भ्रष्टाचाराला आळा घालू.

Submitted by वैशाली अ वर्तक on 22 June, 2025 - 11:05

.भ्रष्टाचाराला  आळा घालू

रुजले जाते बालपणातच
बाळकडू भ्रष्टचाराचे
मोठ जनची करुन घेण्यास काम 
दावी अमीष प्रलोभनाचे.

भ्रष्ट वर्तन असे ...भ्रष्टाचार 
दिसतोय तो सर्व ची थरात
भ्रष्ट असती सारे लहान महान
सर्व  तंत्रची,...सडलेले मुळात.

वशिलेवाले जाती पुढे
रहाती होतकरू मागे
देउन पैसा मिळवती जागा
बुद्धिमानाचे न जुळती धागे.

भ्रष्टाचार करणा-याची
विवेक बुध्दी होते नष्ट
भ्रष्टाचार  हाची शिष्टाचार
मानू लागलेय जग हेच स्पष्ट .

सारे मिळूनी करुया नष्ट 
जगुया सदा  स्वाभिमानाने
स्वकष्टाची  , आत्म बलाची
मिळवू भाकर  अभिमानाने .

लावू  आता  एकची नारा 
*भ्रष्टाचाराला घालू आळा*!
भारत देश करण्या महान
मानवा , थांबव आता घोटाळा .

भ्रष्टाचारास आळा घालण्या
जन जागृती करुया मिळूनी
तरच चांगली पिढी घडेल 
उद्या  नवा आदर्श  घेऊनी. .

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

Group content visibility: 
Use group defaults