Submitted by अनन्त्_यात्री on 9 July, 2025 - 06:35
नक्षत्रांचे देणे होते
द्यायचे राहिले
जगण्याच्या वाटेवर
काटेच भेटले
नक्षत्रांनी प्रज्वलित
उल्का पाठविली
काट्यांशीच केली मैत्री
फुले त्यांची झाली
एकेका फुलाचे रंग
आठवत होतो
निर्माल्य फुलांचे झाले
-बेसावध होतो
निर्माल्य होताना फुले
नि:शब्द म्हणाली,
"खत होणे हेच थोर
भाग्य आम्हा भाळी
सृजनाच्या मृदेवर
आमुची पाखर
आधीच्याच मातीवर
एक नवा थर
पीक विलक्षणाचेच
येईल, तोवरी
नक्षत्रांनो थांबा,
आज
रिक्त
देणेकरी"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान कविता..!
छान कविता..!
रूपाली धन्यवाद
रूपाली धन्यवाद