Submitted by बेफ़िकीर on 9 July, 2025 - 03:56
त्याच व्यक्तीने दिलेली...
=====
वाटले होते मला की जी मलम आहे
त्याच व्यक्तीने दिलेली ही जखम आहे
माणसांची वागणी पाहून समजेना
नेमक्या कुठल्या युगाचा मी इसम आहे
संपणे वर्षानुवर्षांची जुनी नाती
जीवनाच्या गायनाची हीच सम आहे
रंग पूर्वेचा बदलते पश्चिमेवरती
आपले आकाशसुद्धा बेशरम आहे
आसवांचे शस्त्र वापरलेस अंतिमतः?
मागतो माफी तुझी, नामोहरम आहे
का न येती वाटता दोघांमधे सांगू?
आकडा माझ्या समस्यांचा विषम आहे
ठेवले उद्दिष्ट मी सामान्य होण्याचे
एवढा कोणात येथे सांग दम आहे
काळजी घेतात सारे, त्यामुळे जगतो
एकट्या 'बेफिकिरचे' कोठे करम आहे
=====
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुसरा आणि शेवटचा शेर आवडला.
दुसरा आणि शेवटचा शेर आवडला.
छान लिहिलं आहे. आवडली
छान लिहिलं आहे. आवडली
अफाट सुंदर !
अफाट सुंदर !
वाह वाह!
वाह वाह!
शेवटचे दोन्ही शेर आवडले.
शेवटचे दोन्ही शेर आवडले.