्यांच्या मांडणीवर विश्वास आहे.
ग्रोक ने जी माहिती दिली त्यानुसार बुद्धाच्या चरित्रातले प्रक्षेप दूर करून पाहिले तर चार आर्यसत्ये हे मिथक आहे. तसेच संन्यास तिरिमिरीत घेणे हे सुद्धा. २४ कि २९ व्या वर्षापर्यंत आजारी माणूस, मृत्यू यांची माहिती नाही हे लॉजिकल नाही.
ग्रोकच्या म्हणण्यानुसार शाक्य संघाचा राजा हे शाक्य ठरवत. आताचा शुद्धोधन हा शाक्यांनी निवडलेला राजा होता. जर त्याच्याबद्दल अविश्वास निर्माण झला तर त्याला राजेपदावरून दूर करण्याची ताकद शाक्यसंघात होती.
उत्तरेत अनेक नद्या प्रवाह बदलून वाहतात. शाक्य आणि कोलिय या दोन राज्यातून रोहिणी नदी वाहत असे. राज्यांच्या सीमा नदीच्या पात्राप्रमाणे असणे हे नवीन नाही. पण जेव्हां नदी शाक्यांच्या प्रदेशातून वाहत असे तेव्हां ते कोलियांना पाणी नाकारत तर कोलिय पुढच्या वर्षी तसेच करत.
यावरून युद्धाचप्रसंअंग उद्भवला.
त्या सभेत जे युद्धात भाग घेणार नाहीत किंवा विरोध करतील त्यांना परिवारासहीत राज्य सोडून जावे लागेल असा आदेश निघाला. पण नेमका राजपुत्र सिद्धार्थाने विरोध केला. त्याने या समस्येचा युद्ध हा इलाज नाही असे सांगितले. दोन्ही राज्यांनी बसून चर्चा केली पाहीजे असे मत मांडले. त्याला हे मत मागे घे नाहीतर परिवाराला घर सोडून जावे लागेल असे सांगितले गेले.
शुद्धोधनाने सुद्धा मन वळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हां सिद्धार्थाने चुकीची बाजू घेण्यापेक्षा मी राज्य सोडून जाईन म्हणजे परिवाराबद्दल असंतोष राहणार नाही असा तोडगा काढला. त्याने यशोधरेशी चर्चा केली. तिनेही याला संमती दर्शवली.
फॅक्ट चेक करता येईल पण लॉजिकल वाटले. पत्नी आणि मुलगा राजघराण्यासोबतच राहणार असल्याने त्यांच्यावर संकट कोसळत नाही तसेच या निर्णयाने येऊ घातलेले संकट टळले.
त्या काळाच्या मानाने नंतर केलेले काम, विचार हे जास्त महत्वाचे आहे. हा आक्षेप महत्वाचा असला तरी खुसपट काढल्यासारखा वाटतो.
हा ग्रोक कोण आहे? तो का व
हा ग्रोक कोण आहे? तो का व कितपत विश्वासार्ह आहे?
ग्रोक ए आय आहे. तो
ग्रोक ए आय आहे. तो संदर्भासहीत उत्तर देतो. आपल्याकडे वेळ असेल तर संदर्भ पडताळून पाहता येतात.
*समाजसुधारकाबाबत त्यांच्या
*समाजसुधारकाबाबत त्यांच्या विचारांवर चर्चा करणे योग्य वाटते. पण तेच संतांबाबत त्यांची देवभक्ती आधी येते आणि बरेच ठोकताळे बदलतात.* - बहुतेक सर्व संतांनी कसं वागावं व जगावं यावर भर दिलाच आहे, अनिष्ट प्रथांवर टीकाही केली आहे ( उदा. एकनाथांचं भारुड ). देवभक्तीचा आधार हा समाजसेवेसाठी त्या काळात अत्यावश्यकच असणं तर्कशुद्ध वाटतं. ओव्या, अभंग, भारुडं हीच लोकांपर्यंत पोहचण्याची माध्यमं तेंव्हा उपलब्ध होती. तुकोबा नुसतेच देवभक्त नव्हते, ते विचारवंत व प्रतिभाशाली कवीही होते. (गुरुदेव रानडेंसारखा विद्वान त्यांच्या संत साहित्याची तुलना शेक्सपियरच्या लिखणाशी करू पाहतो, यात सर्व आलं !) थोडक्यात, देवभक्ती वगळूनही संतांचं महात्म्य उरतंच !
