पैलतीर

Submitted by दत्तात्रय साळुंके on 10 July, 2025 - 07:26

बाळमुठीतून शैशव गळालं
पण तो खुळखुळा सुखाचा
घट्ट तसाच हातात
अवघी हयातभर रुणझुणला
रमत गेलो त्याच्या संगे
कधी पडलो, रडलो,लढलो
खुळखुळा सुटला नाही
थांबला नाही नाद त्याचा
सरला नाही शोध सुखाचा
हल्ली त्याचा क्षीण आसक्त आवाज
जागवतो एक शुष्क एकाकी झाड पैलतीरावर
अगांवर ब-या,वाईट अनुभवाच्या
सुरकुत्या चढलेलं
विशाल वयस्क ताठ खोड
वाकलेले खांदे
शुष्क फांद्या एकटक आभाळात आधार शोधणा-या
विमनस्क, निराधार
जगाच्या कोलाहलात एकट्या

© दत्तात्रय साळुंके
२५-६-२५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान
बहरून येथ आलो,
निष्पर्ण जात आहे.

सामो
खर तर ही लाईन उलटी आहे .
निष्पर्ण येथ आलो,
बहरून जात आहे.
पण मला वाटतय की दसा काहीतरी दुसरेच आपल्याला सांगत आहेत.
मूळ रचना कुणाची आहे? मला माहित नाही.

कुमार सर
केकू
सामो

अनेकानेक धन्यवाद....

केकू माझी कविता खूप सरळ आहे...
मुलं त्यांचं आकाश शोधताहेत. आईवडील एकटे विकलांग आहेत . अशातून मरणही येत नाही ही विमनस्कता.
अन् जे भौतिक सुख आयुष्यभर शोधलं त्याची लालसा शेवटपर्यंत टिकते क्षीण होत असली तरी.

केकू
तुमच्या ओळी खूप सुंदर आहेत.
अशी माणसं समरसून आयुष्य जगतात.