शब्दखेळ खेळल्यानंतर

Submitted by माबो वाचक on 21 June, 2025 - 01:11

शब्दखेळ खेळल्यानंतर त्यासंबंधी मुक्तपणे चर्चा करता आली, तर आणखी मजा येईल असे वाटते. (उदा. त्यात कोणते शब्द होते, कसे सोडविले, काय अवघड होते, काय सोपे होते, काय आले, काय आले नाही, उत्तराचा स्क्रीनशॉट देणे, इत्यादी)
मायबोलीवर शब्दखेळांचे धागे आहेत. पण तिथे उत्तर उघड होण्याच्या कारणामुळे जास्त चर्चा करता येत नाही. (मायबोलीवर रेड्डीटसारखी स्पॉईलर्स लपविण्याची सोय नाही.) त्यामुळे ते धागे फक्त दवंडी पिटण्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत.
यावर उपाय म्हणून हा धागा काढत आहे. येथे उत्तर उघड करता येईल व सर्व प्रकारची चर्चा करता येईल.
तर त्या दिवशीचे तुमचे सर्व शब्दखेळ खेळून मग इकडे या. म्हणजे उत्तर अगोदर कळणार नाही.
चला तर मग, शब्दखेळांची मजा द्विगुणित करूया.
https://marathigames.in/

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot 2025-06-21 104848.png
आजचा शब्द लगेच आला. मी सुरुवात शक्यतो समृद्ध शब्दाने करतो, म्हणजे ज्यात जोडाक्षर, अनुस्वार, मात्रे आहेत. म्हणजे सुरवातीलाच जास्त सुगावे मिळतात.

आजचा शब्द फार अवघड गेला. सगळे आले. एकच फक्त एकच सापडला नाही. आज हरले. पण मेंदूस व्यायाम छान झाला.
-------------
आज 'दैनिक शब्दभ्रमर' - सोपा खेळ खेळले. मजा येते.

आज हरले. पण मेंदूस व्यायाम छान झाला. >>> खरे आहे, जरी पूर्ण उत्तर सापडले नाही तरी खेळायला मजा येते.

ShabdKode-062425.doc (244.5 KB)

मी रोज शद्बशोध खेळतो, फार छान खेळ आहे . पण कधी कधी अपेक्षित शब्द नसतो, जसे कि आज वाहनतळ हा शब्द अपेक्षीत होता पण तो कुठेच नाहीये (इमेज पहा ). या आधी पण १-२ वेळा असे झाले आहे , पण तेव्हा हा धागा नव्हता Happy

@ गिरीश, खरे आहे आपले म्हणणे. ती त्रुटी आहे खेळामधली. लवकरच दुरुस्त करेन. निदर्शनास आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आणि शब्दशोध खेळता आहात हे पाहून आनंद वाटला, कारण तो अदलाबदली इतका लोकप्रिय नाही. दुसऱ्या धाग्यावर दवंडीपण देऊ शकता, म्हणजे इतरांना प्रेरणा मिळेल हा खेळ खेळण्याची.
अजून काही त्रुटी, सूचना असतील तर जरूर सांगत राहा. धन्यवाद.

@ माबो वाचक - सर्व प्रथम हे खेळ उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद . वर लिहिलेली त्रुटी फक्त शेवटच्या पानावर येते (५ अक्षरी शब्द) असे माझे निरीक्षण आहे , तुम्हाला debug करायला कदाचित हे निरीक्षण उपयोगी पडेल ...

@ गिरीश, आभारी आहे.
मला आनंद आहे कि मराठी जणांना हे शब्दखेळ आवडत आहेत. इंग्रजीमध्ये हजारोने असे शब्दखेळ आहेत पण मराठीमध्ये चांगले शब्दखेळ उपलब्ध नव्हते. म्हणून हा खटाटोप.

खेळात बदल केला आहे. शेवटच्या पायरीची grid-size एक ने वाढवून ८ केली आहे. आता त्यात सर्व शद्ब मावतील.
जर बदल दिसत नसेल तर या वेबसाईट च्या सर्व कुकीज डिलीट करा आणि मग वेबसाईट लोड करा.
धन्यवाद

कालचा शब्द 'स्मृतीभ्रंश' फार अवघड होता हो. >>>> खरं आहे. दोन जोडाक्षर आहेत त्यात. आणि पहिल्या जोडाक्षरात तीन अक्षरे