वारजे कर्वेनगर नागरिक मंच

Submitted by प्राजक्ता कागदे on 22 July, 2025 - 11:52

कर्वेनगर नागरिक मंच हा वारजे कर्वेनगर भागातल्या काही नागरिकांनी एकत्र येत स्थापन केलेला संघ आहे.
अनुरूप विवाह चे तन्मय कानिटकर, मी स्वतः आणी अजून एक दोन सदस्य हे वारजे कर्वेनगर भागातील नागरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सतत काम करतो.
वारजे कर्वेनगर प्रभाग भला मोठा आहे. कर्वे रस्त्यावरील आनंद ज्यूस बार, प्रभात रोड 14 नंबर गल्ली पासून सुरू होऊन तो पार गणपती माथा वारजे परेंत पसरला आहे.
यात कर्वे रस्त्याची डहाणूकर काॅलनी ते कर्वे पुतळा ही बाजू वगळली तर बाकी सर्व भाग आहे.

तर आम्ही नागरी मंचातर्फे नक्की काय करतो
1. प्रभागातील अतिक्रमण, रस्त्यावर पडलेला राडारोडा कचरा हलवणे, बेकायदेशीर फ्लेक्स विरोधात तक्रार करणे, सर्व छोट्या मोठ्या नागरी समस्या मनपा आणी वार्ड ऑफीस च्या निदर्शनास आणून देणे
2. दर महिन्यात शेवटच्या गुरूवारी प्रभाग कार्यालयात प्रभाग समिती सदस्य, मनपा चे पदाधिकारी यांची बैठक असते.आम्ही त्या बैठकीला ऊपस्थित राहून प्रभागात काय सुधारणा अपेक्षित आहेत ते सांगतो आणी मागच्या महिन्यातील सूचना आणी झालेली कारवाई याचा आढावा घेतो.
3. मनपाचे जे वार्ड स्तरावर बजेट असते त्यात मोहल्ला कमिटी मेंबर्स नागरी दृष्टीने महत्त्वाची कामे सुचवू शकतात. ते आम्ही केले आहे.
4. कर्वेनगर नागरिक मंचाचा एक what's app group आहे. त्यावर सदस्य काही दुरूस्ती / समस्या ह्या फोटो काढून पाठवू शकतात आपण त्यांना PMC Care app वर जाऊन ऑनलाईन तक्रार करायला सांगतो. नंतर तक्रार ट्रॅक करता येते.
5.प्रभागातील समस्या मांडणे यासाठी महिनाभरात फक्त एक मिटींग फार कमी आहे.. आम्ही नागरीक मंचातर्फे पाठपुरावा करून सहाय्यक आयुक्त हे दर सोमवारी आणी गुरूवारी नियोजित वेळेत नागरिकांच्या सर्व तक्रारी थेट ऐकण्यासाठी ऊपलब्ध असतील या साठी प्रयत्न केला आणी तो यशस्वी झाला आहे.

तर हा लेख लिहिण्यामागे माझा उद्देश मी ज्या भागात राहते तो स्वच्छ सुंदर, अतिक्रमण विरहित असावा, यासाठी केवळ प्रशासन सहभागी न होता लोकांचा सहभाग वाढावा म्हणून लिहीला आहे.
What's app जाॅईन करायचे असेल तर मला 9699645424 वर मेसेज करू शकता.

असेच नागरी मंच सहकार नगर, बावधन,सिंहगड रोड येथे देखील काम करत आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान उपक्रम. शुभेच्छा!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि लोकप्रतिनिधी निवडून आले तरी उपक्रम चालू ठेवा.
-
शीर्षकात अनुस्वाराऐवजी विसर्ग पडलाय.

छान उपक्रम . कौतुकास्पद काम करताय.
पुल देशपांडे उद्यान परीसरात कोण आहेत सदस्य ?

राँग साईडने कानाला मोबाईल लावून येणारे आता खूप वाढलेत. तसेच सिग्नल सुटायच्या आधी आणि सिग्नल रेड झाल्यावरही विरूद्ध बाजूच्या वाहतुकीला चिरत कानाला मोबाईल लावलेले टू व्हीलरवाले आणि रिक्षावाले यांचा बंदोबस्त कसा करता येईल ?

रानभुली.. बेशिस्त वाहनचालकांचा बंदोबस्त करणे हे वाहतूक विभागाचे काम. तुझ्या ईथे जर महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस ऊभे नसतील तर वाहतूक शाखेला तसे निवेदन द्यावे लागेल. वडगाव पुलाखाली शाखा आहे तिथे कोण आहे हे बघून निवेदन द्या.
@भरत हा ऊपक्रम सदैव सुरू राहील