पुणे मेट्रो मधे पण आरे झाड तोडी सारखे प्रकरण

Submitted by स्वरुपसुमित on 7 August, 2025 - 12:11

जेव्हा मुम्बै मेट्रो बनवत होते तेव्हा आरे कार शेड प्रकरण चांगलेच गाजले होते
आता निगडी मधे झाडे तोडन्या वरुन वाद सुरु झाले आहे

संबन्धीत कात्रण

image

Group content visibility: 
Use group defaults

आसाम मध्ये गेलो होतो. तेथील उंच डोंगरावर खुरटी चहाची झू डपे असलेले मळे पाहिले.
एवढ्या उंची वर चहाचे मळे लावण्याआधी किती उंच उंच झाडे असलेली जंगले असतील याची कल्पना केली.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना कोणीच कसे काही बोलले नाही?
त्यामुळे आता चहा बंद

वृक्षतोडीला विरोध करायला जाताना दहादा विचार करा. आता जनसुरक्षा कायदा आलाय आणि तो विकासकामाच्या आड येणार्‍यांना लावू असं सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचं वक्तव्य वाचलं आहे.

कशाला हवीत झाडं? उंच टॉवर , रस्ते, महामार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन ह्या सगळ्या विकासाच्या सुंदर कल्पना आहेत त्या सोडून झाडं जगवा सारखे फालतू उपक्रम राबवणे सोडून द्यावे. फारफार तर आपल्या बाल्कनीत दोन चार कोथिंबीरच्या काड्या उगवा, खुप झालं

एवढ्या उंची वर चहाचे मळे लावण्याआधी किती उंच उंच झाडे असलेली जंगले असतील याची कल्पना केली.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना कोणीच कसे काही बोलले नाही?
त्यामुळे आता चहा बंद>>>>>

आसामाचे चहाचे मळे १००-१५० वर्षांपासुन आहेत. ऊंच ऊंच झाडे असलेली जंगले तोडुन आसाम, केरळ, तमिळनाडु इथे चहा लागवड केली गेली. तेव्हा कोणी काही बोलले नाही म्हणुन आज चहा बंद हा तुमचा निर्णय स्तुत्य आहे. तुम्ही आज जो भात डाळ चपाती भाजी खाता त्यासाठीचा तांदुळ, गहु, डाळ, भाज्या आज जिथे पिकवल्या जाताहेत तिथे १००-१५० वर्षांपुर्वी ऊंच ऊंच झाडे असलेली जंगले असण्याची खुप मोठी शक्यता आहे. तुम्ही मुंबईत राहात असाल तर राहात असलेल्या इमारतीच्या जागी १०० वर्षांपुर्वी ऊंच ऊंच झाडे असलेली जंगले असण्याची १०० टक्के शक्यता आहे. मुंबईबाहेर असाल तर कदाचित ५०-६० वर्षांपुर्वीही तिथे ऊंच ऊंच झाडे असलेली जंगले असणार. त्यामुळे आता खायचे काय व राहायचे कुठे ह्याबाबतही असाच स्तुत्य निर्णय घ्या.

आरेचे पुढे काय झाले?? कोणी कारशेडला भेट देऊन पाहिलेय का? मी गेल्या आठवड्यात दादर-सांताक्रुझ मेट्रोने प्रवास केला. रस्त्यावरच्या गर्दी गोंगाटापेक्षा हा प्रवास सुखद व गारेगार वाटला. दुपारी प्रवास करत होते म्हणुन गर्दी नव्हती की झाडे तोडल्याचा निषेध म्हणुन लोक ह्या मेट्रोने प्रवास करत नाहीत हे कळले नाही. काही लोक तिकिट जास्त आहे म्हणत होते. पण सगळ्याच मेट्रोंचे तिकिट ३० रुपये व पुढे असेच आहे/असावे. पुढे मी गुंदवली-बोरिवली दत्तपाडा व परत हा प्रवासही दुसर्‍या मेट्रोने केला. तो बसने केला असता तर दुप्पट वेळ गेला असता, रेल्वेत चढले असते तर गर्दीत चेंगरले असते. आणि वर गर्मी व गोंगाट वेगळा. रक्षा बंधनाच्या दिवशी मुंबईत सगळेजण फक्त प्रवास करत असतात.

आसाम मध्ये गेलो होतो. तेथील उंच डोंगरावर खुरटी चहाची झू डपे असलेले मळे पाहिले.
एवढ्या उंची वर चहाचे मळे लावण्याआधी किती उंच उंच झाडे असलेली जंगले असतील याची कल्पना केली.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना कोणीच कसे काही बोलले नाही?
त्यामुळे आता चहा बंद

Submitted by Chhaburao on 18 August, 2025 - 02:32 >>>

खरंच स्तुत्य निर्णय. एक झाड नाही आसामात. फक्त गाड्या, धूर, इमारती आणि कारखाने. अशा ठिकाणी चहाचे मळे काढले.
आमच्या पुण्यामुंबईत चालायला पण जागा नाही एव्हढी झाडं आहेत.