लेखन उपक्रम : एक क्षण अभिमानाचा

Submitted by संयोजक on 11 August, 2025 - 06:22

ह्या अमर्याद विश्वाच्या पसार्‍यात असंख्य आकाशगंगा, सूर्यमालिका, ग्रह आणि तारे.
त्यातल्याच एका छोट्याश्या ग्रहावरच्या अनेक प्राण्यांमधला एक मनुष्य प्राणी. लाखो वर्षांपासून अंदाजे ११७ अब्ज मनुष्यांनी या पृथ्वीतलावर जन्म घेतला असावा असा अंदाज आहे. या काळाच्या अमर्याद पसार्‍यात, प्रत्येक जण आपापले आयुष्य समरसून जगतो, आपल्याला नशिबाने मिळालेले सुखदु:ख उपभोगतो. जे नशिबाने मिळाले त्यात आपले कर्तृत्व गाजवायचा, काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो. सगळ्यांनाच समान संधी मिळतेच असे नाही, पण कधी मिळालेल्या संधीचे सोने करतो किंवा स्वकर्तृत्वाने एखादी संधी ओढून आणतो. आपल्या मेहनतीने, हुशारीने, कर्तबगारीने स्वतःला व आप्तजनांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करतो.

कधी या कामगिरीचे कौतुक होते, त्याला ओळख मिळते, पाठीवर कौतुकाची थाप पडते, आपले नाव होते. तर कधी आपले ते कर्तृत्व कोणाच्या लक्षातही येत नाही. पण काही झाले तरी आपल्या मनातील त्या कर्तबगारीचे स्थान कमी होत नाही. किती सामान्य माणूस असो त्याच्या आयुष्यात एक तरी क्षण असतोच की त्याला स्वतःचा वा आपल्या आप्तजनांच्या कामगिरीचा अभिमान वाटतो.

आपल्या आयुष्यातील या असेच छोठे मोठे अभिमानाचे क्षण सर्वांसोबत वाटून घेऊ.

तुम्हाला हवे असेल तर वेगळा धागा काढून तुमचे असे क्षण लिहू शकता किंवा याच धाग्यावर प्रतिसादात लिहू शकता.

हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.

नियमावली :
१) लेखन कोठेही पूर्वप्रकाशीत नसावे.
२) लेखनासाठी शब्द मर्यादा नाही.
३) धाग्याचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"एक क्षण अभिमानाचा- {तुमचे नाव / मायबोली आयडी}"
४) प्रत्येक धाग्याला "मायबोली गणेशोत्सव २०२५" अशी शब्दखूण द्यावी
५)प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
६) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
७) ‘मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
८)याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत...
>>>>>>

मुदत वाढवता येईल का?
काय लिहू आणि काय नको असे झालेय Wink

असा क्षण आठवत नाही. माबुदो.

फक्त एकदा स्वतःचा अभिमान वाटलेला स्मरतो. तो लिहीण्याइतके मटिरीअल नाही म्हणुन इथे लिहीते - लहानपणी रस्त्यावरुन जातेवेळी आई-बाबा, रस्त्याच्या बाजूस रहात आणि आम्हा मुलांना सुरक्षित बाजूस म्हणजे कर्ब/ फुटपाथच्या बाजूस ठेवत.
टेक्सासला आई बाबा आले होते त्या वेळी मी त्यांना कडेला ठेउन स्वतः ट्राफिकच्या बाजूस चालत असे. तेव्हा बाबा म्हणालेले - जे आम्ही लहानपणी तुम्हाला सांभाळताना केलं ते तुम्ही करताय Happy
मला स्वतःचा तेव्हा फक्त अभिमान वाटलेला स्मरतो.

>>>>>वा आपल्या आप्तजनांच्या कामगिरीचा अभिमान वाटतो.
अरेच्या ही गुप्त कळही आहे का. मग उघडता येइल खजिन्याचा दरवाजा Happy
आपल्या आप्तजनांच्या अभिमानाचा किस्सा चालेल म्हणतायत बहुतेक (?)

मी त्यांना कडेला ठेउन स्वतः ट्राफिकच्या बाजूस चालत असे. तेव्हा बाबा म्हणालेले - जे आम्ही लहानपणी तुम्हाला सांभाळताना केलं ते तुम्ही करताय >>> Happy
विरुद्ध पालकत्व ..

ह्या अमर्याद विश्वाच्या पसार्‍यात असंख्य आकाशगंगा, सूर्यमालिका, ग्रह आणि तारे.
त्यातल्याच एका छोट्याश्या ग्रहावरच्या अनेक प्राण्यांमधला एक मनुष्य प्राणी. लाखो वर्षांपासून अंदाजे ११७ अब्ज मनुष्यांनी या पृथ्वीतलावर जन्म घेतला असावा असा अंदाज आहे. या काळाच्या अमर्याद पसार्‍यात >>> हे वाचल्यानंतर..

अभिमान गळून पडला तो क्षण.

पृथ्वीतलावर जन्म घेतला असावा असा अंदाज आहे. या काळाच्या अमर्याद पसार्‍यात >>> हे वाचल्यानंतर..

अभिमान गळून पडला तो क्षण.>>> Lol

मुदत वाढवता येईल का?
काय लिहू आणि काय नको असे झालेय. >>> Biggrin

अभिमान गळून पडला तो क्षण. >>> Lol

. किती सामान्य माणूस असो त्याच्या आयुष्यात एक तरी क्षण असतोच की त्याला स्वतःचा वा आपल्या आप्तजनांच्या कामगिरीचा अभिमान वाटतो. आपल्या आयुष्यातील या असेच छोठे मोठे अभिमानाचे क्षण सर्वांसोबत वाटून घेऊ.

फक्त आपल्याच नाही तर आपल्या आप्तांच्या कामगिरीचा आपल्याला अभिमान वाटला असेल तर ते ही लिहायचे आहे.

एक असाच प्रसंग आठवला. एक ओळखीच्यातले महिला मंडळ ( सर्व जणी सत्तर वयाच्या पुढे) डोंबिवलीहून सोलापूरला जाणार होते भजनी कार्यक्रमाला. कुणाच्या एकीच्या नातीने सिद्धेश्र्वर एक्स्प्रेसची तिकीटे काढून दिली होती. डोंबिवली - कल्याण जाऊन गाडी पकडायला त्रास पडेल पटकन म्हणून सीएसटीम मुंबईची तिकीटे काढलेली. तिथे शांतपणे लवकर जाऊन गाडीत बसता येईल. लवकरच जाणार होत्या. मला उगाचच वाटले की गाडीचं शेड्यूल चेक करावं. मी संध्याकाळी पाहिलं NTES app वर. तर ती गाडी त्या दिवशी रद्द केली होती. ( बदलापूर / ठाकुर्ली कुठेतरी पुलाचं काम करण्यासाठी नऊ नंतरच्या गाड्या रद्द केलेल्या. नऊची सोलापूर एक्सप्रेस मात्र जाणार होती. )त्यादिवशी गुरुवार होता तरीही रेल्वेने ब्लॉक घेतलेला. मी त्यांना कळवलं की गाडी रद्द आहे. रीफंड पूर्ण मिळाला पण तिकडे सीएसटीम मुंबईला जायची धडपड वाचली सर्वांची.