अपयश

Submitted by वैशाली अ वर्तक on 22 June, 2025 - 11:15

विषय ....अपयश
काव्यप्रकार ....मुक्त छंद

यश मिळाले की,
यशाला तर आनंदाने, कौतुकाने कवटाळले जाते.
आणि लगेचच पेढे ,वा मिठाई देखील वाटून
आनंद सोहळा साजरा होतो की हटके .!

पण ,.....अपयश आले तर ,
तेही स्विकारताआले पाहिजे.

जीवनात संघर्ष सतत चालणारच,
अनेक कठीण प्रसंग येणारच.
काही सहज सुलभतेने उलगडणार ,
तर काही गंभीरतेने हाताळता पण,
यशाची चिन्हे ,नाहीच दिसत,
आणि मग ,...अपयश पदरी पडणार याची, खात्री पण पटते.
पण अशावेळी ,जराही न डगमगता ,
हीच उद्याच्या यशाची पायरी समजून ,
आत्मविश्वासाने उचलावे पाऊल .
कळत नकळत झालेल्या चुका घेत ध्यानी ,
दृढ विश्वासाने , मेहनत घेत पुढे चालता,
सामोरी लागते यशाची चाहुल.
जशी रोज ...नसे निशा,
निशे नंतर... येतच ऊषा.
अपयशाने न होता खच्ची,
आठवावी मनी.ss ती,
तेनसिंगची एव्हरेस्ट सर करण्याची जीद्य,
अथवा,.. पहावे ,साध्या मामुली किटक कोळीला.
जो अनेकदा पडूनही, जाळे विणतोच ना नेटाने ?

तशीच मेहनत ,जिद्द, सकारात्मक भाव ,
आणि महत्वाचा दृढ विश्वासाने,
अपयशाला , यशात सहजतेने करावे रूपांतरित .
अपयश शब्दातील , पुसून टाकुया "अप"शब्द

बालपणी सापशिडीच्या डावातून
हीच शिकवण देण्यास,
मायबाप ,बालकास लहान असताना,
सापशिडी खेळायला देऊन बाळकडू पाजतात,
सापशीडी तील शीडी..
जीवनातील चढ.. हेच यशाचे चिन्ह.
सापाने गिळंकृत... म्हणजे ..
धडा अपयशाचा,
आपोआप नकळत मिळतो ,आणि
अपयश पचवित शंभर आकडावर पोहचतो.
अन् *अपयश* आनंदे स्विकारतात.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

Group content visibility: 
Use group defaults

छान कविता..!
यशासोबत अपयश स्विकारायची मनाची तयारी कायमच असायला हवी...चढ-उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच..!