कुठल्या गोष्टीतून काय बोध
कुठल्या गोष्टीतून काय बोध घ्यायचा हे हे जो तो ठरवतो.
बायकोमुलांची पर्वा न करता स्वतःला बरे वटावं म्हणून इतर काही दुष्कर्मे करणार्यांच्या अनेक गोष्टी आहेत,. त्यातून तसे करू नये हा बोध घ्यायचा असतो. मी तुकारामांची भक्ति, त्यांचे अभंग इकडे जास्त लक्ष देतो.
काही लोकांना सुंदर कमळ दिसते, काही लोकांना नुसता चिखल दिसतो.
शहाणा कोण नि वेडा कोण हे कुणि सांगावे?
>>>>शहाणा कोण नि वेडा कोण हे
>>>>शहाणा कोण नि वेडा कोण हे कुणि सांगावे?
आवली चे आई-वडील व स्वतः आवली सांगू शकेल असे वाटते.
देवभक्तीचा आधार हा
देवभक्तीचा आधार हा समाजसेवेसाठी त्या काळात अत्यावश्यकच असणं तर्कशुद्ध वाटतं.
>>>>
भाऊ मी समाजसेवा नाही तर समाजसुधारणा म्हणालो आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असे मला वाटते.
जिथे समाजसुधारणेसाठी देवभक्तीचा आधार घेतला असे असेल तिथे आपल्याशी सहमत आहे.
पण जिथे आधी देवभक्ती असेल आणि त्यासोबत सहृदयता, माणुसकी देखील असेल तिथे समाजसेवा होईल पण विचार समाजसुधारक असतीलच याची खात्री नाही.
अर्थात ते तसे असावे हा माझा हट्ट मुळीच नाही. किंबहुना हाच माझा मुद्दा आहे की हे सगळे पैलू वेगवेगळे आहेत, आणि त्यांना स्वतंत्रच बघावे.
कुठल्याही व्यक्तीतील इतर सर्व चांगल्या गोष्टी सोडून काही वाईट गोष्टी वेचून त्यावर त्याचे मूल्यमापन करणे किंवा चर्चा करणे हे योग्य वाटत नाही. पण मनुष्य स्वभावामुळे ते तसे होते. कधी हे गॉसिप लेव्हलला राहते तर कधी ट्रोलिंग लेव्हलला जाते. मग ती व्यक्ती संत असो की समाजसुधारक असो की कुठलीही सेलिब्रिटी असो.. हे कोणाला चुकले नाही
ऋनम्या, शेवटच्या परिच्छेदात
ऋनम्या, शेवटच्या परिच्छेदात गाडी नेहेमीच्या रुळावर जाते का काय वाटलं पण आवरलंस ते बरं केलस
<<आवली चे आई-वडील व स्वतः
<<आवली चे आई-वडील व स्वतः आवली सांगू शकेल असे वाटते.>>
खुद्दा आवलीचे तुकारामावर प्रेमच होते हो. पायात काटे बोचत असताना, तुकारामांचे जेवण घेऊन भर उन्हात डोंगर चढून ती जात होती. ती काय उगाच?
आवली चे आई-वडील व स्वतः आवली
आवली चे आई-वडील व स्वतः आवली सांगू शकेल असे वाटते. >>>> hope this helps... it's highly illogical, comparing apples and oranges... 👇
"या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी। यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः।।"
https://youtube.com/shorts/P1p1KaYBAFE?feature=shared
Pages