हौशी प्रयत्न

Submitted by भाऊ नमसकर on 25 June, 2025 - 00:05

खूप वर्षांनी प्रयत्न केलाय !

Group content visibility: 
Use group defaults

*कोपऱ्यात चित्रकार सही करतात ना?*- होय, पण मी खरंच स्वतःला ' चित्रकार ' म्हणायचं का, हेच तर अजून ठरत नाहीं ना ! Wink

पण मी खरंच स्वतःला ' चित्रकार ' म्हणायचं का, हेच तर अजून ठरत नाहीं ना ! >>>> जो चित्र काढतो तो चित्रकार या न्यायाने आपण चित्रकार आहातच. Happy
लहान असताना मी त्या डोक्यावर काहीतरी घेऊन लहान मुलासोबत चालणाऱ्या राजस्थानी ग्रामीण बाईचं प्रसिद्ध चित्र काढायचो आणि कोपऱ्यात सही ठोकायचो. चित्र यथातथाच असायचे पण सही लफ्फेदार असायची. Lol

अजून अशीच निसर्गिचित्रे आपल्याकडून पाहायला आवडतील.

ओह भारी आहे हे...
एक पाण्याने किंचितसा धुतला गेलेला खराखुरा फोटो वाटत आहे..

सर्वांस मनपूर्वक धन्यवाद.
*जो चित्र काढतो तो चित्रकार या न्यायाने आपण चित्रकार आहातच* - अहो, याच न्यायाने मी स्वतःला ' गायक ' समजलो होतो व त्यामुळे माझं एक प्रेम प्रकरण अकाली संपलं होतं व एका हॉलबाहेर श्रोत्यांनी मला जाम धुतलं होतं !! Wink
*एक पाण्याने किंचितसा धुतला गेलेला खराखुरा फोटो वाटत आहे..* - खरंय, जलरंगातलंच आहे हे चित्र ! Wink

न्यायाने मी स्वतःला ' गायक ' समजलो होतो व त्यामुळे माझं एक प्रेम प्रकरण अकाली संपलं होतं व एका हॉलबाहेर श्रोत्यांनी मला जाम धुतलं होतं !! >>>>> लिहा तो किस्सा मायबोलीवर. माझी खात्री आहे मायबोलीकराना वाचायला आवडेल.

मस्त चित्र..!
मुंबई - अहमदाबाद हायवे लागायच्या अलिकडच्या भागात अशीच घरं लागतात. त्या घरांची आठवण आली. वाड्यामार्गे गावाला जाताना पण चित्रातल्या सारखाच निसर्ग दिसतो.

चित्र छान आलंय.

न्यायाने मी स्वतःला ' गायक ' समजलो होतो व त्यामुळे माझं एक प्रेम प्रकरण अकाली संपलं होतं व एका हॉलबाहेर श्रोत्यांनी मला जाम धुतलं होतं !!>≥> Lol

भाऊ, जलरंगातील सुरेख निसर्ग चित्र!

चार घरांचे गाव चिमुकले
पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट
लागली हिरवी गर्दी पुढे

ही कविता आठवली बघा!

त्या तिथे पलिकडे, तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे.
गवत उंच दाट दाट, वळत जाई पायवाट.
वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे.
माझिया प्रियेचे झोपडे.

*त्या तिथे पलिकडे, तिकडे, ....माझिया प्रियेचे झोपडे.* -
नंद्याजी, राजा परांजपे, राजा गोसावी, रेखा व चित्रा यांचाही काय एक जमाना होता ! ह्या सध्या, बाळबोध, रांगड्या चित्राच्या नशिबात तुम्हाला त्या सुवर्ण काळाची आठवण करून देणं असावं, हे आश्चर्य !! धन्यवाद.

Pages